
Top Marathi News Today Live:
Marathi Breaking news updates- इंडिगो एअरलाईन्समधील संकट प्रवाशांच्या अडचणीचे कारण ठरताना दिसत आहे. सातव्या दिवशीही उड्डाणे रद्द करणे आणि विलंब सुरूच राहिला. वैमानिक आणि क्रू मेंबर्सच्या कमतरतेमुळे इंडिगोने 562 उड्डाणे रद्द केली. देशभरातील विमानतळांवर अडकलेले प्रवासी एअरलाईन्स कर्मचाऱ्यांवर आपला संताप व्यक्त करताना दिसत आहेत. विमानांची उड्डाणे रद्द झाल्यानंतरही अनेकांना त्यांच्या बॅगा परत मिळाल्या नाहीत.
09 Dec 2025 07:12 PM (IST)
IND vs SA T20I series : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून ५ सामन्यांची टी २० मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेचा पहिला सामना ९ डिसेंबर रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामान्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने याआधी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय मालिकेत २-१ असा विजय मिळवला आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादव या मालिकेत देखील आपले वर्चस्व राखण्याचा प्रयत्न करताना दिसणार आहे. तर कर्णधार एडन मार्कराम भारताला चांगली टक्कर देत मालिका विजयासाठी प्रयत्नशील असणार आहे. यावेळी भारतीय संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे. भारतीय संघात यष्टीरक्षक फलंदाज म्हणून संजू सॅमसंगऐवजी जितेश शर्माला अंतिम अकरामध्ये स्थान देण्यात आले आहे.
09 Dec 2025 06:54 PM (IST)
कोल्हापूर: कर्नाटक सरकारकडून सीमा भागातील मराठी भाषिकांवर कथित अन्याय व दडपशाही होत असल्याच्या निषेधार्थ उद्धवसेनेने कोल्हापुरात कर्नाटकची प्रवासी वाहतूक रोखून तीव्र आंदोलन छेडले. मध्यवर्ती बसस्थानकात घेतलेल्या आंदोलनामुळे महाराष्ट्र–कर्नाटक या दोन्ही राज्यांची वाहतूक दिवसभर विस्कळीत झाली असून हजारो प्रवाशांना मोठा फटका बसला. सकाळी अकरा वाजता उद्धवसेनेतर्फे कोल्हापूर बसस्थानकात आंदोलनास सुरुवात झाली.
09 Dec 2025 06:39 PM (IST)
मुंबई: राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा (Election) कार्यक्रम जाहीर झळा. त्यापैकी नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणूक पार पडली आहे. 21 तारखेला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. हजारो उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले आहे. कोर्टाच्या आदेशानुसार 31 जानेवारीच्या अंत सर्व निवडणूक घ्याव्या लागणार आहेत. दमर्याण आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी उद्धव ठाकरे यांनी सुरू केली आहे. उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षाच्या नेत्यानी बैठक घेतल्याचे समोर आले आहे.
09 Dec 2025 06:08 PM (IST)
Indigo Flight Crisis News in Marathi : गेल्या अनेक दिवसांपासून संकटाचा सामना करत असलेली इंडिगो एअरलाइन्स (Indigo Flight) पुन्हा पूर्ववत येऊ लागली आहे, असा दावा इंडिगोचे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर अल्बर्स यांनी केला आहे. यासंदर्भात सीईओंनी एक निवेदन प्रसिद्ध केले असून त्यांनी म्हटलं की, “तुमची एअरलाइन, इंडिगो, पुन्हा एकदा आपल्या उभी राहिली आहे. आमचे कामकाज आता पुन्हा स्थिर झाले आहे”.
09 Dec 2025 06:00 PM (IST)
IND vs SA : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आजपासून पाच सामन्यांची टी २० मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेतील पहिला सामना ९ डिसेंबर रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आता क्रिकेट चाहत्यांची दीर्घ प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात भारतीय संघ कोणत्या खेळाडूंना संधि देणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागून आहे. जर तुम्हीही प्लेइंग इलेव्हनवर नजर ठेवून असाल तर माजी भारतीय क्रिकेटपटू पार्थिव पटेलने सामन्यापूर्वी संभाव्य प्लेइंग इलेव्हन जाहीर केली आहे. यामध्ये अनेक स्टार खेळाडू आहेत. परंतु अर्शदीप सिंग आणि संजू सॅमसन यांना वगळण्यात आले आहे.
