MNS organizes a big event at Shivaji Park on The Occasion of Marathi Language Gaurav Day Poets Conference of Eminent Celebrities in The Presence of Raj Thackeray
मराठी भाषा गौरव दिन : मनसेकडून पुन्हा एकदा हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागांत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेय. मुंबईतील दादर परिसरात छत्रपती शिवाजी पार्क मैदानात मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मनसेकडून एक भव्य कार्यक्रम शिवाजी पार्कवर केला जात आहे.
शिवाजी पार्कवर मनसेकडून मराठी भाषा गौरव दिन
आज संपूर्ण महाराष्ट्रात २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जात आहे. यानिमित्ताने राज्याच्या विविध भागांत अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यंदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडून मराठी भाषा गौरव दिनानिमित्त कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. मुंबईतील दादर परिसरात छत्रपती शिवाजी पार्क मैदानात मराठी भाषा गौरव दिनाचं औचित्य साधत मनसेकडून एक भव्य पुस्तक प्रदर्शन भरवण्यात आलं आहे. विशेष म्हणजे या पुस्तक प्रदर्शनाच्या पार्श्वभूमीवर कवितांची मैफील रंगली. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक कविता म्हटली.
सेलीब्रेटींचे कविसंमेलन
शिवाजी पार्कच्या मराठी भाषा दिनानिमित्त सेलिब्रेटींच कविसंमेलनात दिग्गज दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी मोठी माय मराठीच्या काठावर असे नाव घेतले. माय मराठीच्या नदीच्या रूपाने माझ्यासाठी आहे, असे म्हटले. अगदी माय मराठी गंगेत बुडी मारल्याची कबुली दिली. तिचे उपकार मानले नाही तर आपण कृतघ्न ठरू.
नागराज मंजुळे
नागराज मंजुळेने सांगितले, मराठीचा गौरव एका दिवसापुरता मर्यादित नाही पाहिजे. तिचा एका दिवसापुरता हा गौरव गरजेचा नाही. तीचे गुणगान गाताना आपल्याला लाज वाटली नाही पाहिजे. भाषा मनुष्य मरते तशी मरत नाही. तर भाषा ही तेव्हाच मरते जेव्हा जेव्हा आपणच तीला लाजतो. मराठी जगली पाहिजे. याकरिता आपण तिची लाज बाळगली नाही पाहिजे. भाषा अत्यंत महत्त्वाची परंतु, तिला तिला जगवण्यासाठी आपण काय करतो.
जावेद अख्तर
मराठीमध्ये रत्नांचे खजाना आहे त्याला बाहेर काढले पाहिजे. या ठिकाणी साहित्याचा एवढा मोठा खजाना आहे हे मला येथे आल्यावर कळाले परंतु मी जेथून आलो त्याठिकाणी तेव्हा मला हे माहिती नव्हते. परंतु येथील साहित्य वाचले तेव्हा मी चकीत झालो. आणि त्यांचा फॅन झालो. येथील साहित्य चिरफाड करून तुम्हाला सत्य सांगते, जे कोणतीही भाषा सांगत नाही. या भाषेला जबरदस्त इतिहास आहे येथील स्त्री हजारो वर्षापासून लिहतेय. हे जगात कोठेही नाही.
विकी कौशल
विकी कौशल याने कणा ही कविता गायली. यामध्ये पाठीवरती फक्त हात ठेवून लढ म्हणा. मोडला जरी संसार तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेवून फक्त लढ म्हणा….