फोटो सौजन्य: iStock
‘पाणी हेच जीवन’ हे वाक्य आपण अनेक वेळा ऐकलं आणि वाचलं आहे. खरंतर, पाणी नसेल तर आपले जीवन चालू शकणार नाही. पाण्याचा योग्य वापर करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. म्हणूनच सरकार नेहमी नागरिकांना पाणी वाचवण्याचं आवाहन करतं. पण महाराष्ट्रात काही ठिकाणी पाणीटंचाईची समस्या गंभीर बनली आहे. विशेषतः रायगड जिल्ह्यात अशा अनेक गावात पाणीटंचाईची तीव्र समस्या निर्माण झाली आहे. यामुळे ग्रामस्थ चांगलेच संतप्त झाले आहेत. पाणी मिळवण्यासाठी त्या गावांमध्ये संघर्ष सुरू आहे. या समस्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार आणि स्थानिक प्रशासनाला ठोस उपाययोजना करणं गरजेचं आहे, जेणेकरून भविष्यात पाणीटंचाईवर मात केली जाऊ शकते.
रायगड जिल्ह्यातील अनेक गावांना पाणी टंचाईची झळ लागण्यास सुरवात झाली असून म्हसळा तालुक्यातील तोंडसुरे या गावातील पाण्याने मार्च महिन्यातच विहिरीचा तळ गाठला असून नद्या ओस पडल्या आहेत. १३.५ कोटी रुपयांची तोंडसूरे नळ पाणीुरवठा योजना बारगळ्याने ल्याने योजनेचे तीन -तेरा वाजले असून ४ ग्रामपंचायती मधील ९ वाड्याना याचा फटका बसला आहे.
पाभरे धरणातून पाणी पुरवठा होत असलेली जुनी नळपाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाल्याने ऐन उन्हाळ्यात व होळीच्या सणात पाणी संकट ओढवल्याने पाण्याची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. १ हंडा पिण्याच्या पाण्यासठी एक किलोमीटर ची पायपीट करावी लागत असल्याने आज तोंडसूरे ग्रामपंचायत हद्दीतील ३ वाड्यातील १००० पेक्षा जास्त महिला व पूरुष ३ किलोमिटर चालत पाणीपुरवठा कार्यालयांवर शासना विरोधात घोषणा देत हंडा मोर्चा काढला.
Mumbai : बनावट नकाशांच्या सीआरझेड आणि एनडीझेडमध्ये करण्यात आलेल्या बांधकामांवर कठोर कारवाई
पाणीपुरवठा कार्यालयातील अभियंता यांना निवेदन देत या मोर्चेकऱ्यांनी शासनाचा निषेध नोंदवला असून २: दिवसात टँकर ने पाणी पुरवठा सुरू केला नाही तर आमरण उपोषण करणार असल्याचे सांगितले. उप अभियंत जे.यु.फुलपगारे यांच्या लेखी आश्वासनानंतर मोर्चा विसर्जित करण्यात आला. याप्रसंगी तोंडसुरे नळ पाणी पुरवठा योजना अध्यक्ष महादेव पाटिल, तालुका अध्यक्ष समीर बनकर, नगराध्यक्ष संजय कर्णिक, सरपंच सुरेश महाडिक,तीन वाडी अध्यक्ष वामन नाक्ती, सचिव सुदर्शन जंगम, सदस्य प्रकाश लोणशिकर, मोरेश्वर जंगम, अनिल जंगम, गाव अध्यक्ष गजानन जंगम,रिला पवार, सुनिल शेडगे,उपसरपंच प्रीती पवार, उमेश नाक्ती, गोपाळ भायदे, समीर काळोखे आदि लोकं उपस्थित होते.