कल्याण ग्रामीण-अमजद खान : डोंबिवली जिमखाना स्टेडियमसाठी २५ कोटी रुपये निधीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. त्यासाठी सदस्य या नात्याने आपले मनापासून आभार व्यक्त करतो. परंतु कल्याण ग्रामीण भागात कित्येक मुले मुली क्रिकेट कबड्डी, कुस्ती या विविध क्रिडा प्रकारात आपले नैपुण्य दाखवित आहेत. त्यासाठी आरक्षित भूखंड तसेच गुरचरण जागेवर स्टेडियमसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा ही जाहिर मागणी मी करतो आहे. कोणताही दुजाभाव न करता ही मागणी आपण मान्य करावी अशी मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
राज्याचे मुख्यमंत्री शिंदे हे डाेंबिवलीतील एका कार्यक्रमात आले होते. या कार्यक्रमात डोंबिवली जिमखान्यातील स्टेडियमसाठी २५ कोटीचा निधी देणार असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर मनसे आमदार पाटील यांनी ट्वीटच्या माध्यमांतून त्यांचे आभार मानले आहे. त्यानी कल्याण ग्रामीण भागासाठी काही मागण्या केल्या आहेत. काल आपण डोंबिवली जीमखान्याला स्टेडियमसाठी २५ कोटीच्या निधीची घोषणा केली. जिमाखान्याचा आजीव सदस्य या नात्याने मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो. खरे तर डोंबिवली जीमखान्यात कोविड काळात कोविड सेंटरसाठी मोफत जागा दिली होती. कोविड संपल्यावर अनेक विनवण्या करुनही केडीएमसी एका प्रकारे कृतघ्नता दाखवित जागा रिकामा करुन दिली नव्हती. त्याचा प्रचंड मनस्ताप सर्वच जीमखाना सदस्यांना आणि खेळाडूंना झाला होता.
मा. मुख्यमंत्री महोदय @mieknathshinde ,
काल आपण डोंबिवली जिमखान्याला स्टेडियम साठी पंचवीस कोटींचा निधीची घोषणा केली, जिमखान्याचा आजीवन सदस्य या नात्याने मी आपले मनापासून आभार व्यक्त करतो !
खरंतर डोंबिवली जिमखान्याने कोविड काळात कोणतेही भाडे न आकारता कोविड सेंटरसाठी मोफत जागा…— Raju Patil ( प्रमोद (राजू) रतन पाटील ) (@rajupatilmanase) December 26, 2023
काल आपण भरघोस निधीची घोषणा करुन एका प्रकारे जिमखान्यावर फुंकर घालण्याचे काम केले आहे. त्याबद्दल आपले पुनश्च: आभार. या निमित्ताने आपणास नम्रपणे विनंती करु इच्छीतो की, आमच्या ग्रामीण भागात कित्येक मुले मुली क्रिकेट कब्बडी, कुस्ती, फ़ुटबाँल अशा विविध खेळ प्रकारत आपले नैपूण्य दाखवित आहेत. एकीकडे सरकारने आमच्या हक्काच्या गुरुचरण जमीनी मेट्रो, कारशेड, डम्पिंग ग्राउंड ग्रोथ सेंटर म्हाडा व इतर बिल्डरांच्या घरात घातल्या आहेत. परंतु त्यातनही काही आरक्षित भूखंड तसेच गुरचरण जागा अजूनही शिल्लक आहे. अशा भूखंडावर गुरचरणावर उदयोन्मुक खेळाडू आणि प्रशस्त स्टेडियमसाठी निधी उपलब्ध करुन द्यावा ही मागणी मी करीत आहे. कोणताही दूजाभाव न करता निधी उपलब्ध करुन द्यावा असे ट्वीट मनसे आमदार पाटील यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना केले आहे.