माथेरान/ संतोष पेरणे : पर्यटकांची लाडकी मिनीट्रेन नेरळ स्थानकातून माथेरानसाठी अद्याप सुरु झालेली नाही. दरवर्षी 15ऑक्टोबर रोजी मिनीट्रेनची नेरळ माथेरान नेरळ प्रवासी वाहतूक सुरु होते. या वर्षी या मार्गावरील नॅरोगेज मार्गावर दर्दी कोसळल्याने दुरुस्तीची कामे सुरु होती.मात्र आता नेरळ येथून माथेरानसाठी मालवाहू गाडी कोणत्याही अडथळ्याविना प्रवास केला आहे.त्यामुळे नेरळ माथेरान नेरळ मार्गावर प्रवासी वाहतूक सुरु होण्याची वाट सर्व पर्यट्क बघत आहेत. दरम्यान नॅरोगेज मार्ग प्रवासी वाहतूक करण्यासाठी तयार झाला असल्याने नेरळ माथेरान नेरळ मिनीट्रेन कधी सुरु होणार याबाबत मध्यरेल्वेकडून कधी निर्णय घेतला जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
नेरळ-माथेरान-नेरळ या नॅरोगेज मार्गावर चालणारी मिनीट्रेन दरवर्षी पावसाळ्यातील चार महिने बंद ठेवली जाते. ब्रिटिश काळापासून 15 जून ते 15ऑक्टोबर या कालावधीत मिनीट्रेन पावसाळी सुट्टीवर जाते. नेरळ माथेरान हा मार्ग पहाडी असल्याने पावसाळयात नॅरोगेज मार्गावर दर्दी कोसळून अपघात होण्याची शक्यता असल्याने मिनीट्रेनची प्रवासी वाहतूक बंद केली जाते.यावर्षी मे महिन्याचं पाऊस आला आणि 26 मे पासून नेरळ माथेरान नेरळ हि प्रवासी सेवा बंद केली.त्यामुळे 15 जून पर्यंत मिनीट्रेन मधून प्रवास करण्याचे नियोजन करणाऱ्या पर्यटकांची संधी हुकली आहे.दुसरीकड़े 15ऑक्टोबर रोजी पावसाळी सुट्टी संपवून मिनीट्रेन ची प्रवासी वाहतूक नेरळ माथेरान नेरळ मार्गावर सुरु होते.मात्र यावर्षी ऑक्टोबर महिना संपला तरी मिनीट्रेनची नेरळ माथेरान अशी प्रवासी वाहतूक सुरु झालेली नाही.मौसमी पशु अजून परतीच्या मार्गावर नसल्याने दररोज पाऊस सुरु असून नॅरोगेज मार्गावर दगड कोसळण्याच्या घटना कायम आहेत.त्यामुले अद्याप नेरळ माथेरान नेरळ अशी मिनीट्रेन सुरु झालेली नाही.
मात्र पर्यटकांच्या दृष्टीने महत्वाचा असलेला दिवाळी पर्यटन हंगाम देखील संपल्याने नेरळ माथेरान नेरळ असा प्रवास करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या पर्यटकांची निराशा झाली आहे.त्यातही नोव्हेंबर महिना सुरु झाला तरी नेरळ माथेरान नेरळ मार्गावर मिनीट्रेन सुरु झालेली नाही.परंतु प्रवाशी वर्गासाठी आशादायक बाब म्हणजे नेरळ माथेरान मार्गावर मालवाहू गाडी कोणत्याही अडथळ्याविना नेरळ येथून माथेरान पोहचली आहे. त्याचवेळी माथेरान येथून नेरळ अशी देखील पोहचली आहे.मालवाहू गाडी 28ऑक्टोबर रोजी नेरळ येथून माथेरान साठी निघाल्यावर या गाडीला श्रीफळ वाढवून सुरुवात केली.हि मालवाहू गाडी कोणत्याही अडथळ्याविना निर्धारित वेळेत पोहचली होती. त्यानंतर नॅरोगेज मार्ग प्रवासी वाहतुकीसाठी तयार आहे असा सिग्नल देण्यात आला आहे.त्यानंतर माथेरान गेलेली मिनीट्रेनची मालवाहू गाडी आज 31ऑक्टटोबर रोजी नेरळ येथे परत आली आहे.त्यामुळे नेरळ माथेरान नेरळ अशी प्रवासी वाहतूक सुरु करण्याची घोषणा मध्य रेल्वे कधी करणार याकडे पर्यटक प्रवासी यांचे लक्ष लागून राहिले आहे.मध्य रेल्वे कडून मिनीट्रेनची घोषणा कधी होते याकडे पर्यटकांचे लक्ष लागले असून हिवाळ्यात मिनीट्रेन मधून प्रवास करता येणार का? याची वाट पर्यटक पाहत आहेत.
नेरळ माथेरान नेरळ मार्गवर मागील दोन वर्षांपासून नेरळ येथून दोन आणि माथेरान येथून दोन अशा दोन फेऱ्या या मार्गावर सुरु आहेत. मात्र नेरळ येथून सकाळी लवकर आणि रात्री वस्ती साठी एक अशा दोन गाड्या देखील नेरळ माथेरान नेरळ मार्गावर सुरु करण्याची मागणी गेली अनेक वर्षे केली जात आहे.






