Maharashtra Breaking News Updates Today
Maharashtra Breaking News Updates : महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील पिंपरी चिंचवडमधील मोशी परिसरात गुरुवारी मदत आणि बचाव कार्य सुरू होते. बुधवारी एक तीन मजली कचरा व्यवस्थापन प्रकल्प कोसळला होता. आतापर्यंत ढिगाऱ्याखालून एक मृतदेह बाहेर काढण्यात आला आहे. बचाव पथकांनी आतापर्यंत नऊ जणांना यशस्वीपणे जिवंत बाहेर काढले आहे. ही इमारत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या प्रकल्पावर बांधली होती, ज्यावर जुन्या कचऱ्याचा डोंगर कोसळला. ढिगाऱ्याच्या दाबामुळे संपूर्ण इमारत कोसळली आणि तिथे काम करणारे अंदाजे १८ जण गाडले गेले.
11 Jul 2026 06:00 PM (IST)
Hizbul Mujahideen commander Shamsher Khan viral video : जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवाद पसरवण्यासाठी आणि भारताच्या अंतर्गत सुरक्षेला बाधा आणण्यासाठी पाकिस्तान सुरुवातीपासूनच पडद्यामागून कुटील डाव रचत आला आहे. आंतरराष्ट्रीय मंचावर आपण दहशतवादाचे समर्थन करत नाही, असा आव आणणाऱ्या पाकिस्तानाचा खोटेपणा आता पुन्हा एकदा जगासमोर उघडा पडला आहे. विशेष म्हणजे, हा पर्दाफाश कोणत्याही बाह्य एजन्सीने नाही, तर खुद्द पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना ‘हिजबुल मुजाहिदीन’च्या (Hizbul Mujahideen) एका सर्वोच्च कमांडरनेच केला आहे. हिजबुल मुजाहिदीनचा उप-सर्वोच्च कमांडर शमशेर खान (Shamsher Khan) याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्याने काश्मीरमध्ये पाकिस्तानी दहशतवादी सक्रिय असल्याचे आणि त्यांचे मृतदेह तिथल्याच मातीत गाडले गेल्याचे उघडपणे मान्य केले आहे.
11 Jul 2026 05:50 PM (IST)
राज्याच्या राजकारणात सध्या मोठ्या घडामोडी घडताना पाहायला मिळत आहेत. केंद्रात मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मोठी संभाव्य पावले उचलली जात असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्रात मोठे मंत्रिपद मिळणार असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. अश्यातच, शिवसेना (शिंदे गट) समर्थक आमदार बच्चू कडू यांनी याबाबत भूमिका मांडताना मोठं विधान केलं आहे. नागपुरात माध्यमांशी बोलताना त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत जाऊन देशाचं नेतृत्व करावं आणि त्यांच्या अनुपस्थितीत महाराष्ट्राचं नेतृत्व एकनाथ शिंदे यांच्याकडे सोपवावं, अशी मागणी केली.
11 Jul 2026 05:40 PM (IST)
शरीरातील हार्मोन्स हे चयापचय, भूक, झोप, मनःस्थिती, ऊर्जा, वजन, प्रजनन क्षमता आणि शरीरातील अनेक महत्त्वाच्या प्रक्रिया नियंत्रित करतात. मात्र बदलती जीवनशैली, सततचा ताण, अपुरी झोप आणि चुकीच्या आहारामुळे हार्मोन्सचे संतुलन बिघडू शकते. अशा वेळी वारंवार थकवा जाणवणे, मूडमध्ये सतत बदल होणे, वजन वाढणे किंवा कमी होणे, झोपेच्या समस्या आणि एकाग्रतेचा अभाव अशी लक्षणे दिसू शकतात. तज्ज्ञांच्या मते, काही साध्या आणि सोप्या सवयी अंगीकारल्यास हार्मोन्सचे संतुलन राखण्यास मदत होऊ शकते.
11 Jul 2026 05:30 PM (IST)
अभिनेत्री सामंथा रुथ प्रभू आणि अभिनेता नागा चैतन्य यांच्या घटस्फोटाला जवळपास पाच वर्षे झाली आहेत. या काळात सामंथाने नागा चैतन्य किंवा त्याच्या कुटुंबाबाबत सार्वजनिकरित्या फारसे भाष्य केले नव्हते. मात्र, आता तिने नागा चैतन्यचा भाऊ आणि अभिनेता अखिल अक्किनेनीच्या नव्या चित्रपटासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. अखिलचा ‘लेनिन’ हा चित्रपट आज देशभरात प्रदर्शित झाला. यानिमित्त सामंथाने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर चित्रपटाचा ट्रेलर शेअर करत, “‘लेनिन’, अखिल आणि संपूर्ण टीमला मनःपूर्वक शुभेच्छा. हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरो,” अशा आशयाचा संदेश लिहिला. सामंथाची ही पोस्ट समोर आल्यानंतर चाहत्यांमध्ये तिची चांगलीच चर्चा रंगली आहे.
