'प्रामाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा?' ; तुकाराम मुंढेंनी अखेर मौन सोडलं
IAS Tukaram Munde News: भाजप आमदार कृष्णा खोपडे यांनी वरिष्ठ सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांच्यावर गंभीर आरोप करत थेट विधीमंडळात त्यांच्या निलंबनाच्या कारवाईची मागणी केली होती. याच दरम्यान त्यांना अनेकदा धमकीचे फोनही करण्यात आल्याचा आरोप खोपडे यांनी केला. या सगळ्या घडामोडींवर अखेर तुकाराम मुंढे यांनी मौन सोडले आहे. ‘एका प्रमाणिक अधिकाऱ्याला कितील त्रास द्यायचा,’ असा सवाल तुकाराम मुंढे यांनी केला आहे.
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत तुकाराम मुंढे यांनी त्यांच्याविरोधात सुरू असलेल्या कारवायांवर भाष्य केलं आहे. “एका प्रमाणिक अधिकाऱ्याला किती त्रास द्यायचा. मी नागपुरात असताना काही लोकांना मनमानी कारभार होऊ दिला नाही. तेव्हापासूनच माझ्या विरोधात कटकारस्थाने रचून मला त्रास दिला जाताहे. जे खोटे आरोप लावण्यात आले, त्यांची चौकशी झाली. पण तिथेही मला क्लिनचीट मिळाली. तरीही वारंवार तेच आरोप करून मला मानसिक त्रास दिला जात आहे. ही एका प्रमाणिक अधिकाऱ्याची हर्रासमेंट आहे.” असं तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
“मी नागपूरमध्ये कार्यरत असताना माझ्या कार्यकाळात अनेकांनी मला काम करू दिले नाहीत. माझ्या कामांमध्ये अडथळे आणण्यात आले. खोटे आरोप करून माझ्या मागे चौकश्या लावण्यात आल्या. तरी माझ्यावर वांरवार तेच आरोप कऱण्यात आले. मी झुकलो नाही, म्हणून माझ्या विरोधात महिलांना समोर करून खोटे आरोप लावले. ‘ असा आरोपही यावेळी तुकाराम मुंढे यांनी केला.
कोबीची भाजी खायला आवडत नाही? मग सकाळच्या नाश्त्यात १० मिनिटांमध्ये बनवा झणझणीत कोबी पराठा, नोट करा
नागपूर महापालिकेत अनेक वर्षांपासून बेकायदेशीररित्या नोकरी करणाऱ्या १७ कर्मचाऱ्यांच्या २००१ पासून प्रलंबित असलेल्या वेतनाच्या फाईलवर स्वाक्षरी करण्यासाठी एका नेत्याने माझ्यावर दबाव टाकला. पण मला हे प्रकरण संशयास्पद वाटल्यामुळे संपूर्ण प्रकरणाची विभागामार्फत चौकशी करण्याचे आदेश दिले. शासनाच्या नियमाप्रमाणे बेकायदेशीररित्या काम करणाऱ्या सर्व १७ जणांना नोकरीतून बडतर्फ केले. बडतर्फ केलेल्या १७ जणांपैकी एक जण एका स्थानिक आमदाराच्या जवळचा नातेवाईक आहे. त्यामुळे त्या आमदाराने माझ्या विरोधात मोहिम उघडली. ज्या प्रकरणात मला आधीच क्लिनचीट मिळाली आहे. तेच आरोप माझ्यावर पुन्हा पुन्हा केले जात आहेत.’ असंही तुकाराम मुंढे यांनी सांगितले.
तुकाराम मुंढे यांच्या या प्रतिक्रीयांवर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील भाष्य केलं आहे. ” तुकाराम मुढे हे प्रामाणिक आहेत की नाहीत, ते इमानदार आहेत की नाहीत. नागपूर महापालिकेत काम करत असताना आयुक्तांनी तुकाराम मुंढेंना क्लिनचीट दिली आहे. त्यावेळी महिला आयोगाकडेही तक्रार करण्यात आली होती. पण ज्या महिलेने तक्रार केली होती. तिलाच आयोगाने दंड ठोठावला, हेही पाहून घ्या. केंद्रीय महिला आयोदानेही क्लीनचीट दिली आहे. त्यामुळे तुकारम मुंढए यांच्यावर जे आरोप केले जात आहेत. ते कोणाच्या स्वार्थासाठी केले गेले. त्याचीही मुख्यंत्र्यांनी सखोल चौकशी करावी. सत्य परिस्थिती तपासून ज्याची चूक असेल त्याच्यावर कारवाई करावी. पण जर मुंढे निर्दोष असतील तर कुठल्याही दबावाखाली कारवाई होऊ नये.”






