अहमदाबाद विमान अपघाताचा पुण्यात दिसून आला परिणाम; दोन विमानांची उड्डाणं रखडली (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
नागपूर : बेलोरा विमानतळावरून प्रवासी विमानसेवेचे उद्घाटन बुधवारी (दि.16) मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत होणार आहे. विमानतळावर रात्रीचे विमान उतरवण्याची सुविधा ऑक्टोबरपर्यंत सुरू होऊ शकते.
सर्व हवामान ऑपरेशन्स आणि इन्स्ट्रुमेंट फ्लाईट रूल्ससाठी नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून परवानगी घ्यावी लागेल. रात्रीच्या लँडिंगसाठी आवश्यक असलेली यंत्रणा जूनपर्यंत कार्यान्वित होऊ शकते. डीजीसीएकडून परवानगी मिळाल्यानंतर ऑक्टोबरपर्यंत विमानतळावर रात्रीच्या विमान उतरवण्याची सुविधा उपलब्ध होईल.
तसेच बेलोरा विमानतळावरून लवकरच सुरत, अहमदाबादपर्यंत विमान प्रवासाची सेवाही सुरु करण्यात येईल, अशी माहिती महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीच्या उपाध्यक्षा आणि व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडे यांनी दिली.
एकाच वेळी दोन विमाने उतरण्याची सोय
बेलोरा विमानतळाला अधिकृतपणे सार्वजनिक वापरासाठी विमानतळ परवाना मिळाला आहे. 1992 मध्ये, विमानतळ ‘ब्राउन फिल्ड’ विमानतळ म्हणून विकसित करण्यास सुरुवात झाली. या विमानतळावरून प्रवासी विमान सेवा सुरू होत असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. जरी त्यात काही विलंब होत असला तरी, प्रादेशिक कनेक्टिव्हिटी स्कीम अंतर्गत विमानतळाचे व्यावसायिक सुविधेत रूपांतर करण्यात आले आहे.
पश्चिम विदर्भाच्या विकासाची दारे उघडणार
हे विमानतळ विदर्भाच्या विशेषतः पश्चिम विदर्भाच्या अर्थव्यवस्था, व्यापार, पर्यटन आणि हवाई संपर्कासाठी महत्त्वाचे ठरेल. उडान योजनेअंतर्गत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने विकसित केलेले हे विमानतळ केवळ पायाभूत सुविधाच प्रदान करणार नाही. तर उद्योग, व्यापार आणि प्रवाशांसाठी एक सुवर्ण प्रवेशद्वार देखील बनेल. यामुळे प्रादेशिक हवाई संपर्काच्या एका नवीन युगाची सुरुवात झाली आहे. ज्यामुळे अमरावती आणि संपूर्ण प्रदेशासाठी प्रगतीची नवी दारे उघडतील.