मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातील नाट्यमय घडामोडींनतर एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. तर देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली. शपथ घेतल्यानतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. काल मंत्रीमंडळ बैठकीत सचिवाना अनेक सूचना केल्या. तसेचं काही निर्णयही घेण्यात आले.
दरम्यान अशातचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयात राज्यातील आपत्ती विषयक व्यवस्थापनाचा आढावा घेणारी बैठक सुरू झाली आहे. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव तसेच विविध विभागांचे सचिव तसेच हवामान विभाग, रेल्वे, बेस्ट, पालिका, लष्कराच्या तीनही दलाचे अधिकारी, जेएनपीटी आदींची उपस्थिती आहे.
[read_also content=”मंत्रीपदावरून शिंदे गटात रस्सीखेच; पत्ता कट होण्याची संजय शिरसाटांना भिती https://www.navarashtra.com/maharashtra/from-the-ministerial-post-to-the-shinde-group-sanjay-shirsat-fears-that-the-address-will-be-cut-nrdm-299448.html”]