Photo Credit- Team Navrashtra
Marathi Breaking news live updates : पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देशात संताप आहे. दरम्यान, पाकिस्तानी सैन्याने रात्रभर नियंत्रण रेषेवर गोळीबार केला, ज्याला भारतीय सैन्याने पूर्ण प्रत्युत्तर दिले. नियंत्रण रेषेवरील अनेक चौक्यांवरून पाकिस्तानने हा गोळीबार केला. तथापि, यामध्ये भारताचे कोणतेही नुकसान झालेले नाही.एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानी सैन्याने छोट्या शस्त्रांनी हल्ला केला होता, परंतु आमच्या सैन्याने त्याला योग्य उत्तर दिले. या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू आहे आणि आतापर्यंत कोणतेही नुकसान झाल्याचे वृत्त नाही.
26 Apr 2025 06:25 PM (IST)
Mercedes-Benz ची सर्वात कॉम्पॅक्ट 7-सीटर एसयूव्ही Mercedes-Benz GLB भारतीय बाजारातून हटवण्यात आली आहे. ही प्रीमियम थ्री-रो एसयूव्ही डिसेंबर 2022 मध्ये लाँच करण्यात आली होती, पण आता कंपनीने ही कार त्यांच्या भारतातील वेबसाइट आणि लाइनअपमधून काढून टाकली आहे.
26 Apr 2025 06:24 PM (IST)
शिंदे गटाचे नेते संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबाबत वादग्रस्त आणि अपमानस्पद वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, 'पोलीस खात्यासारखं अकार्यक्षम डिपार्टमेंट भारतात, जगात कुठेही नाही. शासनाने कोणताही कायदा कला, की यांचा एक हप्ता वाढला, अशी टीका केली. (वाचा सविस्तर)
26 Apr 2025 06:22 PM (IST)
जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले. आतापर्यंत ज्याप्रमाणे आपण खंबीर राहिले त्याचप्रमाणेच यापुढेही खंबीर राहावे, राज्य शासन आपल्या दुःखात सहभागी असून आपल्या पाठीशी आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी धीर दिला.
देवेंद्र फडणवीस यांनी जम्मू काश्मीर हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांची भेट घेतली (फोटो - टीम नवराष्ट्र)
26 Apr 2025 06:07 PM (IST)
महाराष्ट्रात आढळलेल्या पाकिस्तानींना देश सोडण्याची नोटीस देण्यात आलेली आहे. पाकिस्तानी नारिकांना 48 तासांत बाहेर काढणार असल्याचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात बोलताना जाहीर केले. त्याचे समर्थन करताना देशहितासाठी कडक निर्णय घ्यावे लागतात, असेही फडणवीसांनी म्हटले आहे.
26 Apr 2025 05:38 PM (IST)
डोंबिवलीत स्मशानभूमीत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लहान मुलांकडून लाकडं वाहण्याचे काम सुरु असल्याचे दिसून आले आहे. या व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
26 Apr 2025 05:36 PM (IST)
अहमदाबाद आणि सुरतमध्ये बेकायदेशीर स्थलांतरितांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये तब्बल 550 हून अधिक ताब्यात घेण्यात आले. यामध्ये बांगलादेशींचे प्रमाण जास्त आहे.
#Gujarat: Over 550 illegal immigrants detained in massive crackdowns across Ahmedabad and #Surat today.
More than 450 immigrants, mainly from #Bangladesh, who were allegedly residing illegally in #Ahmedabad detained by the Police. pic.twitter.com/kmyTr1k41H
— All India Radio News (@airnewsalerts) April 26, 2025
26 Apr 2025 05:29 PM (IST)
सत्कार सोहळ्यावरुन टीका करणाऱ्या अतुल लोंढे यांना अमोल मिटकरी यांनी उत्तर दिले आहे. “पहलगाममधील हल्ला हा देशावर होता, त्यामुळे संपूर्ण देश शोकमग्न आहे. मात्र कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन राम शिंदे यांनी प्रातिनिधिक स्वरूपात कार्यक्रमाला हजेरी लावली. त्यामुळे अतुल लोंढे यांच्या पोटात दुखायचे काही कारण नाही. काँग्रेसमध्ये समन्वयाचा पूर्ण अभाव आहे, असे उत्तर अमोल मिटकरी यांनी दिले आहे.
