गुहागारमध्ये ठाकरे बंधू एकत्रित लढण्याची शक्यता (फोटो- सोशल मीडिया)
गुहागर: वरीष्ठ स्तरावर शिवसेना व मनसे यांची मने जुळली आहेत. तसेच गुहागरला एक सक्षम नेतृत्व आमदार जाधव यांच्या रुपाने मिळाले असून एकत्र काम करायला आम्हाला मजा येईल. त्यामुळे वरीष्ठांच्या निर्णयानुसार, आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आमदार जाधव यांच्याशी एकत्र बसून जागांचाबत चर्चा करणार असल्याची माहिती गुहागर तालुका मनसेचे संपर्क अध्यक्ष प्रमोद गांधी यांनी वार्तालाप चर्चेत दिली. एकत्रित लढत न झाल्यास स्वबळावर आम्ही सर्व जागा लढविणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर चर्चा करण्यासाठी व मनसेची भूमिका मांडण्यासाठी गुहागर मनसेच्या श्रृंगारतळी येथे ते बोलत होते.
प्रत्येक तालुक्यातून दोन गटांची मागणी करणार
स्वबळावर लढल्यास आम्ही सर्वच जागांवर लढणार आहोत. नुकतीच आमदार भास्कर जाधव यांनी श्रृंगारतळी मनसे कार्यालयाला भेट दिली. यावेळी आमदार जाधव यांनी आम्ही कागदावर नसलो तरी आमची मने जुळल्याचे बोलून दाखविले. त्यामुळे आम्ही एकत्र लढणार आहोत, असा आम्हाला विश्वास आहे. तसेच अनेक शिवसैनिकांचे आम्हाला फोन आले असून एकत्र लढण्याविषयी बोलत आहेत.
गुहागरमधून मनसेचे सुनील हळदणकर
गुहागर मनसेचे तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर चिपळूण तालुक्यातील उमरोली गटात सक्रीय आहेत. त्यांच्या उमेदवारीसाठी मागणी करणार असल्याचे गांधी यांनी स्पष्ट केले, प्रमोद गांधी श्रृंगारतळी जिल्हापरिषद गटातून लढणार असल्याचे बोलले जात असेल तर ते धागलेच असेल, मात्र तो निर्णय चर्चा करुनच होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. आ. भास्कर जाधव व विक्रांत जाचव यांची आम्ही भेट घेऊन त्यांचा सत्कार करणार आहोत, असे ते म्हणाले.
एकत्र लढण्याविषयी चर्चा करणार
एकत्र लढण्याविषयी व जागांविषयी चर्चा करणार आहोत. पुढील महिन्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांबा रत्नागिरी दौरा असून त्या दौ-याच्या नियोजनाची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यावेळीही जागांविषयी चर्चा होईल, असे गांधी यांनी सांगितले, यावेळी उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर, तालुकाध्यक्ष सुनील हळदणकर, गुहागर तालुका सचिव प्रशांत साधले, उप तालुकाध्यक्ष अमित खांडेकर, उप तालुकाध्यक्ष जितेंद्र साळवी, सांस्कृतिक विभाग राहुल जाधव, अनुज भुष्ड व आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. वैभय खेडेकर यांच्या जाण्याने मनसेला जिल्ह्यात काहीही फरक पडणार नाही, त्यांच्याबरोबर गेलेले काहीजण परत आले असून त्यांचा दादरमध्ये पक्षप्रवेश झाला आहे. खेडेकर यांच्या रिक्त जागेविषयी वरीष्ठ निर्णय घेणार असून तो आमहाला मान्य असणार आहे.






