मुंबई : आज सकाळी ईडीने (ED) संजय राऊत (Sanjay raut) यांच्या घरी छापेमारी करत तब्बल नऊ तास चौकशी केली. पत्राचाळ (Patrachawal) पुनर्विकास प्रकरणी राऊतांना ईडीने ताब्यात घेतले आहे. राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री या निवासस्थानी (Bhandup maître house) त्यांची चौकशी सुरू होती. ईडीच्या नऊ तासांच्या चौकशीनंतर (ED nine hours inquiry) संजय राऊतांना ताब्यात घेतले गेलेय. त्यानंतर राऊत ईडीच्या कार्यालयात गेले असून, ईडीच्या कार्यालयातून राऊतांची प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यानंतर संजय राऊतांना ईडीने ताब्यात घेतल्यानंतर राऊतांचे बंधू सुनिल राऊतांनी (sunil raut) यांनी माध्यमासमोर येत काही खुलासे केले आहेत.
[read_also content=”इस्लामपुरात राज्यपालांच्या विरोधात पुरोगामी समविचारी पक्ष संघटनेचे आंदोलन https://www.navarashtra.com/maharashtra/progressive-like-minded-party-organization-protests-against-governor-in-islampur-nrps-310260.html”]
दरम्यान, खासदार संजय राऊत यांची चौकशीनंतर त्यांना दक्षिण मुंबईतील ईडी कार्यालयात नेण्यात आले. या दरम्यान ईडीला या प्रकरणाशी संबंधित कोणतीही कागदपत्रे किंवा पुरावे मिळाली नाहीत, अशी माहिती संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांनी दिली आहे. त्यामुळं ईडीची कारवाई चुकीचं असल्याचं सुद्धा संजय राऊतांचे बंधु सुनिल राऊत यांनी म्हटलं आहे.