11 Jul 2026 05:20 PM (IST)
जर तुम्ही मुंबईकर असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. मुंबई आणि आसपासच्या शहरांमधील वाढती वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार एक विशेष योजना तयार करत आहे. सरकार अंदाजे ६,०६६ कोटी रुपये खर्च करून जगातील सर्वात मोठे जल-मेट्रो नेटवर्क विकसित करणार आहे. रस्ते आणि रेल्वेवरील ताण कमी करणे, प्रवासाचा वेग वाढवणे आणि पर्यावरणपूरक सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देणे, हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
11 Jul 2026 05:10 PM (IST)
LBSNAA Training Rules 2026: दरवर्षी लाखो तरुण रात्रंदिवस अभ्यास करून यूपीएससी (UPSC) परीक्षेची तयारी करतात. अनेक वर्षांच्या तपश्चर्येनंतर जेव्हा ते अव्वल रँक मिळवून आयएएस (IAS) किंवा आयपीएस (IPS) म्हणून निवडले जातात, तेव्हा त्यांची मेहनत यशस्वी झाल्यासारखी वाटते. पण तुम्हाला माहीत आहे का की, देशातील सर्वात कठीण परीक्षा उत्तीर्ण होणारे हे ‘सुपर माइंड्स’ देखील मसुरी येथील ‘लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय प्रशासन अकादमी’ (LBSNAA – लबासना) मध्ये जाऊन नापास होऊ शकतात? हे ऐकायला जरी धक्कादायक वाटत असले, तरी अकादमीचे नियम आणि रेकॉर्ड काहीसे असेच सांगतात.
11 Jul 2026 05:00 PM (IST)
Alandi News: रौद्ररूप धारण केलेल्या इंद्रायणी नदीचे पाणी अखेर ओसरले असून देहूगाव परिसरातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र, पुराचे पाणी ओसरले असले तरी महापुराने दिलेल्या जखमा कायम आहेत. अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरून संसारोपयोगी साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, लहान व्यावसायिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. Pune Rain
11 Jul 2026 04:57 PM (IST)
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेला उत्तर देताना शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांच्या आरोपांचा खरपूस समाचार घेतला. राज्यातील कायदा व सुव्यवस्था, शेतकरी कर्जमाफी आणि राजकीय हल्ल्यांवर मुख्यमंत्र्यांनी सरकारची बाजू भक्कमपणे मांडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी ‘महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजने’ची मर्यादा ५० हजार रुपयांवरून वाढवून थेट २ लाख रुपये केल्याचे जाहीर केले. वाचा सविस्तर...
11 Jul 2026 04:47 PM (IST)
‘री-नीट यूजी २०२६’ (Re NEET UG 2026) परीक्षा पूर्ण झाल्यानंतर आता लाखो उमेदवार निकाल आणि कटऑफची प्रतीक्षा करत आहेत. अशा परिस्थितीत, ‘सरकारी एमबीबीएस कॉलेजमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी किती गुण सुरक्षित मानले जातील?’ हाच सर्वात मोठा प्रश्न आहे. मागील वर्षांचे ट्रेंड्स आणि कौन्सिलिंगच्या आधारे संभाव्य सेफ स्कोरचा अंदाज काय असू शकतो. चला तर मग जाणून घेऊया
11 Jul 2026 04:37 PM (IST)
डोंबिवलीतील शासकीय रुग्णालयात डॉक्टर आणि नर्सवर झालेल्या मारहाणीच्या घटनेच्या निषेधार्थ भाजपच्या शिष्टमंडळाने शनिवारी रुग्णालयाला भेट देत डॉक्टर व नर्सिंग कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसह रुग्णालयातील आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे भाजप नगरसेवक दीपेश म्हात्रे यांनी सांगितले. वाचा सविस्तर...
11 Jul 2026 04:27 PM (IST)
जागतिक भूराजकीय समीकरणांमध्ये सध्या एक अत्यंत मोठी आणि दूरगामी बदल घडवणारी घडामोड समोर आली आहे. पाकिस्तानसोबतचा सतत वाढणारा सीमावाद, दहशतवादाचे आरोप आणि राजनैतिक कटुता यांच्या पार्श्वभूमीवर, आता अफगाणिस्तानने (Afganistan) भारताकडे मैत्रीचा अत्यंत मजबूत हात पुढे केला आहे. आपल्या पहिल्या अधिकृत भारत दौऱ्यावर आलेले अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे कृषी, सिंचन आणि पशुसंवर्धन मंत्री मौलवी अताउल्लाह ओमारी (Mawlawi Attaullah Omari) यांनी दोन्ही देशांमधील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक संबंधांना एका वेगळ्याच उंचीवर नेणारे वक्तव्य केले आहे. दिल्लीतील एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमादरम्यान बोलताना ओमारी भावूक झाले आणि त्यांनी, “भारत आणि अफगाणिस्तानचा डीएनए (DNA) एकच आहे आणि येथे आल्यावर आपल्याला आपल्याच घरात आल्यासारखे वाटते,” असे मोठे विधान केले.
