मुंबई गोवा महामार्ग आगामी दोन दिवस बंद राहणार आहे. हा महामार्ग दोन दिवसातून चार तास बंद असणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे. मुंबई गोवा महामार्गावर कोलाड हद्दीतील पुई म्हैसदरा पुलाचं सुरु असलेले काम मागील काही दिवसांपासून सुरु आहे. या पुलावरील लोखंडी गर्डर बसविण्याकरिता गुरुवारी १८ जुलै आणि उद्या म्हणजेच शुक्रवारी १९ जुलै रोजी दुपारी १२ ते ४ या दरम्यान मुंबई गोवा महामार्ग बंद असणार आहे अशी माहिती मुख्यालयातील पोलीस अधीक्षक अरविंद साळवी यांनी नुकतीच दिली आहे.
जर प्रवाशांना प्रवास करायचा असेल तर माणगावच्या दिशेने येणाऱ्या वाहनधारकांनी कोलाड रोहा भिसेखिंड मार्गे पेण प्रवास करावा लागणार आहे. पेण नागोठण्याच्या दिशेकडून येणाऱ्यांनी माणगावकडे जायचं असल्यास वाकण-पाली विळेभागाड वरून माणगाव असा प्रवास करावा, अशी माहिती संबंधित परिवहन आयुक्त महाराष्ट्र राज्य आणि कल्याण टोल इन्फ्रास्ट्रक्चर ठेकेदार यांनी दिली आहे.
पर्यायी वाहतुकीसाठी या वेळेत कोकणाकडून मुंबईकडे यायचं असल्यास माणगाव निजामपूर पाली खोपोली असा प्रवास करावा लागणार आहे. तर मुंबईकडून गोवाकडे यायचं झाल्यास वाकन पाली निजामपूर माणगाव असा प्रवास करावा लागणार आहे. मुंबई गोवा महामार्ग काही तासांसाठी बंद असणार आहे त्यामुळे नियोजन करुन घराबाहेर पडावं असं आवाहन प्रवाशांना करण्यात आलं आहे.
पुई म्हैसदरा पुलाचं काम गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. हे काम गेल्या अनेक दिवसांपासून रखडलं गेलं होतं. मात्र आता या कामाने वेग घेतला आहे. या पुलावरील लोखंडी गर्डर बसविण्याकरिता महामार्ग गुरुवारी आणि शुक्रवारी दुपारी बारा ते चार या वेळेत एकूण चार तास बंद राहणार आहे.