मोठी बातमी ! सिलेंडरच्या स्फोटानंतर तीन मजली इमारत कोसळली (File Photo : Blast)
नागपूर : कुटुंब साखर झोपेत असताना अचानक स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. यात पती-पत्नी व त्यांची दोन मुले गंभीररित्या होरपळली. सर्व जखमींना उपचारार्थ मेडिकल रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींमध्ये सुरेंद्र पाल, रमा सुरेंद्र पाल आणि त्यांच्या दोन मुलांचा समावेश आहे. ही खळबळजनक घटना बुधवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास इमामवाडा पोलिस ठाण्यांतर्गत घडली.
हेदेखील वाचा : Cyber Crime: पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल १,१६१ कोटींचा सायबर फ्रॉड; गुन्हेगारीसाठी ‘या’ पॅटर्नचा सर्वाधिक वापर
स्फोटाच्या आवाजाने आसपासचे नागरिक घाबरून जागे झाले. घटनेची माहिती मिळताच इमामवाडा पोलिस घटनास्थळी दाखल झाले. बॉम्ब शोधक व नाशक पथकासह श्वान पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आले. मात्र, स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा अद्याप शोध लागला नाही. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेंद्र पाल हे पत्नी रमा, 11 वर्षांची मुलगी व 13 वर्षांच्या मुलासह इमामवाड्यातील आयसोलेशन रुग्णालयाजवळ राहतात.
पाणीपुरी विक्री करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. नेहमीप्रमाणे मंगळवारी रात्री सर्वांनी सोबत जेवण केले आणि झोपी गेले. पहाटे 3-3.30 वाजताच्या सुमारास संपूर्ण कुटुंब साखर झोपेत असताना स्वयंपाक खोलीत अचानक स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. या स्फोटात पती-पत्नीसह दोन्ही मुले गंभीररित्या होरपळली. इमामवाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठले. स्फोट नेमका कशामुळे झाला, याचा शोध घेण्यासाठी इमामवाडा पोलिसांसह बीडीडीएस आणि श्वान पथकाने घटनास्थळी पाहणी केली.
तसेच तपासणी करण्यासाठी अग्निशमन विभागालाही पत्र दिले आहे. स्फोटाचे कारण अद्याप समजू शकले नाही. कदाचित गॅस सिलिंडरमध्ये लिकेज असल्याने स्फोट झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
एसटी डेपोतील शिवशाही बस पेटवली
दरम्यान, दुसरीकडे एसटी डेपोतील शिवशाही बस अज्ञात व्यक्तीकडून पेटविण्यात आली आहे. यासह तीन बसच्या काचा फोडण्यात आल्या. परभणी येथील पोलीस कोठडीतील सोमनाथ सुर्यवंशी मृत्यूप्रकरणामुळे सोलापूरात पडसाद उमटले. बसवर दगडफेक आणि आंदोलन करण्यात आले. सोलापूरात बंदच्या हाकेला समिश्र प्रतिसाद मिळाला.
हेदेखील वाचा : Pune Crime News: चोरट्यांनी महिलेला चालत्या गाडीवर धक्का दिला अन्…; आळंदीतील धक्कादायक घटना