11 Jul 2026 04:17 PM (IST)
जागतिक स्तरावरील उलथापालथ दरम्यान भारतासाठी एक महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. भारताच्या परकीय चलन साठ्यात पुन्हा एकदा मोठी वाढ नोंदवली गेली आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या ताज्या आकडेवारीनुसार, ३ जुलै २०२६ रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलन साठा ७.२६ अब्ज डॉलरने वाढून ६७४.१९ अब्ज डॉलर झाला आहे. मागील आठवड्यात हा साठा ५.६५४ अब्ज डॉलरने घटून ६६६.९३ अब्ज डॉलर झाला होता. वाचा सविस्तर...
11 Jul 2026 04:07 PM (IST)
साताऱ्यातील पाचगणी परिसरात घरात डोकावल्याच्या संशयातून २४ वर्षीय अक्षय जाधव याला चौघांनी बेदम मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या अक्षयचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पाचगणी पोलिसांनी वेगवान तपास करत अवघ्या २४ तासांत चारही आरोपींना अटक केली असून न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
11 Jul 2026 03:58 PM (IST)
माळीण दुर्घटनेनंतर पुणे जिल्ह्यातील भूस्खलनप्रवण गावांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. मावळ तालुक्यातील पाटण येथे नुकत्याच झालेल्या दुर्घटनेनंतर प्रशासनाच्या पुनर्वसन प्रक्रियेतील विलंब समोर आला आहे. जिल्हा प्रशासनाने दोन वर्षांपूर्वी राज्य शासनाकडे पाठविलेल्या ७२ गावांच्या प्रस्तावांपैकी केवळ ४४ गावांच्या प्रस्तावांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून, उर्वरित २८ गावांचे प्रस्ताव अद्याप प्रलंबित आहेत.
11 Jul 2026 03:44 PM (IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या टी-२० मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना आज, शनिवारी खेळला जाईल. हा सामना साउथम्पटन येथील रोझ बाऊल क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात भारतीय संघासमोर आयसीसी क्रमवारीत जगातील अव्वल टी-२० संघ म्हणून आपले स्थान टिकवून ठेवण्याचे आव्हान असेल. जर इंग्लंडने पाचव्या टी२० सामन्यात भारताला हरवले, तर ते जगातील अव्वल टी२० संघ बनतील. हॅरी ब्रुकच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने उत्कृष्ट कामगिरी दाखवत मालिकेत ३-० अशी आघाडी घेतली आहे. भारत शनिवारी सन्मानासाठी लढण्याच्या आणि आपले अव्वल स्थान टिकवून ठेवण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.
11 Jul 2026 03:33 PM (IST)
जालना जिल्ह्यात भरदिवसा घडलेल्या एका धक्कादायक प्रकाराने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. औद्योगिक परिसरातून जात असलेल्या एका खासगी बसमध्ये घुसून एका तरुणाने प्रवासी तरुणीला जबरदस्ती खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराला बस चालकाने विरोध करताच आरोपीने त्यालाही बेदम मारहाण केली. हा संपूर्ण प्रकार बसमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून बदनापूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
11 Jul 2026 03:22 PM (IST)
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी शरद पवार पक्ष एनडीए मध्ये सामील होणार असल्याच्या चर्चाना उधाण आले आहे. सातत्याने रंगणाऱ्या या चर्चांवरून आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मिश्किल शैलीत नाराजी व्यक्त केली आहे. नाशिकमध्ये यशवंतराव चव्हाण सेंटर आयोजित राज्यस्तरीय युवा पुरस्कार सोहळ्यात बोलताना त्यांनी राजकीय अफवांवर उपरोधिक भाष्य केले.