09 Dec 2025 05:50 PM (IST)
Maharashtra Politics News Marathi: गेल्या काही वर्षांत राज्याच्या राजकारणात मोठे भूकंप पाहायला मिळत आहे. सर्वात आधी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड करत ४० हून अधिक आमदार फोडत भाजपासोबत युती करत सत्ता स्थापन केली. त्यानंतर काही दिवसांतच राष्ट्रवादीतही फूट पडली. अनेक आमदारांसह बाहेर पडत अजित पवार यांनीही महायुती सरकारमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला. या दोन घटनांमुळे राज्याच्या राजकारणाची चर्चा संपूर्ण देशात झाली होती. अशातच आता राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. विरोधी पक्षनेतेपदावरून ठाकरे गटातच अंतर्गत स्पर्धा सुरु झाल्याची चर्चा आहे. कारण विरोधी पक्ष नेतेपदासाठी आतापर्यंत भास्कर जाधव प्रबळ दावेदार मानले जात होते. पण आता आदित्य ठाकरेंच्या नावाची चर्चा सुरु झाली आहे. त्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे.
09 Dec 2025 05:40 PM (IST)
रणवीर सिंगच्या ‘धुरंधर’ चित्रपटाने पहिल्या चार दिवसांत बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली आहे. २८० कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनवलेल्या या चित्रपटाने देशात १२६.२५ कोटी रुपये कमवले आहेत आणि जगभरात १९३.०० कोटी रुपये कमावले आहेत. आता, चित्रपटाच्या ओटीटी डीलबाबत मोठी बातमी आली आहे. असा दावा केला जात आहे की चित्रपट निर्माते आदित्य धर यांनी ‘धुरंधर’च्या डिजिटल स्ट्रीमिंगसाठी ओटीटी प्लॅटफॉर्मसोबत १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त करार केला आहे.
09 Dec 2025 05:30 PM (IST)
Maharashtra Weather News : बारामती : गेल्या काही दिवसांपासून तापमानात सतत घट होत असून सकाळी आणि रात्रीच्या वेळेत तीव्र गारठा जाणवत आहे. वाढत्या थंडीमुळे (Maharashtra Weather) शहरासह ग्रामीण भागातही नागरिकांना हुडहुडी भरवत आहे. शनिवारी सकाळी नोंदवण्यात आलेले तापमान मागील आठवड्याच्या तुलनेत ४ ते ५ अंशांनी खाली आल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.
09 Dec 2025 04:50 PM (IST)
कर्जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान झाले असून मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार असल्याने मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहेत.मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्राँग रूम बाहेर पोलिसांचा २४ तास खडा पहारा ठेवण्यात आला आहे.तर २४ तास सीसीटीव्ही कॅमेरे यांची नजर या स्ट्राँग रूम बाहेर आणि आत ठेवण्यात आली आहे अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी चव्हाण यांनी दिली.
09 Dec 2025 04:45 PM (IST)
नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत धामोते भागातील पेशवाई रस्त्यावरील पुलावर २५ नोव्हेम्बराच्या रात्री सचिन अशोक भवर या व्यक्तीवर दुचाकीवरून आलेल्या तरुणांनी गोळीबार केला होता.या प्रकरणी नेरळ पोलिसांनी नाशिक येथील दोन आरोपीना ताब्यात घेतले आहे. त्या आरोपीमधील अविनाश जगन्नाथ मार्के याच्यावर खून,खुनाचा प्रयत्न,दरोडा चोरी असे विविध १५ गुन्हे दाखल आहेत.
09 Dec 2025 04:40 PM (IST)
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मीरा भाईंदर शहरातील 44,862 दुबार नावांच्या यादीत गंभीर चुका असल्याचा आरोप स्थानिक पातळीवरून करण्यात आला आहे. त्यासोबत दिलेला Appendix-1 हा फॉर्म कायदेशीरदृष्ट्या अपूर्ण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून चुकीचं काम करताय असा आरोप काँग्रेस प्रवक्ते दीपक बागरी यांनी केला आहे नेमकं त्यांचं म्हणणं होते की ,MBMC अधिकारी नागरिकांना फोनवरून “तुमचं नाव कोणत्या वार्डमध्ये ठेवायचं?” असा बेकायदेशीर प्रश्न विचारत असल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे. ही पद्धत निवडणूक प्रक्रियेत अनधिकृत हस्तक्षेप ठरू शकते, अशीही चिंता व्यक्त झाली आहे.
09 Dec 2025 04:30 PM (IST)
सिंधुदुर्ग जिल्ह्यात माकडे, शेकरू यांच्याकडून नारळ, चिकू, आंबा, काजू, भातशेती यांचे मोठे नुकसान होत आहे. यामुळे येथील शेतकऱ्याला आर्थिक फटका बसतो. यासाठी वनविभागाकडून वन्यप्राण्यांची पकड मोहीम सुरू आहे. कुडाळ शहरात या शेतीचे नुकसान करणाऱ्या या माकडांना पकडण्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. कुडाळ शहरातील नागरिक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी ही पकड मोहीम राबविली आहे.
