आमदार राजेश क्षीरसागर यांची कर्नाटक सरकारवर टीका (फोटो- सोशल मिडिया)
कोल्हापूर: आज शिसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदघेऊन अनेक विषयांवर भाष्य केले आहे. गांधी मैदानावरून त्यांनी टीका केली आहे. अत्यंत प्रामाणिकपणे गांधी मैदानसाठी मी 5 कोटी मंजूर करून आणले, होते असे आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले. आमदार राजेश क्षीरसागर नेमके काय म्हणाले हे जाणून घेऊयात.
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, “नाल्यात गादी, पोती टाकून पाणी थांबवण्याचे घाणेरडे राजकारण ज्या पद्धतीने करण्यात आले त्याचा मि निषेध करतो. कोल्हापूर महापालिका आणि पोलीस प्रशासनाला कारवाई आणि चौकशीचे आदेश दिले आहेत. काही समाजकंटकाकडून गाद्या आणि पोती टाकून पाणी थांबवण्यात आले आहे. घाणेरडे राजकारण करण्याला देखील मर्यादा हव्यात.”
पुढे बोलताना आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, “तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तात्काळ पाच कोटीचा निधी दिला होता. मात्र चांगल्या गोष्टींना विरोध करायचा यासाठी नाला गाद्या आणि पोती टाकून अडवण्यात आला.त्यानंतर निधी चुकीचा वापरला जात आहे अशी टीका करायची.”
अलमट्टी प्रकरणावर काय म्हणाले राजेश क्षीरसागर?
महाराष्ट्र आणि कर्नाटक हे दोन्ही राज्य एकाच देशाचा भाग आहे. अलमट्टी धरणाची ऊंची वाढवल्याने महाराष्ट्रातील गावांचे नुकसान होणार असेल तर कर्नाटक सरकारने विचार केला पाहिजे.
अलमट्टी धरणाच्या उंची वाढवण्याच्या कर्नाटक सरकारच्या निर्णयाचा निषेधार्थ कुर्डूवाडी पालिका चौकात शेतकरी नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्रित येऊन कर्नाटक सरकारचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला.आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारला अलमट्टी धरण उंची वाढीला त्वरित स्थगिती देण्याची मागणी केली, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन उभे करण्याचा इशारा दिला आहे.
Almatti Dam: अलमट्टी धरण उंचीवाढीच्या विरोधात शेतकरी-नागरिक आक्रमक; कर्नाटक सरकारचा पुतळा जाळला
अलमट्टी धरणाच्या उंचीवाढीला विरोध वाढला
पावसाळ्यात अनेक ठिकाणी महापुराच्या घटना घडतात. त्यातीलच पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांना महापुराचा फटका बसतो. पश्चिम महाराष्ट्रात महापूरची स्थिति निर्माण होते. त्याला कर्नाटक सरकार जबाबदार आहे. कर्नाटक राज्यातील अलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूरला पुराचा फटका बसतो. सध्या या धरणाची ऊंची ५१९ मीटर इतकी आहे. मात्र आता कर्नाटक सरकारने या धरणाची ऊंची वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे सांगली-कोल्हापूरवर महापूरचे संकट वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती.
कर्नाटकच्या आडमुठ्या भूमिकेवर आक्षेप
अलमट्टीच्या उंची वाढवण्याबाबत कर्नाटकच्या आडमुठ्या भूमिकेवर आक्षेप घेऊन महायुती सरकारने एकप्रकारे त्याला मूक संमती दिल्याचे चित्र होते. मात्र ५ मीटरने अलमट्टीची उंची वाढवल्यास पाणी शिरोळ बंधाऱ्यापर्यंत येण्याची शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकार अभ्यासाच्या भूमिकेतून बाहेर येऊन कर्नाटकच्या निर्णयाला विरोध करणार की सांगली-कोल्हापूरला पुराच्या खाईत लोटणाऱ्या निर्णयाचे मूक साक्षीदार बनणार होते, असे चित्र निर्माण झाले होते.