11 Jul 2026 03:11 PM (IST)
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यातील शेवटचा सामना आज खेळला जाणार आहे. या पाच सामन्यापैकी ३ सामने भारतीय संघाने गमावले असून एक सामना पावसामुळे रद्द झाला. या टी-२० मालिकेनंतर बीसीसीआय अनेक मोठे निर्णय घेण्याची शक्यता आहे . या मालिकेनंतर टीम इंडियाच्या आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यांवरील खराब कामगिरीचा आढावा घेतला जाईल. वृत्तानुसार, गौतम गंभीरच्या सपोर्ट स्टाफमधील दोन सदस्याची नोकरी जाऊ शकते. टीम इंडियाची खराब कामगिरीमुळे हा निर्णय घेणार असल्याची चर्चा आहे
11 Jul 2026 02:59 PM (IST)
अन्न सुरक्षा मानके अधिनियम 2020 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने ही गतिमान कार्यवाही सुरू केली आहे. शालेय स्तरावर अन्न सुरक्षा, स्वच्छता आणि विद्यार्थ्यांना सकस व संतुलित आहार मिळणे अत्यंत आवश्यक आहे. याचे पालन संबंधितांनी केले नाही, तर कठोर कारवाई करण्याचा इशारा या बैठकीत अन्न औषध प्रशासन विभागाचे साहाय्यक आयुक्त पी. आर. सिंगरवाड यांनी दिला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईतही मोहीम सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.
11 Jul 2026 02:49 PM (IST)
शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांची एक कथित आणि वादग्रस्त ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये समोरच्या व्यक्तीला थेट हातपाय तोडण्याची धमकी देण्यात आल्याचे ऐकायला मिळत असल्याने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. अत्यंत अश्लील आणि अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. एवढ्यावरच न थांबता, "तू उद्या जर आला नाहीस, तर पंचायत समितीत येऊन तुझे हातपाय तोडेन," असा सज्जड दम आणि धमकी खासदारांनी दिल्याचे या कथित ऑडिओमध्ये ऐकू येत आहे.
11 Jul 2026 02:40 PM (IST)
भारताच्या परकीय चलनसाठ्यात पुन्हा वाढ नोंदवली गेली आहे. 3 जुलै रोजी संपलेल्या आठवड्यात देशाचा परकीय चलनसाठा 7.26 अब्ज डॉलरने वाढून 674.19 अब्ज डॉलरवर पोहोचला आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेने शुक्रवारी ही माहिती जाहीर केली. मागील आठवड्यात परकीय चलनसाठ्यात 5.65 अब्ज डॉलरची घट होऊन तो 666.93 अब्ज डॉलरवर आला होता. तसेच, 27 फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात भारताचा परकीय चलन साठा 728.49 अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक उच्चांकावर पोहोचला होता. त्यानंतर यात सातत्याने चढ-उतार पाहायला मिळत आहेत.
11 Jul 2026 02:30 PM (IST)
जामीनावर सुटून आलेल्या आरोपीने स्वतःची पत्नी, दोन मुलगे यांच्यासह एक अल्पवयीन बलात्कारपीडिता तिची आई आणि आजी अशा सहा जणांची निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक घटना तेलंगाणामधील रंगारेड्डी येथे आज सकाळी घडली. आरोपीविरोधात पॉक्सो कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेला गुन्हा हे या हत्याकांडामागचे कारण असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत. तेलंगाणा राज्यातील रंगारेड्डी जिल्ह्यामधील दैवलागुडा गावात ही भयंकर घटना घडली आहे. आरोपी राज कुमार याने ज्या सहा जाणांची हत्या केली आहे त्यामध्ये चिट्याला रुक्कम्मा (65), चिट्याला लक्ष्मी (45), एक अल्पवयीन मुलगी (17) यांच्यासह राज कुमारयाची पत्नी सरिता (30) आणि दोन मुलगे परीक्षित (03) आणि दैविकक्षित (02) यांचा समावेश आहे.
11 Jul 2026 02:21 PM (IST)
मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील बोर घाट परिसरात झालेल्या भीषण भूस्खलनामुळे रेल्वे वाहतूक 17 जुलैपर्यंत मोठ्या प्रमाणात विस्कळीतच राहणार आहे. मध्य रेल्वेने 17 जुलैपर्यंत एकूण 30 रेल्वेगाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 14 नियमित (दैनिक) गाड्या, ठराविक दिवशी धावणाऱ्या 8 गाड्या आणि 8 विशेष गाड्यांचा समावेश आहे.
11 Jul 2026 02:10 PM (IST)
शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून आज नांदेड ते पूर्णा रस्त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. तळणी फाटा येथे हे आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळत नाही, सरकारने बी-बियाणे व खताचे दर वाढवल्याने शेतकऱ्यांची मोठी आर्थिक लूट सध्या सुरू आहे. एकीकडे सरकारने निवडून येण्यापूर्वी शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता जाचक अटी टाकून शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचे काम सरकार करत असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केला आहे.
