पेशवाईमधील कुशल राजकारणी ‘नानासाहेब फडणवीस’ यांची पुण्यतिथी आहे (फोटो - टीम नवराष्ट्र)
मराठा साम्राज्यातील अत्यंत कुशल राजकारणी आणि मुत्सद्दी म्हणून ओळखले जाणारे नानासाहेब फडणवीस यांची आज पुण्यतिथी. अठराव्या शतकात पेशवाईच्या काळात त्यांनी प्रशासन, कूटनीती आणि राज्यकारभार अत्यंत दक्षतेने सांभाळला. त्यांचे पूर्ण नाव बालाजी जनार्दन भानू असे होते, परंतु इतिहासात ते ‘नानासाहेब फडणवीस’ या नावाने प्रसिद्ध झाले. पहिले माधवराव यांच्या काळात त्यांनी राज्यकारभारात महत्त्वाची भूमिका बजावली. पुढे पेशवाईतील राजकीय अस्थिरतेच्या काळातही त्यांनी मराठा साम्राज्य टिकवून ठेवण्यासाठी परकीय सत्तांविरुद्ध कुशल कूटनीती वापरली. त्यांच्या बुद्धिमत्ता आणि दूरदृष्टीमुळे त्यांना त्या काळातील ‘मराठा साम्राज्याचे चाणक्य’ असेही म्हटले जाते. (Dinvishesh)
13 मार्च रोजी देशाच्या आणि जगाच्या इतिहासामध्ये घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना
13 मार्च रोजी मृत्यू दिनविशेष






