राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप-शिंदे सरकारसोबत सत्तेत सहभागी होत, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे सत्तानाट्य पाहायला मिळाले. राजकारणात कधीही काहीही होऊ शकते. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात एक अध्याय लिहिला गेला. रविवारी महाराष्ट्राच्या राजकारणात ( Maharashtra Power Politics) मोठा भूकंप घडला. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये देखील उभी मोठी फूट पडली आहे. यानंतर राष्ट्रवादी कोणाची यावरुन वाद सुरु आहे, तर अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांनी पक्ष व निवडणूक चिन्हावर आपला दावा केला आहे.या सर्व घटनेनंतर आता राष्ट्रवादीच्या एका आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे.
राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके म्हणाले, सत्तेत सहभागी होण्यापूर्वी साहेबांना विचारायला आम्ही जावं, असंही आम्हाला वाटत होतं. तिथे सुप्रिया ताईसुद्धा होत्या. तिथे प्रफुल्ल पटेल, दिलीप वळसे पाटील आणि छगन भुजबळ हे सर्व वरिष्ठ नेतेही होते. या सर्वांनीच जर हा निर्णय घेतला असेल तर तो निर्णय योग्यच असेल, असे त्यांनी सांगितले.