11 Jul 2026 02:00 PM (IST)
आयुष्यात कितीही मोठे संकट आले, अगदी सर्वस्व उजळले तरीही जर मनात ‘आशा’ जिवंत असेल, तर माणूस पुन्हा एकदा फिनिक्स पक्षाप्रमाणे राखेतून झेप घेऊ शकतो. हाच संदेश देण्यासाठी आणि मानवी जिद्दीचा उत्सव साजरा करण्यासाठी दरवर्षी ‘आंतरराष्ट्रीय आशा दिन’ (International Hope Day) साजरा केला जातो. या विशेष दिनानिमित्त आज आपण जगातील अशा एका देशाची कथा जाणून घेणार आहोत, जो संपूर्ण जगासाठी आशेचा आणि पुनरुत्थानाचा सर्वात मोठा जिवंत पुरावा आहे. तो देश म्हणजे ‘जपान’ (Japan). दुसऱ्या महायुद्धाच्या काळात अणुबॉम्बच्या भीषण हल्ल्यात पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या जपानने कौशल्य, शिस्त आणि गुणवत्तेला आपले आधारस्तंभ बनवून स्वतःला नव्याने घडवले आणि आज जगातील सर्वात प्रगत अर्थव्यवस्थांमध्ये आपले स्थान निर्माण केले.
11 Jul 2026 01:55 PM (IST)
मुंबईलगतच्या मिरा रोड परिसरात देहव्यापाराविरोधात काशीगाव पोलिसांनी मोठी कारवाई करत एका सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. बनावट ग्राहकाच्या माध्यमातून रचलेल्या सापळ्यात एका महिला दलालाला अटक करण्यात आली असून, देहव्यापाराच्या विळख्यात अडकलेल्या दोन पीडित तरुणींची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. या कारवाईमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांकडून या रॅकेटमागील इतर संबंधितांचा शोध घेतला जात आहे.
11 Jul 2026 01:45 PM (IST)
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या कुटुंबात लवकरच आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र पार्थ पवार यांचा कायनात धार यांच्यासोबत साखरपुडा निश्चित झाल्याची माहिती समोर आली आहे. हा साखरपुडा 29 जुलै रोजी पुण्यात पार पडणार असल्याचे सांगितले जात आहे.
11 Jul 2026 01:35 PM (IST)
भारतात वैद्यकीय (MBBS) शिक्षण घेणे सोपे नाही. आधी ‘नीट’च्या (NEET) तयारीसाठी कोचिंग क्लासेसची भरमसाठ फी भरा आणि परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर मेडिकल कॉलेजची फी भरणे अनेक कुटुंबांच्या बजेटबाहेरचे असते. बहुतांश खासगी (Private) मेडिकल कॉलेजेसची फी ४० लाख ते दीड कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. एवढी फी भरणे कोणत्याही मध्यमवर्गीय कुटुंबासाठी अशक्यप्राय गोष्ट आहे. अशा परिस्थितीत, ‘भारतात एमबीबीएसची सर्वात कमी फी नेमकी कुठे आहे?’ असा प्रश्न सर्वांच्याच मनात घोळत असतो.
11 Jul 2026 01:25 PM (IST)
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. आठव्या वेतन आयोगाचा अहवाल येण्यास अजून काही काळ बाकी असताना त्यात केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये महागाई भत्त्यातील वाढीबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या कामगार ब्युरोने एक नवीन अहवाल प्रसिद्ध केला आहे, जो महागाई भत्ता वाढ निश्चित करताना विचारात घेतला जाण्याची शक्यता आहे. औद्योगिक कामगारांसाठीचा अखिल भारतीय ग्राहक किंमत निर्देशांक ०.९ अंकांनी वाढला आहे. महागाई भत्त्याच्या गणनेसाठी हा आकडा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. नेमका काय आहे आकडा आणि तो कशा प्रकारे कर्मचाऱ्यांसाठी फायद्याचा ठरु शकतो? यासगळ्यात नेमकं कॅलक्युलेशन काय आहे सविस्तर जाणून घेऊयात.
11 Jul 2026 01:18 PM (IST)
पावसाळ्यात मुसळधार पाऊस आणि वादळामुळे तुमच्या गाडीचे मोठे नुकसान होऊ शकते, ज्यात झाडे पडण्याचाही समावेश आहे. अशा परिस्थितीत, विमा कंपनीला तत्काळ कळवा, फोटो आणि व्हिडिओ जपून ठेवा आणि पाहणी केल्यानंतरच दुरुस्ती करून घ्या. झिरो डेप कव्हरमुळे सुट्या भागांच्या खर्चावर अधिक लाभ मिळतो. सक्रिय पॉलिसी आणि योग्य कार्यपद्धतीद्वारे, क्लेम सहजपणे दाखल करता येतात. तुमच्या गाडीवर झाड कोसळल्यास विमा कंपनीकडे दावा कसा कराल आणि आवश्यक कागदपत्रे कोणती ते जाणून घ्या
11 Jul 2026 01:10 PM (IST)
सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी सुरू असतानाच एका वकीलाने समोर बसलेल्या न्यायाधीशांवर कागदपत्रे उधळत सरन्यायाधिशांना अपशब्द उच्चारले. या प्रकरणाने सर्वोच्च न्यायालयात य काही वेळासाठी चांगलाच गोंधळ उडाला होता. काही महिन्यांपूर्वीदेखील न्यायालयात असाच प्रकार घडला होता. एका ज्येष्ठ वकिलाने थेट सरन्यायाधिशांच्या दिशेने बूट भिरकावला होता. पण न्यायालयाने या दोघावरही कोणतीही कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले. या घटनांमुळे न्यायालयाची अवमानना चा मुद्दा पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे.
