जत – कर्नाटकचे (Karnatka) मुख्यमंत्री बसवराज बोम्मई (Basavaraj Bommai) यांनी एक गाव काय? बेळगाव, कारवार, निपाणीचा एक तुकडा देखील महाराष्ट्राला देणार नाही, उलट सांगलीच्या काही गावांवर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दावा केला आहे. त्यामुळं राज्यातील वातावरण तापले आहे. महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकार (Shinde fadnavis government) सीमा प्रश्नासाठी काहीच करत नसल्याचा आरोप केला जात असून, मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्या वक्तव्यावरुन शिंदे-फडणवीस सरकारवर (Shinde fadnavis government) तसेच केंद्रातील भाजपावर टिका केली जात आहे. त्यामुळं महाराष्ट्र-कर्नाटक वाद पुन्हा पेटला असून, सांगलीच्या जतमधील काही गावांना कर्नाटकने पाणी सोडले आहे. तसेच काही गावं कर्नाटकमध्ये जाण्यास इच्छुक असल्याची माहिती समोर येत आहे.
[read_also content=”मोदी आणि शाहांनी दररोज ‘एवढे’ चालून दाखवावे, काँग्रेसचे भाजपाला आव्हान https://www.navarashtra.com/india/modi-and-shah-should-be-walk-every-day-congress-challenge-to-bjp-350852.html”]
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शुक्रवारी म्हैसाळ पाणी प्रकल्पावरुन तातडीची बैठक घेत, जत तालुक्यातील गावांना पाणी कमी पडू देणार नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं होतं. दरम्यान, म्हैसाळ पाणी प्रकल्प नाही झाला तर…आम्ही कर्नाटकमध्ये सहभागी होऊ असा इशारा जतमधील काही गावांनी दिला आहे. जत तालुका पाणी संघर्ष समितीनं पुन्हा आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.
20 डिसेंबरपर्यंत पाणीप्रश्न मार्गी न लागल्यास आम्ही कर्नाटकात जाणार आहोत. तसेच 20 डिसेंबरनंतर पुन्हा आंदोलन करणार असल्याचं जत तालुका पाणी संघर्ष समितीनं म्हटलं आहे. पाणी प्रश्न मार्गी न लागल्यास कर्नाटकात जाण्यासाठी प्रत्येक गावातून एनओसी गोळा करणार असल्याचं देखील जत तालुका पाणी संघर्ष समितीनं म्हटलं आहे. तसेच त्वरित म्हैसाळ पाणी प्रकल्पाला गती देण्याची मागणी जत तालुका पाणी संघर्ष समितीनं मागणी केली आहे.