भारतीय ऑटोमोबाईल बाजारात सध्या इलेक्ट्रिक व्हेईकल आणि पेट्रोल कार यांच्यातील तुलना हा सर्वात जास्त चर्चेत असलेला विषय आहे. नवीन गाडी खरेदी करताना ग्राहकांसमोर मुख्य प्रश्न असतो “ईव्हीची सुरुवातीची किंमत ३ ते ४ लाखांनी जास्त आहे, मग ५ वर्षांच्या वापरात ही भरपाई भरून निघेल का?” या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी आपण ५ वर्षांच्या खर्चाचा प्रत्यक्ष आकड्यांच्या आधारे तुलनात्मक आढावा घेऊयात,
५ वर्षांच्या खर्चाचे प्रत्यक्ष तुलनात्मक गणित
गृहीत धरूया की, आपण एकाच सेगमेंटमधील (उदा. कॉम्पॅक्ट SUV) पेट्रोल कार आणि तिचीच ईव्ही मॉडेल यांची तुलना करत आहोत.
सरासरी ड्रायव्हिंग: ५ वर्षांत ६०,००० किमी सरासरी
१.पेट्रोलचा दर: ₹१०० प्रति लिटर ढोबळमानाने,
२.मायलेज: १४ किमी/लिटर
१.वीज दर घरेलू: ₹८ प्रति युनिट
२.रेंज/इफिशियन्सी: ७.५ किमी/युनिट
इथेनॉल पेट्रोल मध्ये चालतं, मग डिझेल मध्ये का नाही? हे आहे कारण! समजून घ्या एका क्लिकवर
| खर्चाचा प्रकार | पेट्रोल कार | इलेक्ट्रिक कार |
| ऑन-रोड खरेदी किंमत (उदा.) | ₹ १२,००,००० | ₹ १५,५०,००० |
| इंधन / चार्जिंग खर्च (६०,००० किमी) | ₹ ४,२८,५७० | ₹ ६४,००० |
| ५ वर्षांचा मेंटेनन्स (सर्व्हिसिंग) | ₹ ४०,००० | ₹ १८,००० |
| आरटीओ व रोड टॅक्स (RTO Tax) | ८% ते १०% (अंदाजे ₹१,००,०००) | ०% (बऱ्याच राज्यांत मोफत) |
| ५ वर्षांचा एकूण खर्च (TCO) | ₹ १७,६८,५७० | ₹ १६,३२,००० |
म्हणजेच काय तर, सुरुवातीला ३.५ लाख रुपये महाग असूनही, ६०,००० किमी धावल्यानंतर ईव्ही कार पेट्रोल कारपेक्षा सुमारे ₹१.३६ लाख स्वस्त ठरते.
ईव्ही कुठे आणि कशी बचत करते?
१. इंधनाचा खर्च
पेट्रोल कारमध्ये इंजिन ऑइल, ऑइल फिल्टर, स्पार्क प्लग, क्लाच प्लेट, एअर फिल्टर यांसारखे शेकडो फिरणारे भाग असतात, जे वेळोवेळी बदलावे लागतात. याउलट ईव्हीत इंजिन नसल्यामुळे मेंटेनन्स अतिशय कमी असतो. ५ वर्षांत ईव्हीच्या सर्व्हिसिंगवर पेट्रोलच्या तुलनेत ५०% पेक्षा जास्त बचत होते.
३. सरकारी सवलती आणि टॅक्स
भारतात ईव्हीवर ५% जीएसटी आहे, तर पेट्रोल गाड्यांवर २८% जीएसटी व अतिरिक्त सेस आकारला जातो. याशिवाय अनेक राज्यांमध्ये ईव्ही गाड्यांवर रोड टॅक्स पूर्णपणे माफ आहे.
गाडीची टाकी फुल केली तर चालते का? हे आहेत ‘टंकी फुल’चे फायदे आणि तोटे
ब्रेक-ईव्हन पॉईंट कधी गाठला जातो?
सुरुवातीला दिलेली जास्त किंमत वसूल होण्याच्या टप्प्याला ब्रेक-ईव्हन पॉईंट म्हणतात.
जर तुमची दरमहा धाव १,५०० किमी किंवा त्याहून अधिक असेल, तर अवघ्या ३ ते ३.५ वर्षांत ईव्हीच्या खरेदीतील फरकाची रक्कम वसूल होते. जर तुमची दरमहा ड्रायव्हिंग ८०० किमीपेक्षा कमी असेल, तर हा ब्रेक-ईव्हन गाठायला ५ ते ६ वर्षे लागू शकतात.
तुमच्यासाठी कोणता पर्याय योग्य?






