फोटो सौजन्य: iStock
कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज शहरातील ८१ जागांवर मतदान प्रक्रिया सुरू आहे. एकूण २० प्रभागांमधून साडेतीनशेहून अधिक उमेदवार आपले राजकीय भविष्य आजमावत असून, मतदारांमध्ये मोठी उत्सुकता पाहायला मिळत आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक आणि शांततेत पार पडावी यासाठी प्रशासनाकडून कडक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. मतदानाच्या पार्श्वभूमीवर १३ जानेवारीपासून जाहीर प्रचारावर पूर्णतः बंदी घालण्यात आली होती. यामध्ये प्रत्यक्ष प्रचारासह सोशल मीडियावरील प्रचारालाही स्पष्ट मनाई करण्यात आली होती.
मात्र, या बंदीला न जुमानता काही उमेदवारांनी फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सअॅप स्टेटसच्या माध्यमातून अप्रत्यक्ष प्रचार सुरूच ठेवल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे निवडणूक आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या प्रकाराची गंभीर दखल घेत सायबर पोलीस आणि निवडणूक प्रशासनाने संबंधित उमेदवारांवर कारवाईचा इशारा दिला असून, नियम तोडणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशाराही देण्यात आला आहे.
Maharashtra Politics: “टपाली मतदानाच्या पेट्या स्ट्रॉंगरूममधून…”: उद्धव ठाकरेंचा आयोगावर गंभीर आरोप
कोल्हापूरचे खासदार शाहू छत्रपती महाराज, भाजपा खासदार धनंजय महाडिक, काँग्रेसचे विधान परिषद गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. माहितीनुसार, कोल्हापुरात 81 जागांसाठी सकाळी 11.30 वाजेपर्यंत 22.45 टक्के मतदान झाले आहे.






