पुणे : पुण्यातील म्हाडा घरासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी आता ही एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे आता पुणे गृहनिर्माण क्षेत्र विकास मंडळाच्या पुणे विभागातील 4877 घरांसाठी अर्ज करण्यासाठी आता पुन्हा एकदा मुदतवाढ केलेली आहे. इच्छुकांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होण्यासाठी मुदत मिळावी, यासाठी गुरुवारपर्यंत देण्यात आलेल्या मुदतीत वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे ‘म्हाडा’ने स्पष्ट केले. येत्या २६ जूनला घरांची सोडत निघणार आहे. अडीच ते तीन महिन्यांत अवघ्या तीस हजार जणांनी ‘म्हाडा’च्या घरांसाठी अर्ज केले आहेत.
‘म्हाडा’च्या वतीने मार्चमध्ये चार हजार ८७७ सदनिकांसाठी सोडत जाहीर करण्यात आली. या काळात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली. तरीही इच्छुकांकडून घरांसाठी नोंदणी सुरू होती. घरांसाठी ऑनलाइनद्वारे आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागतात. निवडणुकीमुळे अर्ज करूनही अनेकांना आवश्यक कागदपत्रे उपलब्ध होत नव्हती. त्यामुळेच मुदतवाढीची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार, मुदतवाढ देण्यात आली आहे. ‘म्हाडां’तर्गत पुणे विभागाने काढलेल्या सोडतीमध्ये चार हजार ८७७ सदनिका विक्रीसाठी उपलब्ध आहेत.
म्हाडाला निवडणुकीचा फटका
म्हाडाच्या घरांची सोडत जाहीर केल्यानंतर लगेच लोकसभा निवडणुकांमुळे आचारसंहिता लागू करण्यात आली. त्यामुळे संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीच्या कामांमध्ये व्यस्त होती. त्यामुळे ज्या उमेदवारांना म्हाडाचा अर्ज करताना उत्पन्नाचा दाखला, डोमोसाईल प्रमाणपत्र लागत होते. त्याची उपलब्धता वेळेवर झाली नाही. आणि लोकांना अर्ज देखील करता आलेला नाही. त्यामुळे म्हाडाला याबाबतचा मोठा फटका बसलेला आहे. परंतु आता उमेदवारांना या कागदपत्रांची पूर्तता करता यावी, यामुळे 6 जून पर्यंत अर्ज करण्याचा कालावधी वाढवलेला आहे.
[blockquote content=”तीन महिन्यांत दोन वेळा मुदतवाढ देऊनही केवळ ३० हजार जणांनी अर्ज केले आहेत. येत्या सहा जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र त्यानंतर पुन्हा मुदतवाढ देण्यात येणार नाही. येत्या २६ जूनला सदनिकांची सोडत होणार आहे.” pic=”” name=”- अशोक पाटील, मुख्य अधिकारी, ‘म्हाडा’”]