कोल्हापुरात कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू; पीपीई किट नसल्याने अंत्यसंस्कार करण्यास पालिका कर्मचाऱ्यांचा नकार
कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून देशासह राज्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातच कोल्हापूरमध्ये कोरोनाचा पहिला बळी गेला आहे. एका कोरोनाबाधित 75 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. गेल्या चार दिवसांपासून सीपीआय रुग्णालयामध्ये या महिलेवर उपचार सुरू होते. दरम्यान पालिका कर्मचाऱ्यांनी पीपीई किट नसल्याने संबंधित महिलेवर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ दोघेही कोल्हापूरचे आहेत. त्यामुळे त्यांच्या जिल्ह्यात अशी अवस्था असल्यामुळे संताप व्यक्त होतं आहे.
पावसाळा स्पेशल पदार्थ! थंडगार वातावरणात वाफाळत्या भातासोबत खाण्यासाठी झटपट बनवा गरमागरम टोमॅटो सार
दरम्यान देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या 3783 वर पोहोचली आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 22 मे रोजी भारतात 157 रुग्ण होते. 9 दिवसांत कोरोनाच्या रुग्णांमध्ये 1372 टक्के वाढ झाली आहे. केरळमध्ये सर्वाधिक 1400 रुग्णांची नोंद झाली आहे. तर महाराष्ट्रात 485 आणि दिल्लीत 436 रुग्णांची नोंद झाली आहे. कोरोनामुळे जानेवारीपासून आतापर्यंत 29 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसांत २2 जणांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र-केरळमध्ये सर्वाधिक 8 आणि ७ जणांचा मृत्यू झाला आहे.
शनिवारी कोरोनाच्या 68 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर जानेवारी 2025 पासून मुंबईत एकूण 749 रुग्ण आढळले आहेत. जानेवारीपासून राज्यात आतापर्यंत 9592 कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र सरकारने दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मेमध्ये केलेल्या वर्गीकरणानुसार, LF.7 आणि NB.1.8.1 या उपप्रकारांना देखरेखीखालील प्रकार म्हणून वर्गीकृत केले आहे, म्हणजेच त्यांना अद्याप चिंताजनक प्रकार किंवा स्वारस्यपूर्ण प्रकार म्हणून मानले गेले नाही. तथापि, भारत आणि चीन आणि आशियाच्या इतर भागांमध्ये वाढत्या संसर्गात हेच प्रकार जबाबदार असल्याची शंका आहे.
नवीन उपप्रकारांचा उदय झाला असूनही, JN.1 प्रकार सर्वात प्रभावी राहिला आहे, जो देशभरातील सर्व सकारात्मक प्रकरणांपैकी ५३% आहे. इंडियन SARS-CoV-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) च्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये तामिळनाडूमध्ये NB.1.8.1 चा एक रुग्ण आढळला होता, तर या महिन्याच्या सुरुवातीला गुजरातमध्ये LF.7 चे चार रुग्ण आढळले होते.
विषाणूचे स्वरूप आणि लक्षणे सूक्ष्मपणे बदलत असताना, आरोग्य अधिकारी जनतेला स्वच्छता, गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरणे आणि वेळेवर चाचणी यासह सावधगिरीचे उपाय राखण्याचे आवाहन करत आहेत. रुग्णालयात दाखल होणे कमी असले तरी, सतर्क राहण्याच्या सूचना करण्यात येत आहेत.