09 Dec 2025 04:30 PM (IST)
अलिबाग तालुक्यातील नागाव परिसरात आज सकाळी भरदिवसा बिबट्या दिसल्याने खळबळ उडाली. बिबट्याने काही नागरिकांवर हल्ला केल्याची माहिती मिळत असून एक तरुण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. घटनेनंतर नागावमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नागावमधील बालू सुतार यांच्या समोरील वाडी परिसरात प्रथम बिबट्या दिसला. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, “बिबट्या खूप मोठा आहे, कंबरेएवढा उंच. अनेक लोकांनी त्याला पाहिले असून तो अत्यंत आक्रमक स्वरूपात फिरताना दिसला,” असे त्यांनी सांगितले.
09 Dec 2025 04:25 PM (IST)
एकीकडे नाशिकच्या तपोवनमधील प्रस्तावित वृक्षतोडीचा मुद्दा गाजत असतानाच दुसरीकडे कल्याणजवळील टिटवाळ्यात मात्र तब्बल 50 हजार देशी झाडांचे घनदाट जंगल उभे राहण्याच्या दृष्टीने सुरुवात झाली आहे. केडीएमसी आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड(बीपीसीएल) च्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातील 30 हजार देशी वृक्षांची मियावाकी पद्धतीने लागवडीच्या उपक्रमाला प्रारंभ करण्यात आला. केडीएमसी आयुक्त अभिनव गोयल, शहर अभियंता अनिता परदेशी, बीपीसीएलचे पर्यावरण विभागाचे महाव्यवस्थापक अतुल व्यवहारे यांची उपस्थितीत हा उपक्रम राबविण्यात आला.
09 Dec 2025 04:20 PM (IST)
मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात आगामी पोलिस भरतीसाठी हजारो युवक सकाळ-संध्याकाळ सराव करत आहेत. मात्र शहरातील बहुतांश मैदानं, उद्याने विशिष्ट वेळेनंतर बंद केली जात असल्याने या उमेदवारांना रस्त्यावर धावणे, व्यायाम करणे भाग पडत आहे. यामुळे अपघाताचा धोका वाढत असून तरुणांच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीरपणे पुढे आला आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेतर्फे शहराध्यक्ष रॉबर्ट डिसोझा यांनी पालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त तसेच मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले आहे.
09 Dec 2025 04:15 PM (IST)
गुहागर विजापूर मार्गावर कुंभार्ली घाटात बिबट्याचा वावर दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये आणि रस्त्याने जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये देखील भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.
09 Dec 2025 04:10 PM (IST)
मध्य रेल्वेकडून नवीन कारशेड बनविले जात आहे. त्यासाठी नऊ किलोमीटर परिसरात उभारण्यात येणाऱ्या कारशेडसाठी 3 एकर जमीन रेल्वेकडून खरेदी करण्यात आली आहे. मात्र त्या जमिनीचा मोबदला अत्यंत कमी दिला असून शेतकऱ्यांच्या एका खातेदाराला प्रकल्पग्रस्त म्हणून नोकरीमध्ये संधी द्यावी अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. मनसेचे जिल्हा अध्यक्ष आणि मनसे रेल्वे युनियनचे अध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांना नोकरीमध्ये स्थान देण्याची मागणी केली आहे. दरम्यान या मागणीसाठी येत्या काही दिवसात आंदोलन करण्यात येईल आणि त्यावेळी कारशेडचे काम मनसे आणि शेतकरी बंद पाडतील असे जाहीर आव्हान रेल्वेला दिले आहे.
09 Dec 2025 03:50 PM (IST)
शाळांनी सहलींसाठी खासगी बस किंवा स्कूल बसचा वापर केल्यास कारवाई करावी आणि त्या कारवाईचा तपशीलवार, वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे आदेश राज्याचे सहाय्यक परिवहन आयुक्त विजय तिराणकर यांनी सर्व प्रादेशिक व उपप्रादेशिक अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे यापुढे शाळांच्या सहली अनिवार्यपणे एसटी बसनेच घ्याव्या लागणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शालेय सहलींचा उद्देश विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरणात नवीन ठिकाणांचे प्रत्यक्ष ज्ञान व अनुभव देणे हा असतो. पूर्वी अनेक शाळा वॉटर पार्क, रिसॉर्ट्स, बाग-बगीच्छे अशा मनोरंजनाधारित सहलींवर भर देत होत्या. शिक्षण विभागाने यामध्ये बदल करत ऐतिहासिक स्थळांना प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना इतिहास, संस्कृती, भूगोल आणि शैक्षणिक विषयांचे प्रत्यक्ष ज्ञान मिळेल.
