मुंबई : पर्यावरण (Environment) समृद्धीच्या दृष्टीने मोठे महत्त्वाचे स्थान असणारे वृक्ष, झाडे (Trees) इत्यादी पालिका क्षेत्रातील विविध सोसायटया, बंगले, विविध संस्था इत्यादींच्या मोकळ्या जागांमध्येही आहेत. या वृक्षांची, झाडांची सुयोग्य जोपासना करण्यासाठी त्यांना ज्याप्रमाणे नियमितपणे पाणी-खते इत्यादी द्यावे लागतात, त्याचप्रमाणे झाडांवर बुरशी, कीड किंवा अन्य एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव नाही ना? याची तपासणी देखील नियमितपणे करणे अत्यंत गरजेचे आहे.
याबाबत संबंधित सोसायटीच्या वा संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या विभाग कार्यालयातील वृक्ष अधिकारी किंवा सहाय्यक उद्यान अधीक्षक यांच्याशी संपर्क साधावा व त्यांच्या मार्गदशर्नानुसार आपल्या परिसरातील झाडांची तपासणी वेळोवेळी करवून घ्यावी.असे आवाहन उद्यान खात्याने केले आहे.
वृक्षांवर, झाडांवर बुरशी, वाळवी इत्यादींचा प्रादुर्भाव मोठया प्रमाणात वाढल्यास झाड पडण्याची शक्यता वाढते.ज्यामुळे जीवित वा वित्तहानी देखील होऊ शकते. ही बाब लक्षात घेऊन झाडांची नियमितपणे शास्त्रशुद्ध तपासणी करणे गरजेचे आहे.तसेच एखाद्या झाडावर किडीचा प्रादुर्भाव असल्यास त्यापासून इतर झाडांना देखील संसर्ग होऊ शकतो.
[read_also content=”क्राफ्टॉन, इन्क भारतासाठी सादर करत आहेत बॅटलग्राऊंड्स मोबाइल इंडिया ईस्पोर्ट्स २०२२ रोडमॅप https://www.navarashtra.com/technology/krafton-inc-introducing-battlegrounds-mobile-india-esports-2022-roadmap-for-india-nrvb-240387.html”]
यासाठी देखील तज्ज्ञांद्वारे वेळोवेळी वृक्षांची तपासणी करणे आवश्यक आहे. याबाबत नागरिकांनी त्यांची सोसायटी अगर संस्था ज्या विभागाच्या हद्दीत आहे, त्या मनपा विभाग कार्यालयातील वृक्ष अधिकारी किंवा सहाय्यक उद्यान अधीक्षक यांच्याशी संपर्क साधावा व त्यांचे याबाबत मार्गदर्शन घेऊन आवश्यकतेनुसार वेळच्यावेळी उपाययोजना करावी, असेही आवाहन उद्यान खात्याद्वारे करण्यात आले आहे.






