महाराष्ट्रामधील लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्याचे मतदान सुरु आहे. महाराष्ट्राच्या या शेवटच्या टप्प्यातील १३ मतदार संघामधील संध्याकाळी ५ वाजेपर्यत सुमारे 8.66 टक्के मतदान झाले आहे. धुळे जिल्ह्यामध्ये संध्याकाळी ५ वाजेपर्यत 48.81 टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान हे दिंडोरी मतदार संघांमध्ये झाले आहे. दिंडोरी येथे संध्याकाळी ५ वाजेपर्यत 57.06 टक्के मतदान झाले आहे. तर सर्वात कमी मतदान हे कल्याण भिवंडी मतदार संघांमध्ये झाले आहे. कल्याण मतदार संघात फक्त 41.70 टक्के मतदान झाले आहे.
मुंबईमध्ये आज पाचव्या टप्प्यातील मतदान पार पडले. लोकसभेच्या सहा जागांसह १३ मतदार संघांमध्ये आज मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानुसार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सुमारे 8.66 टक्के मतदान झाले. त्यात धुळे 48.81 टक्के, दिंडोरी 57.06 टक्के,नाशिक 51.16 टक्के, पालघर 54.32 टक्के, भिवंडी 48.89 टक्के, कल्याण 41.70 टक्के, ठाणे 45.38 टक्के, मुंबई उत्तर 46.91 टक्के, मुंबई उत्तर मध्य 47.32 टक्के, मुंबई उत्तर पूर्व 48.67 टक्के, मुंबई उत्तर पश्चिम 49.79 टक्के, मुंबई दक्षिण 44.22 टक्के, मुंबई दक्षिण मध्य 48.26 टक्के मतदान झाले आहे.
[read_also content=”अजब कहाणी! कल्याण पश्चिमेत 1 लाख मतदारांची नावे गायब – शिवसेना शहर प्रमुख रवी पाटील https://www.navarashtra.com/maharashtra/strange-story-names-of-1-lakh-voters-are-missing-in-kalyan-west-shiv-sena-city-chief-ravi-patil-535854.html”]
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील काही मतदारसंघामध्ये शिवसेना विरुद्ध भाजप अशी लढत झाली आहे. त्यामुले आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. कल्याण आणि ठाणे लोकसभा मतदार संघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट अशी लढत झाली आहे. तर भिवंडी आणि दिंडोरीची जागा महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मिळाली होती.