26 Apr 2025 05:21 PM (IST)
गेल्या जानेवारी महिन्यात सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आठवा वेतन आयोग स्थापन करण्याची मोठी घोषणा केली होती. दरम्यान नवीन वेतन आयोगाच्या समितीबाबत कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. केंद्रीय कर्मचारी संपूर्ण प्रक्रिया जलद होण्याची वाट पाहत आहेत. आता केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी वेतन आयोगाबाबत एक मोठी अपडेट आली आहे. केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार/पेन्शनमध्ये दर दशकात सुधारणा केली जाते, ज्यामध्ये आर्थिक परिस्थिती, क्रयशक्ती, वापराची पद्धत आणि किंमती यासारख्या अनेक घटकांचा विचार केला जातो.
26 Apr 2025 04:40 PM (IST)
परभणीमध्ये अजित पवार हे विकास कामांच्या आढाव्यासाठी दौऱ्यावर आले होते. मात्र यावेळी युवक कॉंग्रेसच्या आक्रमक कार्यकर्त्यांनी त्यांच्या ताफ्यापुढे चुन्याच्या डब्या फेकून ताफा अडवण्याचा प्रयत्न केला. वाचा सविस्तर
26 Apr 2025 04:38 PM (IST)
भारतीय ऑटो बाजारात नेहमीच विविध सेगमेंटमधील कार्सना चांगली मागणी पाहायला मिळते. यातही विशेष मागणी ही एसयूव्ही कार्सना मिळत असते. त्यामुळेच अनेक ऑटो कंपन्या मार्केटमध्ये अत्याधुनिक फीचर्ससह एसयूव्ही लाँच करत असतात. आता तर इलेक्ट्रिक एसयूव्ही देखील मार्केटमध्ये लाँच होत आहे. आता देशातील आघाडीची कार उत्पादक कंपनी मारुती सुझुकी दोन नवीन एसयूव्ही मार्केटमध्ये सादर करणार आहेत.
26 Apr 2025 04:11 PM (IST)
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेला भ्याड हल्ल्यात 28 पर्यटकांचा मृत्यू झालाय त्या भ्याड हल्ल्याचा सर्व थरातून निषेध नोंदवण्यात येत आहे.काश्मीर परिसरात अडकलेल्या पर्यटकांना पुन्हा महाराष्ट्रात आणण्याची जबाबदारी आमची आहे. जोपर्यंत शेवटचा पर्यटक महाराष्ट्रात परतत नाही तोपर्यंत शिवसेनेचे काही कार्यकर्ते काश्मीरमध्येच राहणार असल्याचे शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी सांगितलं आहे.
26 Apr 2025 04:10 PM (IST)
पहलगाम हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात तणाव निर्माण झाला आहे. भारताने पाकिस्तानबाबत काही धोरणात्मक निर्णय घेतले आहेत. सिंधु जल कराराला स्थगिती दिली आहे. तसेच भारताने राफेल, सुखोई या लढाऊ विमानांचा युद्धाभ्यास सुरू केला आहे. तर लष्कर आणि नौदल देखील पूर्ण तयारीत आहे. भारत काहीतरी मोठे करणार अशी भीती पाकिस्तानला वाटत आहे. त्यातच आता भारतीय नौदल आणि लष्कराने एक्स या सोशल मिडिया अकाऊंटवरुण पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला आहे.
26 Apr 2025 04:09 PM (IST)
जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्रीय गृह मंत्रालयाने एक मोठा निर्णय घेतला आहे. गृह मंत्रालयाने पाकिस्तानशी संबंधित सर्व व्हिसा रद्द करण्याचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अमित शहा यांनी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या संबंधित राज्यांमधून पाकिस्तानातील लोकांना लवकरात लवकर बाहेर काढण्यास सांगितले आहे. अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर गृहमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे.गृहमंत्र्यांच्या या आदेशानंतर भारत सरकार अॅक्शन मोडमध्ये आली. या हल्ल्यानंतर, भारत सरकारने प्रथम भारत आणि पाकिस्तानमधील सिंधू पाणी करार स्थगित केला. . भारताने पाकिस्तानला औपचारिक पत्र लिहून सिंधू पाणी करार स्थगित केल्याची माहिती दिली होती. त्यानंतर आता पाकिस्तानी नागरिकांना ४८ तासांच्या आत महाराष्ट्र सोडण्याचे आदेश दिले आहेत. याचदरम्यान आता महाराष्ट्रात 107 पाकिस्तानी बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
26 Apr 2025 03:27 PM (IST)
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने कठोर पावले उचलत पाकिस्तानचे पाणी बंद करण्याचा निर्णय घेतला. यानंतर पाकिस्तानकडून डोळे दाखवण्यासह या हल्ल्याशी आमचा काहीही संबंध नसल्याचं सांगण्यात आलं होतं. पण आता पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी यावर प्रतिक्रिया दिली असून “पहलगाम हल्ल्याप्रकरणी आम्ही तटस्थ चौकशीला तयार” असल्याचे म्हटलं आहे.