09 Dec 2025 03:40 PM (IST)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांची टी-२० मालिकेला आजपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेचा पहिला सामना ९ डिसेंबर रोजी कटकमधील बाराबती स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. या सामन्यात भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहला एका मोठ्या कामगिरीची संधी असणार आहे. तो टी-२० क्रिकेटमध्ये शतक ठोकण्याची शक्यता आहे.
09 Dec 2025 03:35 PM (IST)
अॅडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड्स कौन्सिल ऑफ इंडिया (एएससीआय)ने शालेय विद्यार्थ्यांसाठी तयार केलेला राष्ट्रीय ग्राहक शिक्षण उपक्रम ‘अॅडवाइज’ औपचारिकरीत्या सुरू केला आहे. सप्टेंबरमध्ये लाँच झालेला हा उपक्रम पुढील १५ ते १८ महिन्यांत देशभरातील तिसरी ते आठवीतील विद्यार्थ्यांना जाहिरात क्षेत्राबाबत मूलभूत ते प्रगत ज्ञान देणार आहे. एएससीआय अकॅडमी अंतर्गत २०२६ अखेरपर्यंत एकूण २,००० शाळांतील १० लाखांहून अधिक मुलांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.
09 Dec 2025 03:25 PM (IST)
तुम्ही कदाचित अनेक कार पाहिल्या असतील, त्या सर्व वेगवेगळ्या आकारात येतात, ज्यामध्ये लिमोझिन सर्वात लांब असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जगातील सर्वात लांब कार कोणती आहे? जर नसेल, तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. हो, जगातील सर्वात लांब कार १०० फूट किंवा ३० मीटरपेक्षा जास्त लांबीची आहे. या कारला द अमेरिकन ड्रीम असे म्हणतात आणि गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिला जगातील सर्वात लांब कारचा किताब मिळाला आहे. सध्या ती अमेरिकेतील फ्लोरिडा येथील ऑरलँडो येथील डेझर्ट पार्क कार संग्रहालयात ठेवण्यात आली आहे.
09 Dec 2025 03:20 PM (IST)
संभाजीनगर शहरात दोन दिवसांपूर्वी घडलेल्या हृदयद्रावक घटनेत एका तीन वर्षीय मुलाचा गळा चिनी मांजाने चिरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. या गंभीर घटनेची मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तातडीने दखल घेत, चिनी मांजाबंदी संदर्भातील प्रलंबित याचिकेवर सुनावणी घेतली आणि महानगरपालिका व पोलीस प्रशासनाला खरमरीत शब्दांत फटकारले. न्यायमूर्ती विभा कंकणवाडी आणि न्यायमूर्ती हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठाने प्रशासनाला थेट विचारले, “घटना घडल्यानंतरच प्रशासन जागे होणार का?”
09 Dec 2025 03:01 PM (IST)
अभिनेत्री रिया चक्रवर्तीने चित्रपटसृष्टी सोडली आहे आणि नवीन सुरूवात केली आहे. या नवीन व्यवसायामुळे आता ती ४० कोटी किमतीची कंपनीची मालकीण आहे. सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर, रियाला तिच्या आयुष्यातील सर्वात वाईट टप्प्याचा सामना करावा लागला. लोकांकडून तिला टीकेचा सामना करावा लागला असला तरी, तिने तिचे विस्कळीत करिअर पुन्हा उभारण्यासाठी अथक परिश्रम करणे सुरू ठेवले.
09 Dec 2025 02:56 PM (IST)
चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील आकाश लकेश्री यांनी अत्यंत कठीण समजल्या जाणाऱ्या हिमालयीन एक्स्ट्रीम ट्रायथलॉन स्पर्धेत उल्लेखनीय यश संपादन करून चिपळूणचे नाव उंचावले आहे. एकूण आठ तास बावन्न मिनिटांत ही आव्हानात्मक स्पर्धा पूर्ण करत त्यांनी पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी पात्रता मिळवली आहे. देशातील फार थोडे खेळाडू एवढ्या कठीण स्पर्धेत उतरतात, त्यात आकाश यांनी मिळवलेले यश उल्लेखनीय मानले जात आहे.