11 Jul 2026 01:00 PM (IST)
कर्जत तालुक्यातील डिकसळ-पाली येथील आदिवासी बांधव आणि ग्रामस्थ सध्या अत्यंत बिकट व गंभीर समस्यांच्या विळख्यात सापडले आहेत. मुसळधार पावसामुळे गावात दरड कोसळण्याची तीव्र भीती निर्माण झाली असून, गेल्या तीन दिवसांपासून संपूर्ण गाव अंधारात चाचपडत आहे. सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने सुमारे ७ ते ८ कुटुंबांना रात्रीच्या वेळी पाली येथील रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्थलांतरित होण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, या तात्पुरत्या छावणीत ना पिण्याचे पाणी, ना जेवणाची सोय, अशी दुरवस्था असल्याने आपत्तीग्रस्त नागरिक नाराजी व्यक्त करत आहेत.
11 Jul 2026 12:55 PM (IST)
देशभरातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक मोठी बातमी आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत २३ वा हप्ता वितरित झाल्यानंतर, शेतकरी आता २४ व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. ताज्या माहितीनुसार, सरकार दरवर्षीप्रमाणे पुढील हप्ता ठरलेल्या वेळेत वितरित करणार आहे.
पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत, शेतकऱ्यांना दरवर्षी तीन हप्त्यांमध्ये ₹६,००० दिले जातात, म्हणजेच दर चार महिन्यांनी ₹२,००० थेट त्यांच्या खात्यात जमा केले जातात.
11 Jul 2026 12:45 PM (IST)
अयोध्येतील श्रीराम मंदिरातील देणगी व दानपेटीतील कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून संबंधित दोषींवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शुक्रवारी सातारा शहरात ‘रघुपती राघव राजाराम’ सत्याग्रह आंदोलन करण्यात आले. आंदोलनानंतर काँग्रेसच्या शिष्टमंडळाने सातारा शहर पोलीस ठाण्यात निवेदन सादर करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.
11 Jul 2026 12:35 PM (IST)
निसान टेक्टॉन जास्त चांगला पर्याय ठरणार आहे. याची सुरुवातीची किंमत सुमारे 10.40 लाख रुपये आहे. तर याच्या टॉप मॉडेलची किंमत सुमारे 18.50 लाख रुपये आहे. तर किया सेल्टोसची किंमत सुमारे 11 लाखांपासून 22 लाख रुपयांपर्यंत आहे. कमी किंमतीत दमदार फीचर्स आणि पावरफुल इंजिन पाहिजे असेल तर तुम्ही टेक्टॉनची निवड करू शकता. तर ज्यांना अधिक फीचर्स, डिझेल इंजिन आणि ब्रँड व्हॅल्यू हवी आहे, त्यांच्यासाठी किया सेल्टोस ही एक उत्कृष्ट एसयूव्ही आहे.
11 Jul 2026 12:25 PM (IST)
शहरातील विकासकामांच्या रखडलेल्या गतीवरून भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवकांनी शुक्रवारी पालिका प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. शहरातील ४५ रस्त्यांची कामे, घनकचरा व्यवस्थापन, ड्रेनेज स्वच्छता, उद्यानांची देखभाल, तसेच विविध नागरी समस्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास येत्या आठवड्यात कराड पालिकेत ‘बोंबाबोंब आंदोलन’ करण्यात येईल, असा इशारा विरोधी पक्षनेते विजय वाटेगावकर यांच्यासह भाजपच्या नगरसेवकांनी मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना दिला.