26 Apr 2025 03:00 PM (IST)
पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त केला जात आहे. याच हल्ल्यावरून राजकीय नेतेमंडळींकडून निषेध व्यक्त करण्यात आला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) अध्यक्ष शरद पवार यांनीही भाष्य केले होते. त्यावर भाजप नेते आशिष शेलार यांनी विधान केले. ‘पहलगाम हल्ल्याबाबत राजकारण करणं इतक्या वरिष्ठ नेत्याने, हे अपेक्षित नाही. किंबहुना, कोणीच करू नये. झालेला हल्ला दुर्दैवी, नाहक आणि बळी पडलेले आणि बलिदान पडलेले नागरिक या सगळ्यावर देश एकत्र आहे’, असे त्यांनी म्हटले आहे.
26 Apr 2025 01:54 PM (IST)
संपूर्ण देशात ‘पहलगाम’ दहशतवादी हल्ल्याचा निधेष करण्यात येत आहे. असे असताना या हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी सोलापूर जिल्ह्यातील करमाळ्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला करमाळा पोलिसांनी अटक केली आहे.
26 Apr 2025 12:53 PM (IST)
उत्तर सिक्कीममधील चुंगथांग आणि लाचुंग दरम्यानच्या महामार्गावर शुक्रवारी रात्री उशिरा भूस्खलन झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या पथकांनी तत्काळ बचाव कार्य सुरू केले, आणि आतापर्यंत ५० हून अधिक लोकांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात यश आले आहे.भूस्खलनामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, खराब हवामान आणि सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे परिस्थिती अधिक गुंतागुंतीची झाली आहे. सिक्कीमचा हा भाग डोंगराळ आणि दुर्गम असून, पावसाळ्यात अशा घटना वारंवार घडत असतात. संपूर्ण परिसरात सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आला असून, पर्यटकांनी सुरक्षित स्थळी थांबण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान, स्थानिक प्रशासन आणि आपत्कालीन यंत्रणा सतत कार्यरत आहेत.
26 Apr 2025 12:47 PM (IST)
पहलगाममध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारताने सिंधु पाणी करार स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी पाकिस्तानचे पाणी कमी केले किंवा थांबवले तर पूर्ण ताकदीने उत्तर दिले जाईल अशी पोकळ धमकी भारताला दिली आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांपासून विरोधी नेत्यांपर्यंत भारताला धमकवले जात आहे. आम्ही कोणत्याही प्रकारच्या धाडसाला उत्तर देण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत असं शहबाज शरीफ यांनी म्हटलं आहे.
26 Apr 2025 12:42 PM (IST)
आयपीएल २०२५ मध्ये आतापर्यंत ४३ सामने खेळवण्यात आले आहेत. ४५ वा सामना हा मुंबई इंडियन्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांच्यात खेळला जाणार आहे. हा सामना २७ एप्रिल रोजी दुपारी ३.३० वाजता मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यापूर्वीच सरावादरम्यान रोहित शर्माने शार्दुल ठाकूरची खरडपट्टी काढल्याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. शार्दुल ठाकूर हा या हंगामात लखनौ सुपर जायंट्सकडून खेळत आहे. वाचा सविस्तर-
26 Apr 2025 12:40 PM (IST)
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी व्हॅटिकन सिटीमधील बॅसिलिका ऑफ सेंट पीटर येथे पोप फ्रान्सिस यांना श्रद्धांजली वाहिली.
President Droupadi Murmu paid homage to His Holiness Pope Francis at Basilica of Saint Peter in Vatican City. pic.twitter.com/eymWVVZi4J
— President of India (@rashtrapatibhvn) April 25, 2025
26 Apr 2025 12:34 PM (IST)
गेल्या पाच वर्षांत दंडात्मक कारवाई झालेल्या कंपन्यांना सुरक्षा रक्षक पुरविण्याच्या निविदा प्रक्रियेत अपात्र केले जाणार आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने निर्णय घेतला आहे. या कामाची मुदत एक वर्षावरून तीन वर्ष केल्याने ही निविदा वादात सापडली. तसेच राजकीय व्यक्तींशी संबंधित कंपन्या देखील हे काम मिळविण्याच्या प्रयत्नात असल्याने चर्चेला उधाण आले आहे.
26 Apr 2025 12:30 PM (IST)
वैभव सूर्यवंशीने त्याच्या पदार्पणाच्या सामन्यात २० चेंडूंत ३४ धावांची खेळी केली होती. यानंतर तो (१६) रॉयल चॅलेंजस बंगळुरूविरुद्ध आक्रमक खेळला, परंतु त्याला मोठी खेळी करता आली नाही. या सामन्यानंतर वीरेंद्र सेहवागने वैभवला '२० वर्षे IPL खेळण्याकडे लक्ष्य ठेव' असा सल्ला दिला आहे.
