फोटो सौजन्य: Gemini
या परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी सुमारे वर्षभरापूर्वी शासनाकडे आवश्यक रक्कम भरून सोलर पंपासाठी अर्ज केला होता. मात्र, ठरलेली मुदत संपूनही संबंधित कंपनीकडून अद्याप कोणतेही साहित्य मिळालेले नाही. यामुळे शेतकऱ्यांची अडचण वाढली आहे.
Ahilyanagar News: मनपा निवडणुकीत दादा- भैयांची प्रतिष्ठा पणाला! खासदार लंके यांची एकाकी लढत
दरम्यान, गेल्या महिन्यात कंपनीच्या एका व्हेंडरने एका शेतकऱ्याला—जे स्वतः पत्रकार आहेत—फोन करून सोलर पंप बसवण्यासाठी येत असल्याचे सांगितले आणि साहित्य कुठे ठेवले आहे, अशी विचारणा केली. यावर संबंधित शेतकऱ्याने तीव्र संताप व्यक्त करत अद्याप कोणतेही साहित्य मिळाले नसल्याचे सांगितले. तेव्हा व्हेंडरने, कंपनीच्या रेकॉर्डनुसार साहित्य पोहोचल्याचा मेसेज शेतकऱ्याला गेला असल्याचे सांगितले. या घटनेमुळे कंपनीच्या कामकाजातील मोठा सावळागोंधळ उघड झाला आहे.
या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर कंपनीच्या प्रतिनिधींनी पंधरा दिवसांत साहित्य देऊन सोलर पंप बसवण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी शेतकऱ्यांना खड्डे खोदण्यास सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून खड्डे खोदून ठेवले; मात्र आता महिना उलटून गेला तरी कंपनीकडून कोणतीही हालचाल झालेली नाही. सध्या कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांचे फोनही उचलत नसल्याने ही सरळसरळ फसवणूक असल्याचा आरोप बळावत आहे.
Ahilyanagar News: मनपा निवडणुकीत दादा- भैयांची प्रतिष्ठा पणाला! खासदार लंके यांची एकाकी लढत
या प्रकरणी कृषी विभाग आणि संबंधित शासन प्रशासन कोणती ठोस कारवाई करणार, याकडे संपूर्ण पाथर्डी तालुक्याचे लक्ष लागले आहे.