11 Jul 2026 12:15 PM (IST)
मागील काही दिवसांपासून मुंबई शहराला पावसाने पछाडलं असून पाण्याच्या वेगवान प्रवाहात एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना समोर येत आहे. माहितीनुसार, सदर घटना मालाड (पूर्व) येथील कुरार परिसरात घडली असून चप्पल बाहेर काढण्याच्या प्रयत्नात ३५ वर्षीय योगेश शिवकुमार वर्मा याला आपला जीव गमवावा लागला आहे. पाण्याच्या वेगवान प्रवाहात योगेश वाहून गेला आणि मुख्य म्हणजे यात कुणीही त्याची मदत केली नाही. तीन दिवस शोधकार्य सुरु असतानाच बुधवारी योगेशचा मृतदेह बांगूर नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका मोठ्या नाल्यातून बाहेर काढण्यात आला. योगेश हा उत्तर प्रदेशचा रहिवासी असून कुरारमध्ये तो त्याच्या आई आणि भावासोबत राहत होता.
11 Jul 2026 12:05 PM (IST)
विम्बल्डनच्या रॉयल बॉक्समध्ये सामना पाहण्यासाठी आमंत्रित करण्यात आलेला गिल हा भारतीय क्रिकेट संघाचा चौथा कर्णधार ठरला. गिलने भारताचे माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्या शेजारी बसून सामना पाहिला. शुभमन गिलच्या आधी सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना हा सन्मान मिळाला आहे. या तिघांनाही रॉयल बॉक्समध्ये सामने पाहण्याची संधी मिळाली आहे. पहिल्यांदाच शुभमन गिलने सचिन तेंडुलकरसोबत रॉयल बॉक्समध्ये सामना पाहिला. पण सर्वात जास्त चर्चा रंगली ती म्हणजे सारा तेंडुलकरदेखील यावेळी उपस्थित होती. गेल्या काही वर्षात सारा आणि शुभमन या दोघांच्या नात्याबाबत नेहमीच वावड्या उठल्या आहेत.
11 Jul 2026 12:00 PM (IST)
कराड शहरातील रखडलेल्या विकासकामांवरून भाजपने पालिका प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेत 'बोंबाबोंब' आंदोलनाचा इशारा दिला आहे. शहरातील ४५ रस्त्यांची कामे ठप्प असल्याचा आरोप करत गॅस पाईपलाईन आणि केबल टाकण्याच्या प्रकल्पांनाही मोठा विलंब होत असल्याबद्दल प्रशासनाला धारेवर धरले आहे.
11 Jul 2026 11:50 AM (IST)
नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील ऐतिहासिक श्रीराम मंदिराच्या व्यवस्थापनात मोठा बदल होणार आहे. मंदिराच्या प्रशासनात अधिक पारदर्शकता आणि कार्यक्षमता आणण्याच्या उद्देशाने 'श्री राम मंदिर देवस्थान' पुनर्गठन विधेयकाला विधानसभेची मंजुरी मिळाली आहे.
11 Jul 2026 11:40 AM (IST)
गोकुलधाम सोसायटीच्या सेटवर मोठ्या प्रमाणात तोडफोड होत असल्याचे पाहायला मिळत आहे. चारही बाजूला मजूर काम करत असल्याचे दिसत आहेत, तसेच संपूर्ण सेट खांब आणि फळ्यांनी झाकून टाकण्यात आला आहे. हा व्हिडीओ पाहून चाहत्यांची धाकधूक वाढली आहे आणि गोकुलधाम सोसायटी आता कायमची संपणार आहे का, असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे. असित मोदी यांनी स्पष्टपणे म्हटलं आहे की, गोकुलधाम सोसायटी कायमची तोडली जात नाही तर ती केवळ दुरुस्त केली जात आहे.
11 Jul 2026 11:30 AM (IST)
बॉलिवूडमधील लोकप्रिय कॉमेडी फ्रँचायझी ‘धमाल’ चा चौथा भाग ‘धमाल 4’ प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर प्रेक्षकांच्या संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये मोठी उत्सुकता होती. मात्र, प्रदर्शनानंतर काहींनी चित्रपटाचे मनोरंजनमूल्य आणि कलाकारांच्या अभिनयाचे कौतुक केले, तर काहींनी कथा आणि विनोदांवर नाराजी व्यक्त केली.
11 Jul 2026 11:20 AM (IST)
अलिकडेच एक अजब-गजब घटना सोशल मिडियावर व्हायरल झाली आहे ज्यात एक व्यक्ती ४० लाखांची हिऱ्याची अंगठी गिळताना दिसून आला. अंगठी गिळल्यानंतर जणू काही घडलंच नाही असं दर्शवत तो दुकानदारासोबत गप्पा मारतो आणि आणखी अंगठ्यांचे सॅम्पल्स पाहू लागतो. मुख्य म्हणजे ही संपूर्ण घटना दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली ज्यानंतर याचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला.
11 Jul 2026 11:10 AM (IST)
मुंबई येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुंबईच्या पूर्व उपनगरात एका १६ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ केल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही तर तिचा पाठलाग करून तिला मारहाण देखील करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी एका प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्याला अटक केली आहे. त्याच्या विरुद्ध POCSO कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने मनोरंजन विश्वात खळबळ उडाली आहे.