09 Dec 2025 02:50 PM (IST)
अनेक ठिकाणी संसारात नवरा बायकोच भांडण हे संशयावरून झाल्याच्या घटना आपण पाहिल्या आहेत. मात्र सोलापूर जिल्ह्यात सगळ्यांना हादरवणारी घटना घडली आहे. तुम्हाला हे वाचून कल्पना ही करू शकणार नाही एवढ्या विचित्र पद्धतीने नवऱ्याचा जीव घेतला गेला. जीव का घेतला? याच कारण तुम्ही वाचल तर तुम्हाला धक्का बसेल. सोलापूर जिल्ह्यात एक घटना अशी घडली आहे. पतीचे दुसऱ्यासोबत अनैतिक संबंध होते आणि पत्नी ही अनैतिक संबंधात अडथळा ठरत होती. म्हणून त्याने बायकोचा काटा काढायचं ठरवलं आणि बायकोचा जीव घेतला. ही घटना घडली आहे दक्षिण सोलापूर तालुक्यात. वडापूर गावात ही घटना घडली आहे. मृत महिलेचं नाव हे सविता पुजारी अस आहे. नवरा जक्कपा पुजारी याला ताब्यात घेतला आहे.
09 Dec 2025 02:45 PM (IST)
कर्जत नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे मतदान झाले असून मतमोजणी २१ डिसेंबर रोजी होणार असल्याने मतदान यंत्र सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहेत. मतदान यंत्र ठेवलेल्या स्ट्रांग रूम बाहेर पोलिसांचा २४ तास खडा पहारा ठेवण्यात आला आहे. तर २४ तास सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर या स्ट्रॉग रूम बाहेर आणि आत ठेवण्यात आली आहे, अशी माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तानाजी चव्हाण यांनी दिली.
09 Dec 2025 02:40 PM (IST)
खेड बसस्थानकाच्या (KHED) मध्यवती भागात गेल्या काही दिवसांपासून रहस्यमयरीत्या पाणी झिरपत आहे. पाणी नेमके कुठून येत आहे, याचा ताळमेळ न लागल्याने एसटी प्रशासन गोंधळलेल्या अवस्थेत आहे. पाण्यामुळे त्या परिसरात दलदल निर्माण होत असून बसस्थानकातील (MSRTC)अस्वच्छतेतही भर पडली आहे. बसस्थानकातील प्रवेशद्वाराजवळच पाणी झिरपत असल्याने सर्वत्र चिखल झाले आहे. आधीच अनेक ठिकाणी खोल खड्डे पडलेले असताना सतत झिरपणाऱ्या पाण्यामुळे हे खड्डे आणखी मोठे झाले आहेत. परिणामी बस मार्गस्थ करताना चालकांना अत्यंत सावधगिरीने वाहन चालवावे लागत असून, दररोज तारेवरची कसरत करावी लागत आहे.
09 Dec 2025 02:35 PM (IST)
Hardik Pandya Instagram Post : हार्दिक पांड्या यांचा घटस्फोट झाल्यानंतर तो सातत्याने त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत राहिले आहे. हार्दिक पांड्याने त्याच्या घटस्फोटानंतर सोशल मिडिया महिका शर्मा हिच्यासोबत फोटो शेअर करुन नात्याचा कबुली दिली होती. महिका शर्मा हिने देखील बऱ्याचदा सोशल मिडियावर पोटो शेअर केले आहेत. हार्दिक पांड्या सध्या कटकमध्ये आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये होणाऱ्या मालिकेत तो खेळताना दिसणार आहे.
09 Dec 2025 02:30 PM (IST)
आमिर खान, करीना कपूर, आर. माधवन आणि शर्मन जोशी स्टारर “३ इडियट्स” हा चित्रपट त्याच्या सिक्वेलसह पडद्यावर धमाका करण्यासाठी सज्ज झाला आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित हा चित्रपट १५ वर्षांनी पुन्हा एकदा पडद्यावर परतणार आहे. विधू विनोद चोप्रा देखील या प्रकल्पात सामील होतील आणि प्रेक्षकांना एक नवीन कथा सादर करतील. चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे; .पिंकव्हिलाने सूत्रांचा हवाला देत वृत्त दिले आहे की “३ इडियट्स” हा चित्रपट पुन्हा एकदा सिक्वेल घेऊन येत आहे. या मालिकेत पहिल्या भागातील पात्रेच असतील. सूत्रांनी सांगितले आहे की २००६ च्या उत्तरार्धात म्हणजेच जून नंतर शूटिंग सुरू होईल. पटकथा पूर्ण झाली आहे आणि टीम खूप उत्साहित आहे. दुसरा भाग पहिल्या भागाइतकाच मनोरंजक आणि भावनिक असेल.
