महाराष्ट्रातील शिवसेना विरुद्ध शिवसेना प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाच्या पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाने उद्धव ठाकरेंना मोठा दणका दिला आहे. उद्धव ठाकरे यांचे सरकार बहाल करू शकत नाहीत, कारण त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता, असे न्यायालयाने म्हटले आहे.या निर्णयांनंतर भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी उद्धव ठाकरेंवर कडाडून टीका केली आहे.
पंतप्रधान मोदीजींचा फोटो लावून तुमचे आमदार निवडून आले आणि नंतर कांग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले… तेंव्हा उद्धव ठाकरेंनी मतदारांचा विश्वासघात केला. ही लोकशाहीची हत्या नाही का ? बरं सुप्रीम कोर्टानं स्पष्टच केलंय,
तुम्ही राजीनामा दिल्यामुळे सरकार पडलं. आता… — Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) May 11, 2023
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
तुम्ही राजीनामा दिल्यामुळे सरकार पडलं. आता पुन्हा तुम्हाला मुख्यमंत्री करता येणार नाही. म्हणजे चूक तुमचीच,शस्त्र तुमच्या हातात… हत्या तुम्हीच केलीय आणि आता लोकशाहीच्या नावानं गळे काढताय, पंतप्रधान मोदीजींचा फोटो लावून तुमचे आमदार निवडून आले आणि नंतर कांग्रेस राष्ट्रवादीच्या मांडीला मांडी लावून बसले… तेंव्हा उद्धव ठाकरेंनी मतदारांचा विश्वासघात केला. ही लोकशाहीची हत्या नाही का ? बरं सुप्रीम कोर्टानं स्पष्टच केलंय,
तुम्ही राजीनामा दिल्यामुळे सरकार पडलं. आता पुन्हा तुम्हाला मुख्यमंत्री करता येणार नाही. म्हणजे चूक तुमचीच,शस्त्र तुमच्या हातात… हत्या तुम्हीच केलीय आणि आता लोकशाहीच्या नावानं गळे काढताय..केवढा हा निर्लज्जपणा…असे चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे.