सावधान! साथीच्या आजाराचे आढळले 3750 रुग्ण ; प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन
नुकताच पावसाळा सुरू झाला असून ग्रामीण व शहरी भागात साथीचे आजार पसरू लागले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण आणी शहरी भागात पावसाळयाच्च्या दवसांत जलजन्य आजारावाबत रुग्णाची कोणतीही अनुचित घटना घडलेली नसली तरी साथीच्या आजाराचे प्रमाण वाढत आहेत. यात प्रामुख्याने अतिसार, ताप, सर्दी, खोकल्याचे प्रमाण अधिक आहे. शासकीय रुग्णालयात गर्दी वाढत असताना खाजगी रुग्णालयातही गर्दी वाढत आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार जलजन्य आजारापेक्षा साथीच्या आजारांनी लोकांना विळख्यात घेणे सुरू केले आहे. आरोग्य विभागाला आतापर्यंत साथीच्या आजाराचे एकूण 3750 रुग्ण आढळून आले, यात 3043 रुग्ण तापाचे, 508 रुग्ण खोकल्याचे तर 199 रुग्ण अतिसाराचे आहेत. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अशोक कटरे यांनी नवराष्ट्रशी बोलताना मंगळवारी (दि. 17) दिली.
काय आहे जलजन्य आजार साधारणतः पावसाळ्यात पावसाचे पाणी जमिनीत झिरपते पावसाच्या पाण्यात जमिनीवरील विविध रोगाचे जिवाणू, विषाणू मिसळतात, असे दूषित पाणी पिण्याच्या पाणीस्त्रोतात उदा. विहीर, हातपंप, नळयोजनेत मिसळतात. हे दूषित पाणी निर्जतूक न करता नागरिकांच्या पिण्यात आल्यामुळे हगवण, अतिसार, कॉलरा, गॅस्ट्रो, विषमज्वर व काविळ इ. जलजन्य आजाराचा प्रादुर्भाव होतो. योग्य काळजी न घेतल्यास पावसाळयाच्या काळात या आजाराची लागण मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असते.
जलजन्य आजार टाळण्यासाठी करावयाच्या उपाययोजना: घरात पिण्याचे पाणी घेताना शक्यतो निर्जंतुक केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. पावसाळयाच्या दिवसांत 20 मिनिटे उकळून थंड केलेले पाणी पिण्यासाठी वापरावे. पाणी घेताना दुपदरी कापडाने गाळून पाणी घ्यावे. घरातील पिण्याचे पाणी उंच जागेवर ठेवावे. पाणी घेण्यासाठी ओरघडयाचा वापर करावा. पिण्याच्या पाण्यात मेडिक्लोरचा वापर करावा. पाणी गढूळ असल्यास तुरटीचा वापर करावा. शेतावर कामास जातांना पिण्याचे पाणी घरून न्यावे. नदी, नाले किंवा शेतातील दूषित पाणी पिऊ नये. घराभोवतालचा परिसर स्वच्छ ठेवावा, वरील आजार माश्याद्वारे (मानवी विष्ठेवर माशा बसतात) पसरतात. त्यामुळे माशांची उत्पती होणार नाही याची काळजी घ्यावी. जलजन्य आजार झाल्यास करावयाचीउपाययोजना गॅस्ट्रो, अतिसार व कॉलरा या हगवणीच्या आजारात पातळ शौच्यास व उलटीचा त्रास होतो. शरीरातील पाणी शौच्याद्वारे बाहेर जात असल्यामुळे रुग्णात जलशुष्कता निर्माण होते.
वेळीच उपचार न झाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते, त्याकरीता खालीलप्रमाणे उपाययोजना करावी. रुग्णास जलशुष्कता टाळण्यासाठी घरातील पातळ पेय, (वरणाचे पाणी, फळाचा रस, भाताची पेज, आंबील, नारळाचे पाणी) भरपूर प्रमाणात पिण्यास द्यावे रुग्णाच्या शरीरातील पाणी कमी होत असल्यामुळे रुग्ण मोठ्या प्रमाणात तहान लागते रुग्ण मागेल तेवढे पातळ पेय व पाणी रुग्णास पिण्यास द्यावे. ओआरएस वापर करावा. ओआरएस पावडरचे द्रावण बनवून रुग्ण भरपूर प्रमाणात पिण्यास दयावे. घरगुती उपचाराने रुग्णास आराम न झाल्यास त्वरित प्राथमिक आरोग्य केंद्रात, दवाखान्यात उपचाराकरीता जावे.
हाडांचा सांगाडा करून चुराडा करून टाकतो ‘हा’ आजार, 5 लक्षणं दिसताच व्हा सावध!
योग्य उपचारामुळे अनेक रुग्ण आजारातून बरे झाले आहेत. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णांवर वेळेवर योग्य ते उपचार करण्यात येत आहेत. जिल्हास्तरावरून साथीच्या आजाराबाबात सर्व मुबलक औषधी साठा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. सर्व रुग्णालयात उपलब्ध आहे. सर्व आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचारी मार्फत आरोग्य सेवा देण्यात येत आहे. तसेच फक्त अतिजोखमीचे रुग्ण असल्यास त्यांना प्राथमिक उपचार करून ग्रामीन रुग्णालय रेफर करण्यात येते. साथीच्या आजाराबाबत आरोग्य विभागातर्फे जनमानसात प्रचार प्रसिध्दी करुण जनजागृती करण्यात येत आहे. असेही डॉ. कटरे म्हणाले.