माथेरान : ब्रिटीश काळापासून अमानवी प्रथा म्हणून प्रचलित असलेल्या हात रिक्षाद्वारे माणसाला माणूस खेचतो असे विधारक चित्र स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव साजरा करणाऱ्या आपल्या देशात आज देखील असून देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे विर हुतात्मा भाई कोतवाल यांचे जन्मस्थान असलेल्या माथेरानमध्ये मा.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राबविण्यात आलेला या ई-रिक्षा संदर्भातील पायलट प्रोजेक्टचा अहवाल सनियंत्रण समिती तसेच राज्य शासनाकडून तात्काळ सादर करण्याच्या मागणीसाठी दि.१६ रोजी पासून बेमुदत रिक्षा बंद ठेऊन देखील या संदर्भात न्याय न मिळाल्याने अखेर आज दि. १९ रोजी रिक्षा चालक मालक संघटनेच्या वतीने आमरण उपोषण सुरु केले आहे.
यावेळी ई-रिक्षाचा मुद्दा माथेरानकरांच्या दृष्टीने महत्वाचा विषय असल्याने उपोषण स्थळी माथेरानकरांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवून या उपोषणाला पाठींबा दर्शविला आहे. सकाळी ११ वाजल्यापासून माथेरानच्या श्रीराम चौकात सुरु झालेल्या उपोषणात अध्यक्ष शकील पटेल, उपाध्यक्ष प्रकाश सुतार, सचिव सुनिल शिंदे व संघटनेचे कार्यकर्ते जहुर चिपाडे हे उपोषणकर्ते बसले असुन ई रिक्षाचा अहवाल राज्य शासन तसेच सनियंत्रण समितीकडुन मा.सर्वोच्च न्यायालयात १ महीन्याच्या आत दाखल करणे गरजेचे असताना ७ महीने उलटुन देखील मा. सर्वोच्च न्यायालयात ई रिक्षाचा अहवाल सादर न केल्याने व या विषयात चालढकल होत असल्याने येथील जेष्ठ नागरीक, दिव्यांग व्यक्ती, शालेय विद्यार्थी यांचे आतोनात हाल होत आहेत. यासाठी संनियत्रण समितीने सदर अहवाल मा.सर्वोच्च न्यायालयात तात्काळ सादर करण्यासाठी राज्य शासन व सनियंत्रण समितीच्या विरोधात बेमुदत उपोषण सुरु केले आहे. यावेळी मोठ्या प्रमाणात पालकवर्ग, महीला संघटना, बचत गट तसेच राजकीय पक्ष विविध सामाजिक संघटनांनी या उपोषणाला जाहीर पाठींबा दर्शविला आहे.






