ठाणे : निवडणूक आयोग निवडणूका घेत असते जेव्हा निवडणुका व्हायच्या तेव्हा त्या होतील मात्र आपल्याला लोक का सोडून जातायत याचा विचार कधी करणार आहात की नाही. इतकी लोकं सोडून गेली याचं आत्मपरीक्षण करा, असा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. मंगेश सातमकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकेकाला काय फोडता हिम्मत असेल तर निवडणुका घ्या, असे आवाहन मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह भाजपाला केलं होतं या आव्हानाला खासदार शिंदे यांनी प्रत्युत्तर दिल.
पुढे बोलताना शिंदे म्हणाले, नीलम गोऱ्हे मनीषा कायंदे, मंगेश सातमकर यांच्यासारखे मातब्बर नेते सोडून जातात याचा आत्मपरीक्षण करणार की नाही, असा सवाल खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना केला. आपण साडेतीन वर्ष अगोदर ज्या काही गोष्टी सत्तेसाठी केल्या, तडजोड केली, बाळासाहेबांच्या विचाराची मोडतोड केली त्यानंतर इतके लोक आपल्याला सोडून जातात. तरीही मीच कसं बरोबर आहे रोज समोर जाऊन सांगावं लागतंय आपण बरोबर असतं तर इतके लोक सोडून गेले नसते, आपण आधी स्वतःचे आत्मपरीक्षण करावं असा सल्ला खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना दिला.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत इतिहास रचला जाईल – श्रीकांत शिंदे
येणारी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शिवसेना भाजपा व अजित पवार यांचा गट एकत्र लढेल. जास्तीत जास्त नगरसेवक या निवडणुकीत निवडून येतील व मुंबई महानगरपालिकेत इतिहास होईल असा दावा खासदार श्रीकांत शिंदे यांनी केलाय. यावेळी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लक्ष केल. मुंबई महापालिकेतील बावीस हुन अधिक नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केलाय. येणाऱ्या काळात ही संख्या वाढत जाणार आहे. आत्तापर्यंत बीएमसी मध्ये भ्रष्टाचार झालाय कोविडमध्ये देखील कॅगने ताशेरे ओढलेत. मेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाण्याचा जो प्रकार आहे तो सगळे प्रकार समोर येतील एसआयटीच्या चौकशीत आणखी भरपूर गोष्टी बाहेर येतील, असं देखील श्रीकांत शिंदे यांनी सांगितले.