ठाणे : राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वर्धापनदिन (MNS Foundation Day) उद्या होत आहे. हा वर्धापनदिन पहिल्यांदाच ठाण्यात (Thane Rally) साजरा केला जाणार आहे. त्यामुळे उद्या राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे. तत्पूर्वी सभेच्या पार्श्वभूमीवर ‘साहेब’ असे फलक लावून मनसेने वातावरण निर्मिती केली आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (MNS) वर्धापनदिन दरवर्षी मुंबईत साजरा केला जातो. पण यावर्षी पहिल्यांदाच वर्धापन दिन ठाण्यात साजरा केला जाणार आहे. यानिमित्ताने राज ठाकरेंच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाण्यात होणाऱ्या वर्धापनदिन कार्यक्रमाच्या निमित्ताने मनसेचे नेते, पदाधिकाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात पोस्टरबाजी केली जात आहे. त्यामध्ये सभेच्या पार्श्वभूमीवर ‘साहेब’ असे फलक लावून मनसेने वातावरण निर्मिती केली आहे. तसेच ‘संघर्षाची तयारी…पुन्हा एकदा भरारी’ अशा पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल केल्या जात आहेत.
राज्यात सत्तांतरानंतरचा पहिला वर्धापनदिन
राज्यात शिवसेना पक्षफुटीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केले. त्यांच्या या सरकार स्थापनेनंतरचा राज ठाकरेंच्या मनसेचा पहिलाच वर्धापनदिन आहे. त्यामुळे आता या वर्धापनदिनी राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.
ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये कार्यक्रम
मनसेचा वर्धापन दिन दरवर्षी मुंबई साजरा केला जातो. मात्र, यंदा पहिल्यांदाच ठाण्यात साजरा करण्याचा निर्णय राज ठाकरेंनी घेतला आहे. त्यामुळे उद्या ठाण्यातील गडकरी रंगायतनमध्ये सायंकाळी हा कार्यक्रम पार पडणार आहे. त्यात राज ठाकरे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे.