Chandrapur News: पर्यटनाला गेले अन् चोरांनी घर फोडले! दोन महिन्यांत 193 चोरीच्या घटना, पोलिसांसमोर मोठे आव्हान
चंद्रपूर हा औद्योगिक जिल्हा असल्याने येथे विविध प्रांतातील लोक राहतात. उन्हाळा सुरू झाला की हे लोक आपल्या मूळगावी सुट्या घालविण्यासाठी जातात तर स्थानिक लोक पर्यटनासाठी बाहेर पडतात. त्यामुळे चोरांचे फावते. जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यात चोरांनी ५५ घरांना लक्ष्य केले आणि १ लाख ८० हजार ३०९ रुपयांचा माल पळविला, ४ जागी झालेल्या जबरी चोरीत ६ लाख ३ हजार रुपये तर १३४ जागी केलेल्या चोरीत चोरांनी ३ कोटी ५४ लाख ८२ चोरीत चोरांनी ३ कोटी ५४ लाख ८२ हजार ०७१ रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने यावर अंकुश लावणार कोण, असा प्रश्न निर्माण झाला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)
८६ गुन्हे उघडकीस जबरी चोरी, घरफोडी व चोरी असे एकूण १९३ घटनांची तक्रार प्राप्त झाल्यावर पोलिसांनी गुन्हे दाखल करीत तपास यंत्रणा कामाला लावली. यातील ८६ चोरीच्या घटनांचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी चोरांना जरबंद करीत ३ कोटी ५४ लाख ८२ हजार ०७१ पैकी १ कोटी ४७ लाख ७० हजार १२४ रूपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. उरलेल्या १०७ घटनांतील आरोपींचा शोध पोलीस घेत आहे.
टेक्नॉलॉजीचा दुनियेत चोरही हायटेक झाले आहेत. चोरटे पहिले बंद घरांची व दुकानांची रेकी करतात. रात्री चोरी करताना चेहरा झाकून येतात. हेच नाहीतर वेळीच सीसीटीव्हीचे केबल कापून चोर घरात शिरतात. अशा स्थितीत चोरांना ओळखण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.
Raigad News: माथेरान पर्यटन हंगामात मिनी ट्रेनवर ताण! फेऱ्या वाढवण्याची नागरिकांची मागणी
८ जनतेची सुरक्षा ही जबाबदारी पोलिसांची आहे. असे असले तरी जनतेने पोलिसांना सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. काही अनुचित प्रकार घडताना दिसला तर नागरिकांनी ११२ नंबरवर सूचना केली पाहिजे.- अमोल काचोरे, पोलिस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा
8 चोरांना पकडणे व लोकांचे रक्षण करणे ही पोलिसांची जवाबदारी आहे. त्यासाठी रात्री गस्त घातली जाते. ही गस्त सुरू असताना सायरन सुरू होताच चोर सतर्क होतात. त्यामुळे पोलिसांच्या रात्रगस्तीवर प्रश्नचिन्ह बरी निर्माण झाला आहे.