26 Apr 2025 12:28 PM (IST)
स्मार्टफोन कंपनी विवोचा नवीन स्मार्टफोन लवकरच भारतात लाँच होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा आगामी स्मार्टफोन Vivo X200 FE या नावाने भारतात लाँच केला जाऊ शकतो. लाँचिंगपूर्वीच अनेक टिपस्टिरने या स्मार्टफोनच्या अपेक्षित फीचर्सबद्दल माहिती दिली आहे. तसेच हा स्मार्टफोन कधी लाँच केला जाणार, याबाबत देखील अनेक अंदाज वर्तवले जात आहेत. अशी अपेक्षा आहे की, आगामी स्मार्टफोवन जून किंवा जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाँच केला जाऊ शकतो. मात्र अद्याप कंपनीने याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
26 Apr 2025 11:58 AM (IST)
पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या लोकांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत संपर्क साधून तिथे नेमके काय घडले हे जाणून घेण्याचा प्रयत्न सध्या भारतीय मीडिया करताना दिसत आहे. हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना त्यांच्या घरी जाऊन त्यांच्याशी त्याच त्याच गोष्टी बोलल्या जात आहेत, यावर अभिनेत्री शिवानी सुर्वे हिने नाराजी व्यक्त केली आहे. तिने इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत मीडियाला फटकारलं आहे.
Pahalgam Terror Attack Shivani Surve Shared A Post About Interviews Conducted With Relatives Of Victims
26 Apr 2025 11:55 AM (IST)
ई कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon वर लवकरच एक मोठा सेल सुरु होणार आहे. हा सेल Amazon चा ग्रेट समर सेल 2025 असणार आहे. ई-कॉमर्स साइटने ग्रेट समर सेलची तारीख देखील जाहीर केली आहे. हा सेल 1 मे पासून सुरु होणार आहे. शिवाय नेहमीप्रमाणे Amazon Prime मेंबर्ससााठी ही ऑफर देखील 12 तास आधी सुरु केली जाणार आहे. सेल दरम्यान अनेक प्रोडक्ट्सवर डिस्काऊंट ऑफर केलं जाणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना कमी किंमतीत शॉपिंग करण्याची संधी मिळणार आहे. Amazon Great Summer Sale 2025 भारतातील सर्व यूजर्ससाठी1 मे रोजी दुपारी 12 वाजल्यापासून सेल सुरु होणार आहे.
26 Apr 2025 11:54 AM (IST)
छत्तीसगड-तेलगंणा सीमेवरील डोंगराळ भागात सुमारे 10 हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांचे मोठे नक्षलविरोधी अभियान सुरूच आहे. बंदी घातलेल्या सीपीआयचे (माओवादी) सुमारे 500 कार्यकर्ते लपून बसले आहेत. तेलंगणा पोलिस या कारवाईत सहभागी आहे.
26 Apr 2025 11:54 AM (IST)
मालवण राजकोट इथं उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे काम शंभर टक्के पूर्ण झालं आहे. या पुतळ्याच्या उद्घाटनाची एक मे रोजी उद्घाटनाची तारीख मात्र टळली आहे. आता या पुतळ्याचे उद्घाटन कधी होणार याकडे लक्ष लागलं आहे. सध्या महाराजांच्या पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून पर्यटक पुतळा पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत.
26 Apr 2025 11:53 AM (IST)
भारतातील लोकांमध्ये स्मार्टफोनची वेगळीच क्रेझ आहे. खरं तर भारतीयांमध्ये आयफोनची प्रचंड क्रेझ आहे. शिवाय भारतीयांमध्ये सॅमसंग गॅलेक्सीची देखील प्रचंड क्रेझ आहे. त्यामुळे जेव्हा भारतात सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या स्मार्टफोनचा विचार केला जातो, तेव्हा सॅमसंग आणि आयफोनचं नाव डोळ्यासमोर येतं. पण तुम्हाला जाणून ऐकूण आश्चर्य वाटेल की भारतात सर्वाधिक विकला जाणाऱ्या स्मार्टफोनचा ब्रँड आयफोन किंवा सॅमसंग नाही तर विवो आहे.
26 Apr 2025 11:46 AM (IST)
पंजाब किंग्जने मुंबईचा डॅशिंग अष्टपैलू आणि भारतीय संघाचा खेळाडू तनुश कोटियनचा नेट बॉलर म्हणून संघात समावेश करून घेतला आहे. मेगा लिलावात कोणत्याही संघाने तनुश कोटियनला खरेदी केले नव्हते.
