संग्रहित फोटो
पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी परीक्षेचा निकाल उद्या ( ५ मे ) रोजी ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. दुपारी १ वाजल्यापासून mahresult.nic.in, mahahsscboard.in, hscresult.mkcl.org या संकेतस्थळावर हा निकाल पाहता येणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. या परिपत्रकात निकालासंदर्भात आणि गुणपडताळणीच्या संदर्भात माहिती देण्यात आली आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ. १२ वी) परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार दिनांक ०५ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.
असा पहा निकाल