सौजन्य - नवराष्ट्र टीम
सांयकाळपर्यंत काही विस्तारित भागातील प्रभागात किरकोळ वाद वगळता सर्वत्र शांतपणे मतदान प्रक्रिया पार पडली होती, प्रभाग क्रमांक ८ मध्ये एका मतदाराचे मतदान आधीच कोणीतरी केले होते, तर काही ठिकाणी शाई लगेच पुसली जात असल्याने वाद झाले, दुपारी दोन पर्यंत अवघे ३० टक्के मतदान झाले, त्यानंतर मतदार घराबाहेर पडले, सायंकाळी ४ वाजता ४५ टक्के मतदान झाले. एकूण ९१ मतदान केंद्रे कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने विशेष देखरेखीखाली होती. मतदान केंद्रांवर २ हजार ९०० अधिकारी, कर्मचारी नियुक्त होते.
उद्या मतमोजणी
सर्व ३८१ उमेदवारांचे राजकीय भवितव्य गुरुवारी मतदान यंत्रात बंद झाले आहे. महापालिकेच्या या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. मतमोजणी प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडण्यासाठी प्रशासन व पोलिस यंत्रणा सज्ज झाली आहे. मिरज येथील सेंट्रल वेअर हाऊस येथे शुक्रवारी सकाळी दहा वाजल्यापासून मतमोजणी सुरू होईल. एकूण १४ टेबल वरून मोजमोजणी पूर्ण होईल.
महापालिका निवडणुकीसाठी एकूण ४ लाख ५४ हजार ४३० मतदार आहेत. पुरुष मतदार २ लाख २४ हजार ४८३, महिला मतदार २ लाख २९ हजार ८६५, तर इतर ८२ मतदार आहेत. एकूण ५२७ केंद्रांवर मतदान झाले आहे.
हे सुद्धा वाचा : मतदार यादीत घोळ, भाजपने मताला 5 हजार रुपये वाटले; रोहित पवारांचे गंभीर आरोप
मिरजेत दीड तास यंत्र बंद
मिरजेतील प्रभाग क्रमांक पाच मधील जवाहर चौक येथील २६ क्रमांकाच्या मतदान केंद्रावरील एक मतदान यंत्र बंद अचानक पडले, त्यामुळे सुमारे दीड तास मतदारांना ताठकळत बसावे लागले. काही काळ गोंधळ निर्माण झाला, उमेदवार प्रतिनिधी आणि मतदारांनी देखील नाराजी व्यक्त केली. तर मतदानाची वेळ वाढवून देण्याची मागणीही याठिकाणी केली.






