शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचं (Maharashtra Cabinet) खाते वाटप पूर्ण झाल्यानंतर शिंदे गटात (Shinde Group) नाराजीचा सूर उमटल्याची चर्चा होती. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी आपल्या खात्याबद्दल काहीशी नाराजी व्यक्त केली होती. परंतु आता शिंदे गटातील आठ मंत्र्यांना अतिरिक्त खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे असलेल्या खात्यांची जबाबदारी या आठ मंत्र्यांवर देण्यात आली आहे.
[read_also content=”गुलाम नबी आझाद यांचा काँग्रेसला धक्का; प्रचार समिती प्रमुखपदाचा राजीनामा https://www.navarashtra.com/latest-news/ghulam-nabi-azads-blow-to-congress-cause-resignation-from-the-post-of-campaign-committee-chief-nrgm-316917.html”]
दरम्यान एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार स्थापन झाल्यानंतर तब्बल 40 दिवसांनी मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला. पहिल्या टप्प्यात भाजप आणि शिंदे गटाकडून प्रत्येकी नऊ अशा एकूण 18 मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासह 20 जणांचं हे मंत्रिमंडळ आहे. त्यानंतर आता शिंदे गटातील आठ मंत्र्यांकडे अतिरिक्त खात्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
कोणाकडे कुठलं अतिरिक्त खातं
मंत्री अतिरिक्त खातं
उदय सामंत – माहिती आणि तंत्रज्ञान
शंभूराज देसाई – परिवहन
दादा भुसे – पणन
संजय राठोड – सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
तानाजी सावंत – सहाय्यमृद व जलसंधारण
अब्दुल सत्तार – आपत्ती व्यवस्थापन
दीपक केसरकर – पर्यावरण आणि वातावरणीय बदल
संदीपान भुमरे – अल्पसंख्याक व औकाफ