जुन्नर तालुक्यात बिबट्याची दहशत(फोटो-सोशल मीडिया)
The number of leopards has increased in Junnar taluka : जुन्नर तालुका हा बिबट्यांच्या वाढत्या संख्येमुळे नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यात बिबट्या-मानव संघर्षाच्या घटना नित्याच्या झाल्या असून आता ही भीती ग्रामीण भागातील लोकांच्या धार्मिक जीवनावरही परिणाम करत आहे. गावकरी पहाटेच्या वेळी मंदिरात ‘काकडा भजनासाठी’ जाण्यासही घाबरत आहेत, ज्यामुळे गावागावात परिसरामध्ये एक भयवह चित्र निर्माण झाले आहे.
जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये आजही पहाटे ४ ते ५ या वेळेत मंदिरात एकत्र जमून ‘काकडा भजन’ करण्याची जुनी परंपरा आहे. थंडीत किंवा इतर वेळीही पहाटेच्या शांत वातावरणात ग्रामस्थ भक्तीभावाने मंदिरात जातात. मात्र, याच वेळी बिबट्यांची शिकार करण्याची शक्यता सर्वाधिक असल्याने, अनेक गावांमध्ये काकडा भजनाला जाणाऱ्या वृद्ध आणि महिलांच्या मनात मोठी दहशत निर्माण झाली आहे. पारंपारिक भक्तीच्या मार्गात बिबट्याची भीती मोठा अडथळा ठरत आहे.यामुळे आता गावातील शांतता बिघडली असून, ग्रामस्थ बिबट्याच्या भीतीने एकत्र आल्याशिवाय घराबाहेर पडायला घाबरत आहेत. काही गावांनी तर नाईलाजाने काकडा भजनाची वेळ उशिरा करण्याची योजना आखली आहे, ज्यामुळे त्यांच्या परंपरेत खंड पडत आहे.
हेही वाचा : पिंपरीत ऐन दिवाळीत महापालिकेची जप्तीची कारवाई; थकबाकीदारांचे धाबे दणाणले
दरम्यान बिबट्यांच्या वारंवार होणाऱ्या हल्ल्यांमुळे आणि त्यांच्या मानवी वस्तीमधील वाढत्या संचारामुळे वन विभागासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. ग्रामस्थांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी वन विभागाला अधिक प्रभावी उपाययोजना करणे गरजेचे आहे. बिबट्यांपासून संरक्षण करण्यासाठी काय करावे आणि काय करू नये, याबाबत सातत्याने जागरूकता मोहिम वनविभागाकडून वेळोवेळी राबविण्यात येत आहे. तरी पण पहाटेच्या वेळी, विशेषतः भजनाच्या वेळेस, गावात आणि मंदिर परिसरात वन विभागाने गस्त वाढवावी, अशी मागणी गावकरी करत आहेत. जुन्नरमधील ही परिस्थिती केवळ वन्यजीव आणि मानवी संघर्ष दाखवत नाही, तर लोकांच्या रोजच्या जीवनातील लहान-सहान गोष्टींवरही या संघर्षाचा कसा परिणाम होतो, हे स्पष्ट करते.
हेही वाचा : महापालिका सार्वत्रिक निवडणूक तयारीला वेग; प्रभागनिहाय मतदार याद्यांच्या विभाजनाच्या कामाची सुरुवात
पहाटेचा बिबट्या आणि काकडा भजनाची वेळ दररोज पहाटे चार ते सहा या वेळेत जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये विठ्ठल मंदिरात आणि अन्य देवस्थानमध्ये पारंपारिक काकडा भजनाला सुरुवात होते. यावेळी भाविक मोठ्या संख्येने एकत्र येत असतात मात्र हीच वेळ बिबट्याच्या शिकारीसाठी अत्यंत अनुकूल असते बिबट्या हा प्रामुख्याने पहाटेच्या अंधारात सक्रिय असतो त्यामुळे काकडा भजनासाठी घराबाहेर पडणाऱ्या भक्तांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे जुन्नर तालुक्यात बिबट्याचा वावर पुन्हा एकदा वाढल्यामुळे ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. भजनासाठी मंदिरात जाण्याची इच्छा असूनही, जिवाची भीती बाळगण्याची वेळ आता जुन्नरच्या ग्रामस्थांवर आली आहे.