किरीट सोमय्या यांची संजय राऊत यांच्यावर टीका (फोटो- सोशल मिडिया)
मुंबई: राज्यामध्ये महायुतीचे दुसऱ्यांदा सरकार आल्यानंतर सर्व नेते ॲक्शनमोडमध्ये आले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाचा कारभार हाती घेतल्यानंतर अनेक महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत. यानंतर आता फडणवीस यांचे सरकार ‘लव्ह जिहाद’बाबत निर्णय घेणार आहे. महाराष्ट्रमध्ये याबाबत कायदा आणला जाणार आहे. याबाबत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक देखील घेतली. यावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी देखील प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
राज्यामध्ये अनेकदा ‘लव्ह जिहाद’च्या अनेक केसेस समोर आणल्या आहेत. या प्रकरणांमध्ये कारवाई करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने शुक्रवारी (दि.14) राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेतली आहे. महायुती सरकारने यासंबंधीचा एक शासन निर्णय देखील जारी केला आहे. पोलीस महासंचालक यांच्या नेतृत्वाखाली तसेच सात सदस्यांची समिती देखील स्थापन केली आहे. मात्र विरोधक याला विरोध करताना पाहायला मिळत आहेत.
महाराष्ट्र सरकारने लव्ह जिहादविरुद्ध समिती स्थापन केल्याबद्दल भाजप नेते किरीट सोमय्या म्हणाले, “लव्ह जिहादवर कायदा झालाच पाहिजे. महाराष्ट्रात तरुणींचे शोषण केले जात आहे. त्यांची छळवणूक होत असल्याने असा कायदा आवश्यक आहे. ” दरम्यान लव्ह जिहादवर कायदा आणण्यासाठी समिती स्थापन केल्यानंतर ठाकरे गटाने याचा विरोध केला आहे. खासदार संजय राऊत यांनी यावर टीका केली आहे.
हेही वाचा: देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय! महाराष्ट्रात ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात कायदा आणणार
यावर बोलताना किरीट सोमय्या म्हणाले, “संजय राउत यांचे धर्म परिवर्तन झाले आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंच्या सोबत हिरवा पोशाख घालण्यास सुरुवात केली आहे. मी घाटकोपरला गेलो होतो. आठ मशिदीवर लाऊडस्पीकर लागले होते. त्यापैकी कोणालाही त्याची परवानगी नव्हती. ”
#WATCH | Mumbai, Maharashtra | On Maharashtra government forming a committee against love jihad, BJP leader Kirit Somaiya says, "… This type of law is necessary to stop the ongoing bullying in Maharashtra because young girls are being exploited… Sanjay Raut has also been… pic.twitter.com/9mI6SrWTG0
— ANI (@ANI) February 15, 2025
यापूर्वी देखील महायुतीमधील नेत्यांनी लव्ह जिहाद’ विरोधात आवाज उठवला आहे. तसेच या संदर्भात कठोर पाऊले उचलण्याची गरज असल्याचे देखील सांगितले आहे. लव्ह जिहादबाबत राज्यामध्ये कायदा असल्याची गरज असल्याचे मत यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले होते. बळजबरीने होणारे धर्मांतर, विशेष करून आंतरधर्मीय लग्नाच्या माध्यमातून होणारे धर्मांतर (लव्ह जिहाद) रोखण्यासाठी लवकरच कायदा करू, असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पूर्वी व्यक्त केले होते.
हेही वाचा: महाकुंभमेळ्यामध्ये अजूनही 2 हजार नागरिक बेपत्ता? शिवसेनेच्या नेत्यांच्या दाव्याने उडाली एक खळबळ
संजय राऊत काय म्हणाले?
खासदार संजय राऊत म्हणाले की,”हे सरकार कामाच्या नावावर मत मागू शकत नाही फसवणूक करून, निवडणूक आयोगाला हाताशी धरून विजय मिळवतात. त्यामुळे हे अशा घोषणा करत राहणार. लव्ह जिहाद च्य नावाने वातावरण खराब करीत आहेत. भाजपाकडील काही भाषण माफिया हे ठरवणार का? लव्ह जिहाद झाला म्हणून,” असा घणाघात खासदार राऊत यांनी केला आहे.