Chandrapur News: स्ट्राँग रुमच्या हालचाली आता दिसणार डिस्प्लेवर, तपसाणीसाठी केली 9 अधिकाऱ्यांची नियुक्ती
Karjat News : थकीत घरपट्टी वसुलीसाठी मोहिम; नेरळ ग्रामसभेत पाणीपट्टी वाढीला मंजुरी
स्ट्राँग रुमभोवती मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच सर्व हालचाली टिपण्यासाठी स्ट्राँग रुमभोवती मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच सर्व हालचाली टिपण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. कुणाला कुठलीही शंका येऊ नये, यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून चित्रण होत असलेला एक डीएप्लेसुद्धा पक्षीय व अपक्ष उमेदवारांना बाहेर उपलब्ध करून देण्यात आला आहे. येथील हाय सिक्युरिटीमध्ये ईव्हीएम मशीन सुरक्षित असल्याचे उमेदवारांना दाखविण्यासाठी बैठक व्यवस्थादेखील करण्यात आली आहे. पोलिस बंदोबस्त तर आहेच, पण निवडणूक विभागाच्यावतीने तहसीलदार, नायब तहसीलदार, मुख्याधिकारी अन्य अधिकारीदेखील स्ट्रॉग रुमच्या तपासणीसाठी नेमण्यात आले. (फोटो सौजन्य – Pinterest)
स्ट्रांग रूमवर नजर ठेवून असणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या भूमिकेबद्दल स्पष्ट मत व्यक्त केले आहे. निवडणुकीत आम्ही खूप मेहनत घेतली आहे. ईव्हीएममध्ये काही गडबड होऊन आमचा विजय हिरावला जाऊ नये, म्हणून आम्ही येथे लक्ष देत आहोत. पोलिस आपले काम करत आहेत, पण आमची नजरही स्ट्रॉग रूमवर असणे आवश्यक आहे, अशी कार्यकर्त्याने दिली. दुसऱ्या एका कार्यकर्त्याने सांगितले, ईव्हीएम सील असल्या तरी आतमध्ये काही गैरप्रकार होत नाहीत याची खात्री आम्हाला स्वतःला करून घ्यायची आहे.
शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी ! ‘कमी पटसंख्या असल्या तरीही शाळा आता…’
विमूर येथील नगर परिषद निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली असून मतमोजणीदेखील सुरळीत होणार आहे. स्ट्रॉगरूममध्ये ठेवलेली सर्व ईव्हीएम मशीन पूर्णपणे सुरक्षित आहेत. स्ट्रॉगरूमबाहेर पोलिस बंदोबस्त तैनात आहे. या ठिकाणी उमेदवारांना स्ट्रॉगरुमच्या सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सीसीटीव्ही यंत्रणा देखील कार्यान्वित केली आहे. – श्रीधर राजमाने, तहसिलदार, चिमूर
नेमणूक केलेल्या अधिकाऱ्यांना दिवस वाटून दिले आहेत. त्यानुसार, कर्तव्य बजवावे लागत आहे. हे अधिकारी ८ तासांतून तीनवेळा स्ट्राँग रुमची पाहणी करीत आहेत. तसेच निवडणूक निर्णय अधिकारी श्रीधर राजमाने हेसुद्धा भेट देऊन वेळोवेळी स्ट्राँग रुम व परिसरातील हालचालींवर लक्ष केंद्रीत करीत आहेत.






