गँस सिलेंडरसाठी धावाधाव...! गँस सिलेंडरने जाग्या केल्या कोरोनातील आठवणी
महेश कांबळे, म्हसवड: सध्या गल्लीपासुन ते अगदी दिल्ली पर्यंत राहणार्या प्रत्येक नागरीकांची सध्या घरगुती गँस सिलेंडर मिळवण्यासाठी धावाधाव सुरु आहे. दिवसभर लाईनमध्ये थांबुनसुध्दा सिलेंडर मिळेल कि नाही याची खात्री नसल्याने अनेक ठिकाणी एजन्सीच्या बाहेरच नागरीकांनी ठिय्या मांडल्याचे समोर येत आहे, असेच चित्र जवळपास सर्वत्र दिसु लागल्याने गँस सिलेंडर मिळवणे हे एक दिव्य बनल्याच्या प्रतिक्रिया नागरीकांतुन येत आहेत, असेच दिव्य नागरीकांना कोरोना काळातही ऑक्सीजन बेड मिळवण्यासाठी पार पाडावे लागल्याचे आता अनेक नागरीक सांगत असुन घरगुती गँस सिलेंडरने पुन्हा एकदा कोरोना काळातील कटु आठवणींना उजाळा दिला असल्याचेही अनेक नागरिक सांगत आहेत.
सध्या मध्य आखाती देशांमध्ये गत काही दिवसांपासुन युध्द सुरु आहे, या युध्दाचे गंभीर परिणाम संपूर्ण जगावर होवु लागले आहेत, आखाती देशातील युध्दामुळे संपूर्ण जगाला इंधन तुटवडा जाणवु लागला आहे. आपल्या देशालाही हा इंधन तुटवडा चांगलाच जाणवु लागल्याने देशातील व राज्यातील सरकारने व्यावसायिक व इंडस्ट्रीज ला लागणारा गँस पुरवठा बंद केला असुन फक्त घरगुती गँस सिलेंडर पुरवठा सुरु ठेवला आहे, व्यावसायिक गँस सिलेंडर मिळणे बंद झाल्याने मोठमोठ्या शहरातील रेस्टॉरंट बंद होवु लागलेत तर शहरांसह ग्रामीण भागातील अनेक हॉटेल चालकांनी चुली मांडल्या असुन त्यातुन ते आपला व्यवसाय करु लागले आहेत, तर इंडस्ट्रीज ला लागणारा गँस पुरवठा बंद झाल्याने अनेक ठिकाणच्या छोट्या मोठ्या कंपन्या ठप्प झाल्या असुन तेथील कामगार वर्ग हातावर हात धरुन बसले आहेत हे चित्र सर्वत्रच दिसु लागल्याने सामान्य जनता पुरती भयभीत झाली आहे, अशातच एक दिवस घरगुती गँस सिलेंडर ही मिळणे बंद होईल अशी भिती आता सर्वसामान्य जनतेला वाटु लागली आहे, त्यातच गँस पुरवठा करणार्या कंपनींने घरगुती गँस सिलेंडर मिळवण्यासाठी आता काही अभी व शर्ती लागु केल्याने सामान्य जनता अधिकच गोंधळलेली आहे.
तर गँस सिलेंडर पुरवठ्यातुन काळा बाजार होवु नये याची खबरदारी म्हणुन गँस एजन्सीने घरपोच सिलेंडर पुरवठा बंद करुन तो एजन्सीतुनच सुरु ठेवल्याने नागरीकांची सिलेंडर मिळवण्यासाठी धावाधाव सुरु आहे. गँस सिलेंडर मिळवण्यासाठी बुकींगची आवश्यकता केली असल्याने एकाचवेळी संबंधित नंबर वर हजारो, लाखो ग्राहक बुकींगसाठी फोन करु लागले आहेत त्यामुळे बुकिंग यंत्रणाही कोलमडली आहे, अनेकांचे बुकिंगच होत नसल्याने नागरींकांच्या भितीत वाढ झाली आहे. युध्द परिस्थिती अशीच काही दिवस अशीच सुरु राहिली तर एक दिवस घरगुती गँस सिलेंडर मिळणेही बंद होईल अशी भिती सामान्य जनतेत निर्माण झाली असल्यानेच गँस सिलेंडर मिळवण्यासाठी धावाधाव सुरु आहे.
रोज सकाळी लवकर उठुन नागरिक एजन्सीसमोर सिलेंडर मिळवण्यासाठी लांबच लांब रांगा लावत आहेत, दिवसभर रांगेत थांबुनही सिलेंडर मिळेल याची शाश्वती नसल्याने लोकं पँनिक होत आहेत, प्रशासनाकडुन सिलेंडर साठी कोणीही पँनिक न होण्याचे आवाहन केले जात असले तरी मिळेल कि नाही ही भितीच नागरीकांना पँनिक करीत आहे.गँस सिलेंडर मिळवण्यासाठी लागलेल्या रांगेत सिलेंडर पुढे मागे करण्यावरुन नागरीकांच्यात झुंपत असल्याचे चित्र सर्वत्रच आहे. काही ठिकाणी तर सिलेंडर वाटप हे पोलीस बंदोबस्ताद सुरु आहे.ही परिस्थिती पाहुन आता अनेकांना कोरोना काळ आठवु लागला असुन कोरोना काळातही नागरीकांची ऑक्सीजन बेड मिळवण्यासाठी अशीच धावाधाव सुरु होती, त्यावेळीही असे बेड मिळवण्यासाठी नागरिक दिवसरात्र रुग्णालयाच्या आवारात चकरा मारीत होते, तर बेड उपलब्ध होईपर्यंत रुग्णालयाच्या आवारातच मुक्काम ठोकत होते, अशीच परिस्थिती आज घरगुती गँस सिलेंडर मिळवण्यासाठी सुरु असल्याचे दिसुन येत असल्याने सिलेंडर ने कोरोना काळातील कटु आठवणींना पुन्हा एकदा उजाळा दिला असल्याचे बोलले जात आहे.






