चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला (File Photo : Fire)
गारगोटी : कोल्हापूर जिल्ह्याच्या भुदरगड तालुक्यातील आकुर्डे येथे गारगोटी-कडगाव मुख्य रस्त्यावर सायंकाळी सातच्या सुमारास चारचाकी वाहनाने अचानक पेट घेतला. या आगीत चारचाकी कार पूर्णपणे जळून खाक झाली. यात वाहनाचे मोठे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी टळली. मात्र, कारचे यामध्ये मोठे नुकसान झाले.
नित्तवडे (ता. भुदरगड) येथील दत्तात्रय धनाजी तरवडेकर हे आपल्या कुटुंबियांसह कोल्हापूर येथे गेले होते. कोल्हापूरहून परत येत असताना आकुर्डे येथे पोहोचल्यावर अचानक गाडीच्या इंजिनमधून धूर येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखत त्यांनी तात्काळ गाडी थांबवली आणि क्षणाचाही विलंब न करता गाडीत बसलेल्या सर्व कुटुंबीयांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले.
हेदेखील वाचा : Surat Fire Incident : सुरतच्या राज टेक्सटाईल मार्केटमध्ये भीषण आग, आठव्या मजल्यापर्यंतच्या अनेक दुकानं जळून खाक
दरम्यान, अवघ्या काही क्षणांतच त्या चारचाकीने अचानक पेट घेतला. आगीच्या तीव्रतेमुळे चारचाकी पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेनंतर परिसरात धावपळ उडाली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी धाव घेतली. आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले; मात्र, तोपर्यंत वाहनाचे मोठे नुकसान झाले होते. या घटनेमुळे काही काळ वाहतुकीवरही परिणाम झाला.
कापड बाजाराला भीषण आग
दुसऱ्या एका घटनेत, गुजरातच्या सुरतमधील कापड बाजारात काही दिवसांपूर्वीच भीषण आग लागल्याची घटना समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार शहरातील पर्वत पाटिया परिसरातील राज कापड मार्केटमध्ये आग लागली. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १५ हून अधिक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. सुरतचे मुख्य अग्निशमन अधिकारी बसंत पारीक यांनी या प्रकरणी सांगितले, सुमारे २० ते २२ अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग पूर्णपणे आटोक्यात आली आहे आणि कूलिंगचे कामही सुरू आहे.
हेदेखील वाचा : Ratnagiri News: चिपळूणमध्ये हृदयद्रावक घटना! मुलं होत नसल्याच्या तणावातून विवाहितेची आत्महत्या