11 Jul 2026 11:00 AM (IST)
शिवसेनेच्या 'ऑपरेशन टायगर'चे अत्यंत गोपनीय फोटो अखेर समोर आले आहेत. 17 जूनला ठाकरेंचे 6 खासदार लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या निवासस्थानी त्यांना भेटल्याचे दिसत आहे. श्रीकांत शिंदे आणि प्रताप सरनाईक हे देखील या खासदारांसोबत उपस्थित असल्याचे फोटोमध्ये दिसत आहे.
11 Jul 2026 10:56 AM (IST)
स्मार्टफोन आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्मार्टफोन वापरण्यासाठी आवश्यक असणारी सर्वात महत्त्वाची अॅक्सेसरी म्हणजेच चार्जर. सध्या बाजारात अनेक प्रकारचे चार्जर उपलब्ध आहेत, जे फास्ट चार्जिंगचा दावा करतात. या फास्ट चार्जरमुळे डिव्हाईसची बॅटरी अतिशय वेगाने चार्ज होते. अँड्रॉईड स्मार्टफोन्सप्रमाणेच बाजारात आयफोनसाठी अनेक चार्जर उपलब्ध आहेत.
11 Jul 2026 10:46 AM (IST)
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘ऑपरेशन टायगर’ सुरू केल्यानंतर काही दिवसांनी, शिवसेनेचे (यूबीटी) सहा खासदार आणि विधान परिषद सदस्य सचिन अहिर हे शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत पक्षप्रवेश केला. आता नवीन राजकीय घडामोडींनुसार, पक्षांतराची आणखी एक फेरी सुरू होण्याची शक्यता आहे.
उच्चपदस्थ सूत्रांनुसार, शिंदे गट आता ‘ऑपरेशन टायगर ३’ ची तयारी करत आहे, ज्याचा उद्देश शिवसेना (यूबीटी) आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) या दोन्ही पक्षांतील आमदार आणि खासदारांना आपल्या पक्षात घेण्याच्या तयारीत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांतील अनेक वरिष्ठ नेत्यांसोबत बंद दाराआड बैठका आणि चर्चा सुरू आहेत.
11 Jul 2026 10:36 AM (IST)
बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस आणि ऋतब्रता बॅनर्जी गट यांच्यातील खऱ्या तृणमूलच्या नियंत्रणासाठीची लढाई आता बँक खाती आणि मोठ्या रकमेवरून कायदेशीर वादात बदलली आहे. गुरुवारी कलकत्ता उच्च न्यायालयाकडून तीन बँक खात्यांच्या कामकाजाबाबत अंशतः दिलासा मिळाल्यानंतर, शुक्रवारी राज्य पोलिसांनी एकाच वेळी आणखी १२ बँक खाती गोठवल्याने ममता बॅनर्जी गटाला मोठा धक्का बसला.
11 Jul 2026 10:26 AM (IST)
टेक क्षेत्रातील आघाडीची कंपनी OpenAI ने एका नव्या AI एजेंटची घोषणा केली आहे. कंपनीने ChatGPT Work लाँच केले आहे. हे नवीन एआय एजेंट केवळ प्रश्नांची उत्तर देण्यासाठी नाही तर अनेक काम करण्यासाठी देखील डिझाईन करण्यात आले आहे. कंपनीचे म्हणणं आहे की, हे नवीन एआय एजेंट मोठे आणि कॉम्प्लेक्स टास्क सांभाळण्यासाठी डिझाईन केले आहे. हे एआय एजेंट वेगवेगळ्या ॲप्समध्ये काम करू शकते आणि डाक्यूमेंट्स, स्प्रेडशीट्स, प्रजेंटेशन्स आणि वेब ॲप्ससारख्या पूर्णपणे तयार फाईल्स देखील बनवू शकते.
11 Jul 2026 10:16 AM (IST)
‘जेव्हा एखाद्या चित्रपटात कोर्टरूमचा सेट असतो आणि सनी देओल कोर्टात मध्यभागी उभा असतो, तेव्हा त्याचा प्रसिद्ध ‘डेट आफ्टर डेट’ हा संवाद आपोआपच आठवतो. या प्रचंड उत्सुकता आणि चर्चेच्या दरम्यान, सनी देओलचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘इक्का’ अखेर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षक चित्रपटाबद्दल खूप उत्सुक होते, पण तो अपेक्षा पूर्ण करतो का? खरं सांगायचं तर, जर तुम्ही सस्पेन्स आणि थ्रिलरचे चाहते असाल आणि तुम्हाला स्टोरीची चांगली जाण असेल, तर हा चित्रपट तुम्हाला फारसे आश्चर्यचकित करणार नाही.