09 Dec 2025 02:25 PM (IST)
"धुरंधर" या चित्रपटात दानिश पांडोर रहमान द डकैत (अक्षय खन्ना) च्या चुलत भावाची भूमिका साकारत आहे. अलीकडेच, अभिनेत्याने अक्षय खन्नाच्या व्हायरल डान्स स्टेपबद्दल एक मोठा खुलासा केला. त्याने या हिट डान्स मूव्हचे कोरिओग्राफर कोणी केल्या आहेत? याबद्दल खुलासा केला आहे. तसेच "धुरंधर" चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. आणि चाहते अक्षय खन्नाच्या कामाचे देखील कौतुक करत आहेत. "धुरंधर" चित्रपटातील त्याच्या फेमस डान्स स्टेप्स अभिनेत्याने स्वतःच तयार केले आहेत असे वृत्त समोर आले आहे.
09 Dec 2025 02:20 PM (IST)
टेक कंपनी पोकोने नवीन बजेट स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे. हा स्मार्टफोन Poco C85 5G या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने हा लेटेस्ट स्मार्टफोन C लाइनअपअंतर्गत लाँच केला आहे. ग्राहक ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून नवीन डिव्हाईस खरेदी करू शकतात. कंपनीने हा लेटेस्ट स्मार्टफोन तीन कलर व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. सर्वात विशेष म्हणजेच कंपनीने या बजेट स्मार्टफोनमध्ये 6.9-इंच डिस्प्ले HD+ रिजॉल्यूशन आणि 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट दिला आहे. हे नवीन डिव्हाईस MediaTek Dimensity 6000 सीरीज चिपसेटने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी दिली आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, हा स्मार्टफोन 106 तासांहून अधिक म्यूझिक प्लेबॅक टाईम देतो.
09 Dec 2025 02:10 PM (IST)
पुणे: पुणे येथील विश्रांतवाडी येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका शाळकरी मुलीवर अत्याचार करण्यात आल्याचे नाव समोर आले आहे. पीडित मुलगी शाळेत जात होती. त्यावेळी आरोपी याने शाळेत सोडतो म्हणत तिला रूमवर नेउन अत्याचार केला.ही घटना चार डिसेंबरला घडली. पीडित तरुणीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारींनंतर पोलिसांनी कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे पुण्यात एकाच खळबळ उडाली आहे.
09 Dec 2025 02:05 PM (IST)
इंग्लंड संघाची सुरु असलेल्या अॅशेस मालिकेमध्ये निराशाजनक कामगिरी पाहायला मिळाली. या मालिकेचे आतापर्यत दोन सामने खेळवण्यात आले आहेत. या दोन्ही सामन्यांमध्ये इंग्लडच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. आता इंग्लंड क्रिकेट संघाच्या अडचणी संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. पाच कसोटी सामन्यांच्या अॅशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमधील पराभवानंतर, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूड दुखापतीमुळे संपूर्ण अॅशेस मालिकेतून बाहेर पडला आहे, त्यामुळे त्याच्या आणखी अडचणी वाढल्या आहेत.
09 Dec 2025 01:55 PM (IST)
महाराष्ट्रातील सर्वांत वर्दळीच्या आणि मध्यवर्ती बसस्थानकांपैकी एक असलेले स्वारगेट बसस्थानकात नवराष्ट्रने चार्जिग सुविधेशिवाय स्वारगेट अशी बातमी करून प्रवाशांची होत असलेली गैरसोय स्वारगेट एसटी प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर नवीन चार्जिग बोर्ड बसवण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक प्रवाशांनी समाधान व्यक्त केले असून, प्रवाशी या सुविधेचा लाभ घेत आहेत. दररोज ५० ते ६० हजार प्रवाशी या स्थानकावरून प्रवास करतात. मात्र, एवढ्या मोठ्या प्रमाणावर प्रवासी ये-जा करीत असतानाही येथे मोबाईल चार्जिंगची सोय नाही, या बाबीचा नवराष्ट्रने सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर नवीन बोर्ड बसवण्यात आले आहेत.
09 Dec 2025 01:45 PM (IST)
शिवसेना शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांचा पैशांच्या बंडलांसोबतचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी त्यांच्या सोशल मीडीया अकाऊंटवरून हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. या व्हिडीओवरून शिंदे गटाच्या आंदरान महेंद्र थोरवे यांनी भाष्य करत थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरेंवरच गंभीर आरोप केले आहेत.
