शरद पवार - अजित पवार एकत्र येणार (फोटो- सोशल मिडिया)
पिंपरी: विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पुन्हा एकदा शरद पवार आणि अजित पवार एकत्र येण्याबाबत वक्तव्य केले आहे. पण त्यांना कुणीतरी एकत्र येऊ देत नाही. त्यांच्यात मिठाचा खडा टाकण्याचं काम कुणीतरी करत असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे. तो मिठाचा खडा कोण टाकणारा आहे, ते पत्रकारांनी शोधून काढावं, मात्र आगामी काळात नक्कीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसतील अशी आशा अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.
अण्णा बनसोडे यांच्या प्रयत्नातून पिंपरी- चिंचवडच्या वल्लभ नगर बस डेपोला नव्या कोऱ्या पाच एसटी बस शासनाकडून मिळाल्या आहेत. त्याच उद्घाटन अण्णा बनसोडे यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी अण्णा बनसोडे यांनी स्वतः एसटी बसचं सारथ्य केलं. विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी एसटी बसचं स्टिअरिंग हातात घेतलं.
राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत दोन दिवसांपूर्वी शरद पवार वक्तव्य केलं होत. या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत उत्सुकता लागली आहे. याबाबतचे सर्व अधिकार हे सुप्रिया सुळे यांना दिल्याचं बोललं जात आहे. यावर विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी परखड मत व्यक्त केलं आहे.” माझी आधीपासून शरद पवार आणि अजित पवारांनी एकत्र यावं अशी भूमिका आहे.” आता दोन्हीकडील आमदार आणि खासदारांची भूमिका देखील तीच आहे.
शरद पवार आणि अजित पवार एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या विकासाला गती मिळेल. एकत्र येण्याबाबत आमच्यात काही चर्चा झालेली नाही. या दोघांमध्ये मिठाचा खडा टाकण्याचं काम कुणीतरी करत आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश येणार नाही. आगामी काळात नक्कीच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र दिसतील अशी आशा देखील अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केली आहे.
शरद पवार अजित पवार एकत्र येणार…?
राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवासांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट ही कौंटुबिक फूट आहे. त्यामुळे ते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. पण त्यांच्या या विधानामुळे मात्र राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
Sharad Pawar-Ajit Pawar News: शरद पवार अजित पवार एकत्र येणार…?शिंदे गटाच्या नेत्याचे सूचक विधान
माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी दोन्ही काँग्रेससोबत युती करणं हेच चुकीचंच होतं. हे आम्ही त्यांना आधीपासूनच सांगत होते. पण आता त्यांना त्याचा प्रत्यय येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवाले तुमच्यासोबत जास्त दिवस राहणार नाहीत. हेच आम्ही त्यांना अनेकदा सांगत होतो. पण आता जसजसे त्यांचे भविष्य अंधारमय होत आहे. तसतसे ते टीका करत आहेत. राष्ट्रवादीतील ही फूट कौटुंबिक मानली जात असली तरी ते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.