कल्याण : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर नकली वाघ अशी टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेनंतर मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्र्यांच्या या वक्तव्यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. ही निवडणूक वाघाची डीएनए टेस्ट आहे. कोण असली कोण नकली वाघ हे लवकरच कळेल.
मनसे आमदारांच्या उद्धव ठाकरे यांना सल्ला
एक नरेटीव केले जात आहे. एक भाऊ लढत असताना दुसरा भाऊ पाठिंबा देत नाही. आम्ही वारंवार बघतोय एवढ्या घटना राजकीय घडल्या असताना उद्धव ठाकरे यांनी राज साहेबांना फोन करून साधी विचारणा सुद्धा केली नाही. त्यांच्या घराशेजारी शपथविधी होता. त्यावेळी त्यांना सांगण्यात आले नाही तुमचे राजकारण करा मात्र नरेटीव सेट करू नका. लोकांपुढे जाऊन हे बोलू नका आमच्याकडे सुद्धा बोलण्यासारखे खूप आहे. तुम्ही विचारणार पण नाही मग आमचे राजकारण आम्ही करू नये का? त्यामुळे राज साहेबांनी आत्तापर्यंत घेतलेल्या निर्णयापैकी हा निर्णय आहे. फडणवीस आणि शिंदे साहेबांनी हाऊसमध्ये वेगवेगळ्या निवडणुका राज्यसभा विधानसभा आमचे समर्थन मागितले. त्यामुळे मी हे बोललो होतो असे मनसे आमदार राजू पाटील यांनी सांगितले.
26 तारखेनंतर महायुती उमेदवारांसाठी मेळावा घेणार मनसे आमदार राजू पाटील
26 तारखेनंतर अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. चार तारखेपर्यंत शेवटचा दिवस आहे त्यामुळे 26 तारखे नंतरच आम्ही मेळावा घेऊ. महायुतीचे उमेदवार आमच्या मेळाव्यात असतील. राज ठाकरे यांच्या सभा होणार की नाही याविषयी अद्याप स्पष्ट नसले तरी किमान चार-पाच सभा होतील अशी शक्यताही पाटील यांनी यावेळी व्यक्त केली आहे.
डॉक्टर श्रीकांत शिंदे आमदार राजू पाटील यांच्यात जो कलगी तुरा रंगला होता याविषयी पाटील यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सांगितले की, मी काही पर्सनल अजेंडा घेऊन कलगीतुरा केला नाही. जे काही बोललो ते कामावरून बोललो होतो मी विरोध केला म्हणून त्यांच्या कार्यालयात ही कामे दिसून येत आहेत तसेच त्यांनी माझ्या मतदारसंघात जास्त विकास निधी दिला आहे.
कल्याण ग्रामीणमध्ये पिंपळेश्वर मंदिरात आगरी समाजातर्फे सामूहिक लग्न सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमानिमित्त मनसे आमदार राजू पाटील उपस्थित होते. यादरम्यान त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.