09 Dec 2025 01:35 PM (IST)
कष्टकऱ्यांचे नेते आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव (Baba Adhav) यांचे आजारापणामुळे निधन झाले. हमाल, रिक्षाचालक आणि बांधकाम मजुरांचे संघटन करून त्यांच्या न्यायासाठी लढा देणाऱ्या बाबा आढाव यांच्या जाण्याने समाजाचे मोठे नुकसान झाले. मजुरांसाठी आणि कष्टकऱ्यांचे आभाळ कोसळले. त्यांनी वयाच्या 95 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बाबा आढाव यांची प्रकृती अचानक बिघडल्यामुळे गेले दहा दिवस त्यांच्यावर पुना हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. उपचाराला प्रतिसाद न दिल्याने अखरे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. यानंतर मनसे नेते राज ठाकरे यांनी बाबा आढाव यांच्यासाठी खास सोशल मीडिया पोस्ट लिहिले आहे. यामध्ये इंडिगो विमानच्या (Indigo Service) विस्कळीत सेवेचा देखील दाखला दिला.
09 Dec 2025 01:25 PM (IST)
राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मीरा भाईंदर (MBMC) शहरातील 44,862 दुबार नावांच्या यादीत गंभीर चुका असल्याचा आरोप स्थानिक पातळीवरून करण्यात आला आहे. त्यासोबत दिलेला Appendix-1 हा फॉर्म कायदेशीरदृष्ट्या अपूर्ण असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. याबाबत मीरा-भाईंदर महानगरपालिकेचे अधिकारी निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करून चुकीचं काम करताय असा आरोप काँग्रेस प्रवक्ते दीपक बागरी यांनी केला आहे नेमकं त्यांचं म्हणणं होते की , MBMC अधिकारी नागरिकांना फोनवरून “तुमचं नाव कोणत्या वार्डमध्ये ठेवायचं?” असा बेकायदेशीर प्रश्न विचारत असल्याचा गंभीर दावा करण्यात आला आहे.
09 Dec 2025 01:15 PM (IST)
आयसीसी जागतिक क्रिकेटचे व्यवस्थापन करते, त्याचप्रमाणे भारतीय क्रिकेटचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी बीसीसीआयची आहे. बीसीसीआयचे प्रयत्न त्यांच्या खेळाडूंच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी, त्यांना लढवय्यांमध्ये विकसित करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी तयार करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. यासाठी, बीसीसीआयकडे खेळाडूंच्या मागे काम करणाऱ्या सहाय्यक कर्मचाऱ्यांची एक जबरदस्त टीम आहे. बीसीसीआय खेळाडूंना एक व्यासपीठ प्रदान करते जिथे ते त्यांची प्रतिभा दाखवू शकतात, त्यांचे कौशल्य वाढवू शकतात आणि प्रगती करू शकतात.
09 Dec 2025 01:07 PM (IST)
बॉलीवूडमधील प्रसिद्ध चित्रपट निर्माती आणि नृत्य दिग्दर्शिका फराह खानने नुकतेच सोशल मीडियावर तिचे लग्नाचे अनसीन फोटो शेअर केले आहे. फराह खान आणि तिचा पती शिरीष कुंदर यांच्या लग्नाला आता २१ वर्ष पूर्ण झाल्याचे फराह खानने सांगितले आहे. हे दोघेही त्यांच्या लग्नाचा २१ वा वाढदिवस साजरा करत आहेत. फराह खानने लग्नाच्या आनंदाचे क्षण आठवत काही फोटो शेअर करून आकर्षित नोट देखील लिहिली आहे. ही पोस्ट पाहून चित्रपट इंडस्ट्रीमधील कलाकार तिचे अभिनंदन करत असून, काही चाहते तिच्या कॅप्शनचे कौतुक करत आहेत.
09 Dec 2025 01:00 PM (IST)
सावनेर तालुक्यातील माळेगाव येथे युवा महिला कबड्डीपटू किरण दाढेने नोकरीचे आमिष व मानसिक छळ सहन करत कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपी पती स्वप्नील लांबघरेवर गुन्हा दाखल.
09 Dec 2025 12:50 PM (IST)
सोलापूर–मुंबई सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाची बर्थखालून लॉक केलेली बॅग चोरीला जाऊन अंदाजे 5 किलो सोने, किंमत सुमारे 5 कोटी, लंपास झाले. घटना कल्याणजवळ उघडकीस आली असून जीआरपीने चोरीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू.
09 Dec 2025 12:40 PM (IST)
नवी मुंबईत लग्नासाठी आलेल्या स्वीडिश युवक एल्डे एडवर्डचा चौथ्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. एडवर्ड लग्नानंतर मित्रांसोबत बाहेर गेला आणि नंतर गंभीर अवस्थेत सापडला. दारूच्या नशेत असल्याचा संशय असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.
