ह्रदयद्रावक! वीजेचा धक्का लागून शेतकरी पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू, वरुड गावावर शोककळा
जालन्यात एक ह्रदयद्रावक घटना घडली आहे. शेतीच्या कामासाठी शिवारात गेलेल्या शेतकरी कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. शिवारात विद्युत तारेचा स्पर्श होऊन पित्यासह दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. विनोद मस्के असं वडिलांचं नाव असून मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धा मस्के या चिमुकल्यांना जीव गमवावा लागला आहे. या घटनेने गावावर शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
Akkalkot Accident : अक्कलकोटला जाणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, बस-ट्रकची धडक, 3 जणांचा जागीच मृत्यू
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, विनोद मस्के नेहमी प्रमाणे आपल्या मुलांसह शेतीच्या कामासाठी शिवारात गेले होते. मुलगा समर्थ आणि मुलगी श्रद्धाही सोबत होती. मात्र विजेचा धक्का लागून तिघांचाही मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी मस्के यांच्या शिवारात धाव घेतली. तिघांनाही तात्काळ जालन्यातील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
पुन्हा एक ‘वैष्णवी’! कुपवाडमध्ये विवाहितेने केली आत्महत्या, धार्मिक रितीरिवाज पाळण्यासाठी दबाव
सध्या मस्के कुटु्ंबातील तिघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहेत. या ह्रदयद्रावक घटनेमुळे वरुड गावासह शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. दरम्यान सध्या पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांकडून शेतातील कामे लगबगीने आटोपली जात आहेत. शेतात ओलावा आहे, त्यातून विद्युतभारीत तारा तुटण्यासारख्या घटना घडत आहेत.