कक्ष सुरू झाल्यापासून आजपर्यंत जिल्ह्यातील एकूण 2 हजार 197 रुग्णांना 16 कोटी 26 लाख 16 हजार रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री सहायता निधीतून वितरित केली आहे. कर्करोग, हृदयरोग, मूत्रपिंडाचे विकार, अपघातातील गंभीर दुखापती, तसेच इतर महागडे उपचार आवश्यक असलेल्या रुग्णांना या निधीचा थेट फायदा झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. समन्वय कक्षामुळे जिल्ह्यातील गरीब व मध्यमवर्गीय रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी प्रत्यक्षात अधिक प्रभावी ठरत असल्याचे चित्र समोर आले आहे. पुढील काळातही हा उपक्रम अधिक व्याप्ती वाढवून कार्यरत राहील, अशी माहिती संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.
रुग्णांना निधी वितरणाबरोबरच कक्षाने देणगी संकलनातही पुढाकार घेतला आहे. विविध सामाजिक संस्था, नागरिक, उद्योगसमूहांकडून मिळालेल्या मदतीतून 120लाख 3 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधीकडे जमा करण्यात आले आहेत. या रकमेमुळे अधिक रुग्णांना मदत पुरवणे शक्य झाले आहे. पूर्वी निधी मिळवण्यासाठी रुग्णांना अनेक पायऱ्यांतून जावे लागायचे. कागदपत्रांची पडताळणी, रुग्णालयांशी संवाद, उपचार खर्चाचे अंदाजपत्रक, जिल्हास्तरवरील मंजुरी या सर्व प्रक्रियांना विलंब होत असे. मात्र समन्वय कक्ष उभारल्यानंतर सर्व कामे एकाच खिडकीतून (वन-स्टॉप सिस्टीम) पार पडत असल्याने उपचार सहाय्य प्रक्रिया जलद झाली आहे.
अनेक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयानी कक्षाच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले आहे. वेळेत मिळालेल्या सहाय्यामुळे अनेकांना महत्त्वाचे उपचार घेणे शक्य झाले आहे. जिल्ह्यातील खासगी आणि शासकीय रुग्णालयांशी समन्वयही अधिक सुगम झाला असून, अधिकारीही तत्परतेने कागदपत्रांची पूर्तता करून देत असल्याचे प्रशासनाने सांगितले.
Ans: मुख्यमंत्री सहायता निधीतून रुग्णांना आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकार्यांच्या कार्यालयात तयार केलेला वन-स्टॉप (One-Stop) कक्ष आहे. येथे कागदपत्रे, रुग्णालयाशी समन्वय, तसेच निधी मंजुरीची प्रक्रिया जलद केली जाते.
Ans: कक्ष सुरू झाल्यापासून 2,197 रुग्णांना एकूण 16 कोटी 26 लाख 16 हजार रुपये वितरित करण्यात आले आहेत.
Ans: साधारणपणे– रुग्णाचे आधारकार्ड डॉक्टरांकडून दिलेले प्रमाणपत्र उपचार खर्चाचे अंदाजपत्रक उत्पन्न प्रमाणपत्र (तपशील रुग्णालय/कक्षानुसार बदलू शकतात.)