26 Apr 2025 11:39 AM (IST)
Power in unity; Presence with Purpose
#MissionReady#AnytimeAnywhereAnyhow pic.twitter.com/EOlQFyXFgJ
— IN (@IndiannavyMedia) April 26, 2025
26 Apr 2025 10:30 AM (IST)
पाकिस्तानातील लाहोर विमानतळावर भीषण आग लागल्याची माहिती समोर आली आहे. आगीचे कारण अद्यप समोर आलेले नाही. त्यामुळ लाहोर विमानतळावरील सर्व उड्डाणे तुर्तास रद्द कऱण्यात आली आहेत.
26 Apr 2025 10:29 AM (IST)
पाकिस्तानी उच्चायु्क्तालयातील सल्लागारांंना भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यासाठी त्यांना सात दिवसांची मुदत देण्यात आली आहे. दुसरीकडे भारतानेही इस्लामाबादमधील लष्करी सल्लागारांना माघारी बोलवले आहे.
26 Apr 2025 09:43 AM (IST)
सर्वात चांगली गुंतवणूक म्हणून सोन्याकडे पाहिले जाते. याचा कलही वाढला आहे. त्यात देशात पहिल्यांदाच सोन्याने प्रति 10 ग्रॅम 1 लाख रुपयांची पातळी ओलांडली आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्या टॅरिफ प्लॅन आणि फेडरल रिझर्व्हमधील आमूलाग्र सुधारणांच्या योजनेमुळे, मुंबईच्या सराफा बाजारात 24 कॅरेट (99.9 टक्के शुद्धता) सोन्याची किंमत 101350 रुपये आहे. 22 कॅरेट मानक सोन्याचा दर 95400 रुपये आहे. वाचा सविस्तर-
26 Apr 2025 09:28 AM (IST)
जम्मू-कश्मीरमधील पहलगाम याठिकाणी दहशतवाद्यांनी भारतीय नागरिकांवर हल्ला केला. या हल्ल्यात २८ जणांचा बळी गेला. या हल्ल्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. हा हल्ला ताजा असतानाच आता बलुच आर्मीने पाकिस्तानावर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. बलुचिस्तानमधील मार्गट परिसरात शुक्रवारी झालेल्या स्फोटक हल्ल्यात पाकिस्तानच्या लष्कराचे किमान १० जवान ठार झाल्याची माहिती आहे. वाचा सविस्तर-
26 Apr 2025 09:27 AM (IST)
पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला. या घटनेच्या निषेधार्थ भारत सरकारने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या घटनेनंतर भारताने पाकिस्तानच्या काही डिजिटल आणि प्रसारमाध्यमांवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला. यामध्ये पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) २०२५ च्या भारतातील प्रसारणावर बंदी घालण्याचा समावेश आहे. जो पाकिस्तानसाठी मोठा झटका आहे. वाचा सविस्तर-
26 Apr 2025 09:25 AM (IST)
आयपीएल २०२५ चा ४३ वा सामना काल शुक्रवारी(२५ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात खेळला गेला. चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या या सामन्यात हैद्राबादने चेन्नईचा पराभव केला. हैद्राबादच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर चेन्नईने प्रथम फलंदाजीला उतरत १५३ धावा केल्या. प्रतिउत्तरात हैदराबादने १९ व्या षटकातच 154 धावांचे लक्ष्य पूर्ण केले आणि सुपर किंग्सचा 5 विकेट्सने पराभव केला.
26 Apr 2025 09:24 AM (IST)
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान पीपल्स पार्टीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो यांनी ट्विटरवर लिहिले की, “भारताने सिंधू पाणी करार एकतर्फी थांबवला असून, त्यांनी स्पष्ट मान्य केले आहे की सिंधू आमची आहे. मी सुक्कुर येथे उभा राहून सांगतो की सिंधू आमची आहे आणि आमचीच राहील – मग या सिंधूमध्ये पाणी वाहो वा रक्त.” हे विधान केवळ भडकावणारे नसून द्वेषजन्य आणि युद्धाची भाषा बोलणारे आहे, असे आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे. भारताने मात्र शांतपणे या वक्तव्याकडे दुर्लक्ष करत, आपल्या राष्ट्रीय सुरक्षेच्या धोरणांवर लक्ष केंद्रीत केले आहे.
لائیو: پاکستان پیپلز پارٹی کا سکھر میں جلسہ عام https://t.co/GbtbR2fb3U
— PPP (@MediaCellPPP) April 25, 2025