१०-१५ तास लाईनमध्ये थांबूनही शेतकऱ्यांना... इंधन तुटवड्यावरून रोहीत पवार यांचा सरकारवर निशाणा
या महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच कुकडीचे दुसरे उन्हाळी आवर्तन सोडण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली असून त्यासाठी त्यांनी यापूर्वी पत्रव्यवहारही केला आहे. परंतु अद्यापही पाणी सोडण्यात आलेले नाही. त्यामुळे गेल्या आठवड्यात पुण्यात सिंचन भवनमध्ये शेतकऱ्यांसह त्यांनी बैठक घेतली होती आणि तत्काळ पाणी सोडण्याची मागणी केली होती. त्यावर २८ मे रोजी पाणी सोडण्यात येणार असल्याचे प्रशासनाने सांगितले परंतु त्यापूर्वीच पाणी सोडचण्याची आग्रही मागणी यावेळी आमदार रोहित पवार यांनी केली होती. परंतु याबाबत काहीही निर्णय न झाल्याने त्यांनी काल शेतकऱ्यांसह पुन्हा सिंचन भवन गाठले आणि २५ मेपासून आवर्तन सोडण्याचे लेखी आश्वासन प्रशासनाकडून घेतले आहे.
बारामती इंदापूरसह दौंड आणि पुरंदर तालुक्यासाठी असलेल्या जनाई-शिरसाईच्या प्रश्नाचे स्वरुप तर वेगळेच आहे. पुण्याचे पालकमंत्री असताना अजित पवार यांचे जिल्ह्यातील प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईने लक्ष होते आणि अभ्यासही होता. त्यामुळे जिल्ह्यातील कोणत्याही प्रश्नावर ते संबंधित सर्व घटकांची एकत्रित बैठक घेऊन त्या प्रश्नातून सहज मार्ग काढत होते. परंतु आता परिस्थिती बदलली असून अजित पवार यांच्या दुदैवी निधनानंतर त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार या सध्या पुण्याच्या पालकमंत्री आहेत.
राजकारणात अचानकपणे त्यांच्यावर ही मोठी जबाबदारी आल्याने काम करताना त्यांनाही काही अडचणी येत असल्याचे आणि जनाई-शिरसाई प्रश्नही त्याचाच एक भाग असल्याचे दिसते. प्रशासनाने जनाई-शिरसाईतून पाणी न सोडल्याने आक्रमक झालेले आमदार रोहित पवार यांनी काल (गुरुवारी) पुण्यात शेतकऱ्यांसह पुन्हा सिंचन भवन गाठून प्रशासनाला खिंडीत गाठले.
कर्जत-जामखेडचे आमदार असले तरी मूळ बारामतीकर, शिर्सुफळ गुणवडी गटातील माजी जि. प. सदस्य म्हणून काम केल्याचा अनुभव आणि प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करण्याची सवय असल्याने आमदार रोहित पवार यांच्या अनेक तांत्रिक आणि वस्तुस्थितीदर्शक प्रश्नांनी प्रशासनाला निरुत्तर केले.
पाण्याची हानी गृहीत धरुन कोणत्याही गावाला नुकसान होणार नाही याची दक्षता घेऊन पाणी वाढवून देण्याचे आश्वासन यावेळी प्रशासनाने दिले. आता आज गुरुवार (दि. २१ मे) संध्याकाळी किंवा उद्या (शक्रवार दि. २२) सकाळी ९ वाजता हे पाणी सोडण्यात येणार असून तसे लेखी आश्वासन त्यांना प्रशासनाकडून देण्यात आले.
बारामतीसह दौंड, इंदापूर आणि पुरंदर या चारही तालुक्यातील शेतकऱ्यांचा खडकवासला धरणाच्या पाण्यावर अधिकार आहे. येथील सर्वच नागरिक महत्त्वाचे असून त्यांना समान न्याय मिळणं ही आमची भूमिका आहे. परंतु असमतोल वाटपामुळं काही तालुक्यातील काही गावांवर अन्याय होतो. हा अन्याय होण्यामागील कारणांचा शोध घेतला असता, त्यामागे खडकवासला कालवा कारणीभूत असल्याचे दिसते. या कालव्याची १ हजार क्यूसेक्सपर्यंत कमी झालेली वहन क्षमता आणि साफसफाई व देखभालदुरुस्ती करुन पूर्ववत १४०० क्यूसेक्स करण्याची गरज आहे. हा मुद्दा प्रशासनाकडे मांडला आणि त्यांनीही तो मान्य केला. पुढील आवर्तनापर्यंत हे काम पूर्ण करण्याचा शब्द प्रशासनाने दिला आहे. त्यामुळं कोणत्याही तालुक्यावर अन्याय न होता सर्वांना आपापल्या हक्काचे पाणी मिळण्यास मदत होणार आहे.’’*
रोहित पवार (आमदार, कर्जत-जामखेड)






