मध्य आणि हार्बर मार्गावर रात्रीच्या विशेष फेऱ्या, असं असेल लोकलचे वेळापत्रक (फोटो सौजन्य-X )
राज्यात गणेश चतुर्थी उत्सव जेवढ्या जल्लोशात साजरा केला जातो, तेवढ्याच उत्सहात गणपथी विसर्जन देखील केले जाते. विशेषतः मुंबईत विसर्जनासाठी हजारोंची गर्दी रस्त्यावर जमा होते. यंदा १७ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी येत असून या दिवशी भाविकांच्या सोईसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. १७/१८ सप्टेंबरच्या रात्री गणेश विसर्जनासाठी घराबाहेर पडणाऱ्या मुंबईकर भाविकांचा प्रवास सुखकर व्हावा यासाठी विशेष लोकल गाड्या चालवल्या जाणार आहेत.
विसर्जनादिवशी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेवर लोकलच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहे. या गाड्या चर्चगेट आणि विरार दरम्यान १७ आणि १८ च्या मध्यरात्री सोडल्या जातील. या रेल्वेगाड्यांचे वेळापत्रक पश्चिम रेल्वेकडून जाहीर करण्यात आले आहे. त्याचबरोबर 14 ते 16 सप्टेंबर या 3 दिवसांत एकूण 22 रात्रकालीन विशेष लोकल फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. या विशेष फेऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, सीएसएमटी-ठाणे-सीएसएमटी आणि सीएसएमटी-पनवेल-सीएसएमटी या मार्गांवर असतील. शनिवार, रविवार आणि मंगळवारी मध्यरात्रीनंतर या लोकल धावणार आहेत.
सीएसएमटी ते कल्याण – 1.40 आणि 3.25 (प्रत्येक दिवशी 2 फेऱ्या)
सीएसएमटी ते ठाणे – 2.30
कल्याण ते सीएसएमटी – 12.05
ठाणे ते सीएसएमटी – 1.00आणि 2.00 (प्रत्येक दिवशी 2 फेऱ्या)
सीएसएमटी ते पनवेल – १.३०, २.४५
पनवेल ते सीएसएमटी – १.००, १.४५
भाविकांच्या सोयीसाठी महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड (एमएमएमओसीएल) ने देखील पाऊल उचलले आहे. गणपती उत्सवादरम्यान मेट्रो ट्रेनची दैनंदीन सेवेचा वेळ वाढवण्याची घोषणा मेट्रो प्रशासनाकडून करण्यात आली आहे. यानुसार गणेश उत्सवाच्या काळात अंधेरी पश्चिम आणि गुंदवली या दोन्ही टर्मिनल्सवर शेवटची मेट्रो 11 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर दरम्यान रात्री 11.30 वाजेपर्यंत धावणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तसेच यावेळी दोन्ही टर्मिनल्सवरून रात्री 11.15 आणि 11.30 वाजता अतिरिक्त गाड्या सोडण्यात येत आहेत. गुंदवली आणि दहिसर (पूर्व) तसेच अंधेरी (पश्चिम) आणि दहिसर (पूर्व) स्थानकांदरम्यानही काही सेवा विस्तारित केल्या जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. रात्री उशिरा उत्सवात सहभागी होणारे नागरिक मेट्रो सेवेद्वारे व्यवस्थित घरी परतू शकतील यासाठी हे बदल करण्यात आले आहेत.