नीलम गोऱ्हे यांची बाजू सावरत संजय शिरसाट यांनी ठाकरे गटावर निशाणा साधला(फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : भंडारा जिल्हातील गोंदिया येथे महिलेवर झालेला सामुहिक अत्याचाराचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. त्या पीडित महिलेला न्याय मिळायलाच हवा, यासाठी देशभरात लवकरात लवकर शक्ती कायदा लागू करणे आवश्यक असल्याचे मत विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी व्यक्त केले. गुरुवारी सकाळी पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विरोधीपक्षाकडून भंडारा जिल्ह्यातील या पाशवी कृत्यावर स्थगन प्रस्तावाची मागणी कऱण्यात आली, त्यावेळी उपसभापती बोलत होत्या.
मदतीचे आश्वसान देऊन भंडाऱ्या जिल्ह्यातील ३५ वर्षीय महिलेवर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात दोन आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन केला. अत्याचार केल्याची घटना धक्कादायक घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी हलगर्जीपणा केला असून कारधा पोलीस ठाण्यातील संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि सदर महिलेला न्याय मिळावा अशी सुचना नीलम गोऱ्हे यांनी केली.
[read_also content=”अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील १७ रस्त्यांसाठी ४२ कोटी निधी मंजूर : आमदार सचिन कल्याणशेट्टी https://www.navarashtra.com/maharashtra/42-crore-fund-approved-for-17-roads-in-akkalkot-assembly-constituency-mla-sachin-kalyanshetty-nrdm-317430.html”]
तसेच सध्या महिलेची प्रकृती अत्यंत चिताजनक आहे. तिच्यावर शस्त्रक्रियाही सुरू असून सर्व उपचार हे मोफत व्हावेत, याची काळजी राज्य सरकारने घ्यावी आणि त्याबाबतची माहिती सभागृहात द्यावी, असेही गोऱ्हे यांनी पुढे सांगितले. तसेच महिलांवरील वाढते अत्याचार पाहता शक्ती कायदा लवकरात लवकर अमलात आणावा, अशी मागणीही केंद्राकडे गोऱ्हेंनी केली.