09 Dec 2025 12:30 PM (IST)
पिस्तुलाचा धाक दाखवून 20 लाख रुपये लुटून नेल्याची धक्कादायक घटना नागपुरात घडली. याप्रकरणी सराईत गुंड आशिष कुबडे उर्फ बोमाविरुद्ध सदर पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोमाने व्यापाऱ्याला मारहाण केल्यानंतर पिस्तूलाचा धाक दाखवून २० लाख रुपये मागितले. पैसे मिळाले नाहीतर जीवे मारण्याची धमकी दिली.
09 Dec 2025 12:20 PM (IST)
भुसावळच्या सेंट अलायन्स स्कूलच्या सद्भावना सहलीत विद्यार्थिनींना स्कार्फ बांधायला भाग पाडल्याचा आणि धार्मिक पुस्तक वाटपाचा आरोप झाला. पालकांच्या तक्रारीनंतर मुख्याध्यापकांसह आठ शिक्षकांवर गुन्हा दाखल.
09 Dec 2025 12:10 PM (IST)
सततच्या वादातून उद्भवलेल्या रागाच्या भरात पतीने झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने वार करून हत्या केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली. लक्ष्मी पवन धुंदाळे (वय २४) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव असून, आरोपी तिचा पती पवन गजानन धुंदाळे (वय २८) आहे.
09 Dec 2025 12:00 PM (IST)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धर्मवीर चित्रपटाबाबत वक्तव्य केले. एकनाथ शिंदे म्हणाले की, . आनंद दिघेचं काम हे इतक मोठं आहे की ते एक-दोन सिनेमात सामावू शकत नाहीं असं एकनाथ शिंदे म्हणाले. धर्मवीर 3 हा चित्रपट आलाच तर त्याची स्क्रिप्ट मलाच लिहावी लागेल. कारण त्यापुढे काय झालं हे फक्त मला माहिती, असे एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
09 Dec 2025 11:55 AM (IST)
सध्या नागपुरात राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु आहे. नागपूर विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात आज विरोधी पक्षाच्या आमदारांनी कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून जोरदार आंदोलन करत सत्ताधारी सरकारला धारेवर धरले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गळ्यात कापसाच्या बोंडांची माळ घालून विधानभवनात प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांवर तीव्र संताप व्यक्त केला.
09 Dec 2025 11:35 AM (IST)
यवतमाळमध्ये शिष्यवृत्तीच्या परिक्षेत ‘उच्च जात कोणती? प्रश्न विचारण्यात आल्याने रोहित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली. ते म्हणाले की, "एकीकडं जातीधर्मातील भिंती पाडण्यासाठी प्रयत्न होत असताना यवतमाळ इथे आठवीच्या शिष्यवृत्ती परिक्षेचा सराव करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नपत्रिकेत ‘उच्च जात कोणती?’ असा प्रश्न विचारण्यात आल्याचा संतापजनक प्रकार घडला. विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या सरावासाठी नेमलेल्या ‘टार्गेट पीक अप्स’ या संस्थेमार्फत हा प्रश्न विचारण्यात आल्याने हा प्रकार अधिक गंभीर आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात विद्यार्थ्यांच्या मनात कोवळ्या वयातच उच्च-नीच जातीची पेरणी करुन समाजात हा भेद अधिक वाढवण्याचा तर हा प्रकार नाही ना? या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करुन सरकारने संबंधितांवर कठोर कारवाई करावी.
09 Dec 2025 11:25 AM (IST)
ज्येष्ठ समाजसेवक बाबा आढाव यांचे दु:खद निधन झाले. काल (दि.08) त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बाबा आढाव यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली वाहिली असून शोक व्यक्त केला. पंतप्रधानांनी लिहिले आहे की,"बाबा आढाव जी विविध कारणांद्वारे समाजाची सेवा करण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी, विशेषतः उपेक्षितांना सक्षम बनवण्याच्या आणि कामगार कल्याणाच्या कार्यासाठी, स्मरणात राहतील. त्यांच्या निधनाने दुःख झाले. त्यांच्या कुटुंबा आणि चाहत्यांसोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती."
Baba Adhav Ji will be remembered for his efforts to serve society through various causes, notably empowering the marginalised and furthering labour welfare. Pained by his passing away. My thoughts are with his family and admirers. Om Shanti.
— Narendra Modi (@narendramodi) December 8, 2025
09 Dec 2025 11:15 AM (IST)
कॉंग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचा आज वाढदिवस आहे. राजकीय वर्तुळातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. एक्सवर पीएम मोदींनी लिहिले आहे की, श्रीमती सोनिया गांधीजींना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. त्यांना दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य लाभो, अशा शुभेच्छा दिल्या आहेत.
Birthday greetings to Smt. Sonia Gandhi Ji. May she be blessed with a long life and good health.
— Narendra Modi (@narendramodi) December 9, 2025