मुंबई : गणपती ! सर्वांच आराध्य दैवत आणि त्याचबरोबर लहान असो किंवा मोठी मंडळी लाडक्या गणू बाप्पाची मूर्ती पाहिली की आपसूकच ओठावर हसू येतं. गणपती म्हणजे नवचैतन्य आणि कलेची देवता. 64 कलांचा अधिपती असा हा गणपती. त्याच्या मूर्तीला पाहून साकारात्मक ऊर्जा मिळते. ही गणपती बाप्पावरती जशी श्रद्धा आहे तशीच ती मूर्ती घडवणाऱ्या कलाकारांच्या हाताची सुद्धा किमया आहे. अशाच एका मुर्तीकाराची सोशलमीडियावर चर्चा होत आहे.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने ब्रिजस्टोन इंडियाने अलीकडेच सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.या व्हिडिओमध्ये प्रसिद्ध मूर्तिकार राजन पाटकर यांचे मूर्तिकाम आणि कलाकृतीची दखल घेण्यात आली. याच कलाकाराने प्रसिद्ध गिरगावच्या राजाची शाश्वत मूर्ती तयार केली. गिरगावचा राजा हा मुंबईतील सर्वात जुन्या सार्वजनिक गणेश मंडळांपैकी या मंडळाची स्थापना 1928 ला झाली. तेव्हापासून या मंडळाला मोठं महत्व आहे.
ज्याप्रमाणे या मंडळाने इतके वर्षात सातत्याने लोकांचा विश्वास मिळवला अगंदी तसंच ब्रिजस्टोन सुमारे 29 वर्षांपासून भारतात अस्तित्वात असून देशातील लोक, संस्कृती आणि मोठ्या प्रमाणात समाजाशी पूर्णपणे जोडलेली आहे. ब्रिजस्टोन E8 कमिटमेंटमध्ये, भावनांचे मूल्य उत्साह निर्माण करण्याच्या आणि गतिशीलतेच्या जगात आनंद पसरवण्याच्या वचनबद्धतेबद्दल आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून कंपनी देशातील उत्सवाचा उत्साह साजरा करण्यासाठी आपल्या ग्राहकांच्या भावनांशी जोडली जाते.
गणेश चतुर्थी उत्सवादरम्यान लाडक्या गणपती बाप्पाची मूर्ती घडविण्यात शिल्पकाराने वर्षानुवर्षे आदर आणि कलात्मकतेचे दर्शन घडवले आहे. ब्रिजस्टोन ग्राहकांच्या अनुभवात भर घालण्याच्या उद्देशाने आपल्या उत्पादन प्रस्तावांत सतत संशोधन आणि विकास तसेच नाविन्यपूर्णतेसाठी वचनबद्ध आहे. हा व्हीडिओ युट्यूबवर देखील
पाहता येईल.
Schbang एजन्सीच्या संकल्पनेवर आधारित असलेल्या व्हिडिओत कंपनीच्या मूल्यांशी सुसंगत असलेल्या कथानकाची रचना करण्यासाठी आणि ब्रिजस्टोन समूहाचे ध्येय समोर आणण्यासाठी सादरीकरणाचा विचार करण्यासाठी माहिती देण्यात आली. या महितीत कंपनीच्या संस्थापकांचा विचार ‘उच्च गुणवत्तेसह समाजाची सेवा करणे’ प्रादेशिक प्रासंगिकतेसह प्रभावी आणि भावनिक कथा सांगून मांडण्यात आला.
हा सण साजरा करणाऱ्या लोकांच्या आस्थेची दृश्ये आणि मूर्तीकार राजन पाटकर यांची कलाकृती व्हिडिओतून प्रेक्षकांसमोर उलगडतात. ज्यामधून ब्रिजस्टोनची भारतात रुजलेली खोल मुळे, त्याची संस्कृती आणि भारतीय ग्राहकांशी असलेला संबंध तसेच त्यांच्या गरजा अधोरेखित होतात. हा व्हीडिओ म्हणजे एका सद्गुणी मान्यवराने दिग्गज कलाकाराला केलेला सलाम आहे.