Lonavala Rain Update: लोणावळ्यात ४८ तासांत १,२९० मिमी पाऊस; गेल्या १२ वर्षांतील जुलै महिन्याचा चौथा मोठा रेकॉर्ड
Lonavala Rain Update: उपनगरांसह जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर पावसाचा जोर मंगळवारीही कायम राहिला. घाट परिसरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस झाल्याने लोणावळ्यात अवघ्या ४८ तासांत तब्बल १ हजार २९० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापैकी गेल्या २४ तासांतच ६२० मिलिमीटर पाऊस कोसळला. दरम्यान, पुणे शहरातील जुलै महिन्यातील एकूण पर्जन्यमान ३०९.१ मिलिमीटरवर पोहोचले असून, २०१४ नंतरच्या काळातील जुलैमधील हा चौथा सर्वाधिक पाऊस ठरला आहे.
हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत पुणे शहर आणि परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची नोंद झाली. पावसामुळे शहरातील प्रमुख रस्ते आणि सखल भागांमध्ये पाणी साचून जनजीवन विस्कळित झाले, मंगळवारी सकाळी आठ वाजेपर्यंत चिंचवड येथे सर्वाधिक २६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. चिंचवडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी २०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.
Ashadhi Ekadashi 2026: चंद्रभागा नदीमध्ये स्नान करण्याचे काय आहे महत्त्व, जाणून घ्या
चिचबडनंतर दापोडी येथे १२५.५. एबाग येथे ११५.६. शिवाजीनगर येथे १७.५ आणि एनडीए परिसरात ९५.५ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला,
विशेष म्हणजे पाषाणमध्ये जुलै महिन्यात सलग दोन दिवस १०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पहण्याची ही ऐतिहासिक घटना ठरण्याची शक्यता आहे.
सलग कोसळणाऱ्या अतिवृष्टीमुळे नद्या-नाले दुथडी भरून वाहत असून अनेक भागांत पूरस्थिती निर्माण झाली आहे. धरणाच्या पाणीपातळीतही झपाट्याने वाढ होत आहे.
घाटमाथ्यावर झालेल्या विक्रमी पावसामुळे भूस्खलन आणि दरडी कोसळण्यांचा घोका वाढला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सतर्क केल्या आहेत. नागरिकांनी धरण क्षेत्र, नदीकाठ आणि घाट परिसरात पर्यटनासाठी जाऊ नये तरीच अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
IIM Nagpur: १८० कोटींची जमीन अवघ्या १ रुपयात? पुण्यात उभारल्या जाणाऱ्या आयआयएमच्या नव्या कॅम्पसमध्ये
घाटमाथ्यावर अतिवृष्टीचा कहर सुरू असतानाच लोणावळ्यात सोमवारी अवध्या २४ तासांत ६७० मिलिमीटर पावरजची नोंद झाली. भारतीय हवामानशास्त्र विभाग (आयएमडी) आणि केंद्रीय जल आयोगाच्या (सीडब्ल्यूसी) आयएमडी सीडब्ल्यूसी अॅटलस-२०१५मधील विश्लेषणानुसार हा पाऊस सुमारे हजार वर्षांतून एकदा अनुभवायला मिळणाऱ्या अतिवृष्टीच्या पातळीपेक्षाही अधिक असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे पश्चिम घाटातील ही नोंद हवामानशास्त्रीयदृष्ट्या अत्यंत मानली जात आहे. तर दुसरीकडे याच कालावधीत पुणे शहरातील शिवाजीनगर वैद्यशाळेत १०८.४ मिलिमीटर पावसाची नौद झाली. जुलै महिन्यात २४ तासांत झालेल्या पावसाचा हा चौथा सर्वाधिक उच्चांक ठरला आहे. यापूर्वी १९५८ मध्ये १३०.४ मिमी, १९६७ मध्ये ११७.९ मिमी आणि २०१४ मध्ये ११४.१ मिमी पावसाची नोद झाली होती.
पुणे शहरातील यंदाच्या मान्सून हंगामातील एकूण पाऊस ३०९.१ मिलिमीटरवर पोहोचला आहे. हे संपूर्ण नान्सून हंगामाच्या सरासरीच्या जवळपास ५० टक्के आहे. २०१४ नंतर जुलै महिन्यातील हा चौथा सर्वाधिक पाऊस ठरला आहे. यापूर्वी २०१९ मध्ये ३६९.१, २०२२ मध्ये ३८६.२ आणि २०२४ मध्ये ३९४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. हवामान विभागाच्या आकडेवारीच्या विश्लेषणानुसार, २०२२ पासून दर एक वर्षांआड पुणे शहरात जुलै महिन्यात ३०० मिलिमीटरपेक्षा जास्त पाऊस पडण्याचा कल दिसून येत आहे.






