रेल्वेस्थानकांतील स्तनपान केंद्रांची झाली कचराकुंडी! कुर्ल्यात गुटखा बहाद्दरांनी केंद्र 'लाल' रंगाने रंगवले
मुंबईला काम करणाऱ्यांचे शहर म्हटले जाते. येथे प्रत्येक जण धावपळीत असून, कामाच्या व्यापातही अनेक स्तनदा माता आपल्या बाळांसह प्रवास करतात. अशा महिलांना स्थानकांवर बाळाला स्तनपान करणे पूर्वी मोठे आव्हान ठरत होते. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर शिशु स्तनपान केंद्रांची सुविधा सुरू केली. मात्र, सध्या या केंद्रांची अवस्था चिंताजनक झाली असून अनेक ठिकाणी ती कचराकुंडीप्रमाणे वापरली जात असल्याचे, तसेच गुटखा खाऊन धुंकल्याने परिसर अस्वच्छ झाल्याचे दिसून येते. प्रवाशांची प्रचंड वर्दळ असलेल्या कुर्ला स्थानकावर या सुविधेची झालेली दुर्दशा हेच वास्तव अधोरेखित करते. कुर्ला स्थानक पश्चिमेकडील फलाट क्रमांक १ वरील तिकीट खिडकीजवळ असलेले स्तनपान केंद्र पूर्णपणे तुटलेल्या अवस्थेत असून, धुळीने माखलेले आहे.(फोटो सौजन्य – AI)
धारावीकरांसाठी मोठा दिलासा! नव्या घरांचा हक्क रहिवाशांकडेच राहणार; अफवांना अधिकाऱ्यांचा चाप
केंद्राच्या बाहेर कचरा साचला असून, दुर्गंधी पसरली आहे. परिणामी, या केंद्राचा वापर करणे तर दूरच, तिथे काही क्षण थांबणेही महिलांसाठी असुरक्षित आणि अस्वस्थ करणारे ठरत आहे. रेल्वे प्रशासनाने काही वर्षांपूर्वी महिलांच्या सोयीसाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने ही स्तनपान केंद्रे सुरू केली. मात्र, प्रत्यक्षात त्यांच्या देखभालीकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट दिसते. कुर्त्यांसारख्या महत्त्वाच्या आणि गर्दीच्या स्थानकावर अशी अवस्था असेल, तर इतर स्थानकांवरील परिस्थिती किती बिकट असेल, याची कल्पना करता येते.
विशेष म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘व्होकल फॉर लोकल’ उपक्रमातर्गत उभारण्यात आलेले स्टॉल स्थानकावर ठळकपणे दिसतात. त्याची जाहिरातही मोठ्या प्रमाणात कैली जाते. मात्र, मातांसाठी अत्यावश्यक असलेल्या स्तनपान केंद्रांची माहिती देणारे फलक किंवा दिशादर्शक चिन्हे अनेक ठिकाणी आढळत नाहीत, त्यामुळे ही केंद्रे नेमकी कुठे आहेत, हेच अनेक महिलांना समजत नाही.
कुर्ला स्थानकासोबतच मुंबईत दादर, डोंबिवली, कल्याण यांसारख्या प्रमुख स्थानकावरही ही केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. मात्र, तिथे देखील तुटलेली दारे, खिडक्या, बंद पाण्याची व्यवस्था, अंधारलेली खोली आणि असुरक्षित वातावरण यामुळे अनेक माता या केंद्रांकडे जाणे टाळत आहेत.त्यामुळे महिलाना सार्वजनिक ठिकाणीच लहान बाळांना स्तनपान करावे लागत असल्याने महिलांमध्ये मोठी नाराजी आहे.
महिलांचे आरोग्य, सन्मान आणि सुरक्षिततेशी थेट संबंध असलेली ही सुविधा केवळ नावापुरती राहिल्याने प्रवासी आणि महिला संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. संबंधित यंत्रणांनी या केंद्रांची तातडीने दुरुस्ती करून नियमित स्वच्छता, सुरक्षा आणि देखभाल सुनिश्चित करावी, तसेच स्पष्ट दिशादर्शक फलक लावावेत, अशी मागणी जोर धरत आहे. मुंबईच्या उपनगरी रेल्वे व्यवस्थेत महिलांसाठी मूलभूत सुविधा देण्याबाबत प्रशासन किती गंभीर आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
८८ लोकलमधील गदी इतकी वाढली आहे की घडधाकट माणसांनाही चढताना विचार करावा लागतो, अशा परिस्थितीत लहान बाळाला घेऊन आईने कसा प्रवास करावा, हा मोठा प्रश्न आहे. स्तनपानासाठी सुविधा उभारल्या असल्या, तरी त्यांची देखभाल होत नसल्याचे कुर्ला स्थानकावर स्पष्ट दिसते, असे मत लता अरगडे, अध्यक्षा, उपनगरीय प्रवासी महासंघ यांनी व्यक्त केले आहे.
संघटनेच्या विरोधानंतरही मंत्री सरनाईक मराठी सक्तीच्या निर्णयावर ठाम; अंमलबजावणीसाठी आज विशेष बैठक
मी दिवसांसाठी मुंबईत काही आले होते. माझे दीड वर्षांचे बाळ आहे. मात्र, कोणत्याही स्थानकावर ‘हिरकणी कक्ष’ सहज दिसला नाही. प्रत्येक स्थानकावर असे कक्ष असणे आवश्यक असून, ते स्पष्टपणे दिसतील अशा ठिकाणी असायला हवेत, असे मत असायला हवेत. मयुरी सर्वेश सावंत, यांनी व्यक्त केले आहे.






