मुंबई : राज्यात सत्तांतर होऊन आता चार साडेचार महिने झाले आहेत, महाविकास आघाडी सरकार कोसळून भाजप व एकनाथ शिंदे बंडाळी गट (BJP and Shinde Group) यांचे सरकार आले आहे. आणि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Vice CM Devendra fadnvis) यांनी पदभार स्विकारला आहे. राज्यात शिंदे-फडणवीस सरकारमध्ये राज्यातील मोठमोठे प्रकल्प राज्याबाहेर गेल्यामुळं, वादग्रस्त वक्तव्य तसेच विविध मुद्दावरुन विरोधक सत्ताधारी शिंदे-फडणवीस यांच्यावर सडकून टिका करताना दिसत आहेत. तर याला प्रतिउत्तर म्हणून भाजपा व शिंदे गटातील नेते जोरदार प्रतिउत्तर देताहेत. यामुळं विरोधक आणि सत्ताधारी असा कलगीतुरा रंगताना दिसतो. दरम्यान, शिवसेनेतून फुटून शिंदे गटात गेलेले नेते ठाकरे गटावर किंबहुना उद्धव ठाकरेंवर (Udhav Thackeray) टिका करत आहेत.
[read_also content=”सीमा प्रश्नाबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य, फडणवीस म्हणाले… https://www.navarashtra.com/maharashtra/dcm-devendra-fadnavis-big-statement-regarding-the-border-issue-fadnavis-said-351086.html”]
दरम्यान, माजी मंत्री व आमदार बच्चू कडूंनी (Bacchu Kadu) पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंवर निशाना साधला आहे. कोरोनाच्या नावाखाली व तब्येतीच कारण देत उद्धव ठाकरेंनी घरातून कारभार केला. तसेच मुख्यमंत्री असताना अडीच वर्षात कुठेही जास्त बाहेर फिरले नाहीत, लोकांच्या, शेतकऱ्यांच्या समस्या जाणून त्यांनी घेतल्या नाहीत. म्हणून त्यांना पायउतार व्हावे लागले अशी टिका बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंवर केलीय. तसेच आळशी राजाचं राज्य अधिक काळ चालत नाहीय, असा टोला देखील बच्चू कडूंनी उद्धव ठाकरेंना लगावला. दरम्यान, उद्धव ठाकरेंनी महिला मुख्यमंत्री करणार यावर देखील कडूनी टिका केली. उद्धव ठाकरेंना काही जमत नाहीय, त्यांच्याकडे आता काही काम उरलं नाही म्हणून त्यांनी नवीन उपक्रम सुरु केलाय. अशी टिका आमदार बच्चू कडू यांनी केलीय.